बीड जिल्ह्यातील परळी शहरात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका १२ वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. यात आणखी दोन जणांनी या प्रकरणात मदत केल्याचं देखील समोर आलं आहे.आठ दिवसात ही दुसरी घटना आहे. आता पुन्हा अशीच घटना परळीच्या बरकत नगर परिसरात घडल्याने परळी शहरात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
Mumbai High Alert : मुंबई हाय अलर्ट जारी, नौदलाच्या जवानाची रायफल घेऊन संशयित फरार
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित बालिका आपल्या घराजवळ असतांना आरोपींनी तिला फसवून नेलं. त्यानंतर दोघांनी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. यावेळी आणखी दोन जणांनी आरोपींना साथ दिल्याचे तपासात उघड झाले आहे.पोलिसांनी बरकत नगर येथील आरोपीला अटक केली आहे.
या प्रकरणाची माहिती मिळताच पीडित मुलीच्या कुटुंबीयांनी तात्काळ संभाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेतली. पोलिसांनी चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला असून दोन प्रमुख आरोपींवर अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. इतर दोघांवर मदत केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाची चक्रे फिरवली आहेत. आरोपींना अटक करण्यासाठी विशेष पथक नेमण्यात आलं असून पोलिसांनी लवकरच सर्व आरोपींना पकडले जाईल असा विश्वास व्यक्त केला आहे.
आठ दिवसांमध्ये ही दुसरी घटना आहे. पहिली घटना ही रेल्वे स्थानक परिसरात घडली. अवघ्या चार वर्षांच्या चिमुकलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना रविवारी (31 ऑगस्ट) दुपारी घडली. ही घटना अजून नागरिक विसरले नाहीत तर आता १२ वर्षीय मुलीवर दोन तरुणांनी अत्याचार केल्याचं समोर आला आहे. या अमानुष कृत्याने संपूर्ण परिसरात संतापाची लाट उसळली आहे.
नागरिकांमध्ये संताप
परळीत अल्पवयीन मुलींवर वारंवार होणाऱ्या अत्याचाराच्या घटनांनी गंभीर चिंता निर्माण केली आहे. अवघ्या आठ दिवसांत दोन मुलींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेमुळे परिसरात संतापाची लाट आहे. बीडमध्ये वारंवार घडणाऱ्या गुन्हेगारी घटनांना कधी आला बसणार? बीडमधील गुंडगिरी, दिवसाढवळ्या होणाऱ्या हाणामारीच्या घटना, खून, अत्याचार थांबणार कधी? हा सवाल पुन्हा एकदा उपस्थित होत आहे.
चिडविण्याच्या कारणावरून मेंढपाळाला दगडाने ठेचून संपवलं
बीड जिह्यातील पाटोदा तालुक्यात एक धक्कदायक घटना समोर आली आहे. चार दिवसांपूर्वी दगडवाडी शिवारात दीपक बिल्ला (मूळ गाव मध्य प्रदेश) या मेंढपाळाचा मृतदेह आढळला होता. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत या हत्येचं गूढं उलगडलं आहे.