Knife attack crime news from an unknown person on the banana vendor
शिरवळ : शिरवळ (ता. खंडाळा) येथे एका फळविक्रेत्या युवकावर अज्ञात हल्लेखोरांनी भर रस्त्यात प्राणघातक हल्ला करून गंभीर जखमी केले. ही घटना आज सायंकाळी साडेनऊ वाजण्याच्या सुमारास शिरवळ एस.टी. स्टॅंडजवळ घडली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. तौफिक इब्राहिम बागवान (वय २९, रा. शिरवळ) असे जखमी युवकाचे नाव असून तो आपल्या स्टॉलवर फळविक्री करत असताना अज्ञात दोघा व्यक्तींनी अचानक त्याच्यावर कोयत्याने वार केले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या तौफिक याला तातडीने स्थानिक खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक संदीप जगताप, सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिद , पोलिस हवालदार दत्तात्रय धायगुडे , पो अंमलदार भाऊसाहेब दिघे ,अरविंद बाराळे , दीपक पालेपवाड, सूरज चव्हाण यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र, हल्लेखोर तिथून फरार झाले. पोलिसांनी तात्काळ तपासाची चक्रे फिरवली असून, हल्लेखोरांचा शोध सुरू आहे. प्राथमिक चौकशीनंतर हा हल्ला कोणत्या कारणाने करण्यात आला याचा तपास सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. तर शिरवळ पोलिस तीन हल्लेखोर यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास शिरवळ पोलिस करत आहेत.
राजकीय बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
गेल्या आठवड्यातच एमआयडीसी परिसरात एका तरुणाचा कोयत्याने वार करून खून करण्यात आला होता. त्या घटनेची दहशत ताजी असतानाच पुन्हा असे प्रकरण घडल्याने शिरवळ परिसरात नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. दोन आठवड्यांत दुसऱ्यांदा कोयता गँग सक्रिय झाल्याच्या चर्चांना उधाण आले आहे.
शिरवळ परिसरात वाढत्या गुन्हेगारी घटनांमुळे नागरिकांमध्ये अस्वस्थता पसरली आहे. स्थानिकांनी पोलिसांनी या घटनांचा जलद तपास करून आरोपींना लवकरात लवकर अटक करावी,अशी मागणी केली आहे. पोलिसांनी देखील नागरिकांना सुरक्षिततेसाठी सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. सद्यस्थितीत हल्लेखोर कोण होते आणि त्यांच्या हल्ल्यामागील नेमके कारण काय होते, याचा तपास पोलीस करत आहेत. दरम्यान, या घटनेमुळे शिरवळ शहरात तणावाचे वातावरण आहे.
महाराष्ट्रसंबंधित बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
साताऱ्यात स्कीमचे आमिष दाखवून फसवणूक
राज्यात फसवणूकीचे प्रमाण वाढले आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून फसवणुकीच्या घटना उघडकीस येत असतात. अशातचं आता सातारा जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. आमच्याकडे स्कीममध्ये पैसे गुंतवल्यास रकमेच्या दुप्पट पैसे अथवा दुप्पट रकमेचे सोेने मिळेल, असे आमिष दाखवून ९ लाखांची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी तिघांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. धन्यकुमार गोरख माने, शरयू धन्यकुमार माने (रा. राजगुरुनगर, सध्या रा. संगमनगर खेड) व प्रतिक्षा सिद्धार्थ गडांकुश (रा. चिंचणेर, ता. सातारा) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. संशयितांनी लोहार यांना १० हजार रुपयांत ३ ग्रॅम सोन्याचा कॉईन अथवा २० हजार रुपये परतावा (कालावधी ५५ दिवस), ठेव म्हणून ठेवलेल्या पैशांवर ५ टक्के कॅशबॅक अशा विविध स्कीमचे अमिष दाखविले. तक्रारदार यांच्यासह अनेकांकडून ९ लाख १० हजार रुपये घेतले व त्याचा काहीच परतावा व रक्कमही परत केली नाही, असे फिर्यादीत म्हटले आहे. अधिक तपास सहायक निरीक्षक कांबळे करत आहेत.