
crime (फोटो सौजन्य: social media)
पतीकडून पत्नीच्या खुनाचा प्रयत्न, तीक्ष्ण शस्त्राने सपासप वार; कारणही आलं समोर
काय आहे संपूर्ण प्रकरण?
कौसर गरगरे यांच्या सासऱ्यांचा, म्हणजेच राजमहंदर गरगरे, कुरुंदवाड नगरपरिषदेच्या निवडणुकीत उमेदवार म्हणून सहभाग आहे. निवडणुकीत मोठ्या प्रमाणात खर्च करावा लागत असल्याने सासरच्या मंडळींकडून कौसर यांच्यावर सतत दबाव आणला जात होता. माहेरहून दहा लाख रुपये घेऊन येण्याची मागणी अधिक तीव्र होत गेली. या पैशांसाठी तिच्यावर सातत्याने मानसिक छळ आणि शारीरिक त्रास दिला जात असल्याचे फिर्यादीत नमूद आहे.
गुरुवारी रात्री, सासरकडून होणाऱ्या सततच्या ताणतणावाला कंटाळून कौसरने घराच्या छताला गळफास घेऊन जीव देण्याचे टोकाचे पाऊल उचलले. रात्री सुमारे अकराच्या सुमारास ही घटना घडली. कौसरच्या भावाने—अल्ताफ आवटी यांनी—तत्काळ कुरुंदवाड पोलिस ठाण्यात धाव घेत फिर्याद नोंदवली.
कोणावर गुन्हा दाखल?
फिर्यादीच्या आधारे पोलिसांनी कौसर यांचा पती, सासू, सासरे आणि जावेच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर आत्महत्येस प्रवृत्त करणे, छळ करणे आणि आर्थिक अत्याचार यांसारख्या गंभीर कलमांखाली गुन्हा नोंदवण्यात आला आहे. पोलिसांनी तपास सुरू केला असून, काही महत्त्वाचे पुरावे गोळा केले जात आहेत.
राजकीय वर्तुळात खळबळ
घटना निवडणुकीच्या तोंडावर घडल्याने कोल्हापुरासह संपूर्ण राज्यात राजकीय चर्चा तापल्या आहेत. एका उमेदवाराच्या कुटुंबातील महिला केवळ निवडणूक खर्चासाठी आर्थिक मागणीच्या दबावाखाली आत्महत्या करते, ही बाब गंभीर मानली जात आहे. महिलांवरील आर्थिक व मानसिक छळाच्या वाढत्या घटनांवर पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून पोलिसांकडून संबंधित आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
Parth Pawar Land Scam: मुद्रांक शुल्क भरण्यासाठी दिलेली मुदत संपली; अमेडिया कंपनीने थेट कायदेशीर…
Ans: कोल्हापूर
Ans: कौसर गरगरे.
Ans: निवडणुकी साठी