crime (फोटो सौजन्य: social media )
सांगली : सांगलीच्या मिरज येथील गणेश विसर्जन मिरवणुकीत हत्या झाल्याची घटना समोर आली आहे. भांडण सोडविण्यास गेलेल्या तरुणाला चाकू भोसकल्याची घटना समोर आली आहे. हल्ला झालेल्या तरुणाचा रात्री अपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. शीतल धनपाल पाटील (वय 25) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. मिरज तालुक्यातील अंकली येथे ही घटना घडली आहे. याप्रकरणी, पोलिसांकडून (Police) आता गुन्हा दाखल करुन तिघांना अटक केली आहे.
Mumbai High Alert : मुंबई हाय अलर्ट जारी, नौदलाच्या जवानाची रायफल घेऊन संशयित फरार
नेमकं काय घडलं?
सांगली जिल्ह्यातील मिरजमध्ये गणेश विसर्जन मिरवणुकीला गालबोट लागले. मिरज तालुक्यातील अंकली गावात गणेश विसर्जन मिरवणुकीत झालेल्या वादातून एका युवकाचा खून झाल्याची घटना घडली. विशेष म्हणजे भांडणं सोडविण्यासाठी हा युवक गेला तेव्हा त्याच्यावरच चाकूने हल्ला करण्यात आला आहे. भांडण सोडवताना शीतल या तरुणास चाकुने भोकसल्याने तात्काळ उपचारासाठी त्यास हॉस्पिटलमध्ये हलविण्यात आले. मात्र त्याचा उपचार सुरू असताना सोमवारी रात्री सिव्हील रुग्णालयामध्ये त्याचा मृत्यू झाला.
गाव बंद
शितलचे पार्थिव आज सकाळी अंकली गावात नेण्यात आले. यावेळी अंकली गावातील ग्रामस्थ संतप्त झाले होते. शीतलची अंत्ययात्रा आज सकाळी गावातून नेत असताना मोठा तणाव निर्माण झाला होता. दरम्यान, गावकऱ्यांनी गाव बंद ठेवून खुनाच्या घटनेचा निषेध केलाय. या घटनेत सांगली ग्रामीण पोलिसांनी विकास बंडू घळगे (३५), क्षितिज ऊर्फ आप्पा शशिकांत कांबळे (२८), आदित्य शंकर घळगे (२२, रा. अंकली) या तिघाना अटक केली आहे. तसेच, आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत.
गणेश विसर्जन मिरवणुकीत दणदणाट; मंडळांच्या अध्यक्षांसह मालकांवर पोलिसांची मोठी कारवाई
गणेश विसर्जन मिरवणुकीमध्ये डीजेवर कर्णकर्कश आवाजामध्ये गाणे लावून मोठ्या प्रमाणात ध्वनी प्रदूषण केल्याचे अनेक ठिकाणी पाहायला मिळाले आहे. यामुळे पोलिसांनी कारवाई केली आहे. दत्तवाडी आकुर्डी येथे शिवाजी मित्र मंडळाच्या मिरवणुकीत लेजर बीम आणि डीजे लावण्यात आला होता. डीजेच्या आवाजाची पातळी मर्यादेपेक्षा अधिक असल्याने मंडळाचा अध्यक्ष सुरज मारुती पिंजण (दत्तवाडी, आकुर्डी), डीजे चालक मालक आणि ट्रॅक्टर मालकाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गरदरे यांनी निगडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
लेजर बीम आणि डीजे प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल प्रकाश गरदरे यांच्या फिर्यादीवरून आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यामध्ये सुदर्शन मित्र मंडळ, सुदर्शननगर आकुर्डी या मंडळाचा अध्यक्ष आदित्य सुनील शिंदे, डीजे मालक क्षितिज शहा (श्रीरामपूर, अहिल्यानगर) आणि बीम लाईट मालक सिद्धांत गणेश यादव (कुदळवाडी, चिखली) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या मंडळाच्या मिरवणुकीत बंटी गृपजवळ आवाजाची पातळी तपासण्यात आली होती. त्यावेळी डीजेचा आवाज मर्यादेपेक्षा अधिक असल्याचे निदर्शनास आले.
Beed Crime: संतापजनक! परळीत 12 वर्षीय बालिकेवर दोघांकडून लैंगिक अत्याचार