crime (फोटो सौजन्य: social media)
कोल्हापूर जिल्ह्यातील तळंदगे गावात नवजात अर्भक पुरल्याचा धक्कदायक प्रकार समोर आला आहे. हा अर्भक दोन ते अडीच महिन्याचं असलयाचे समोर आले आहे. हे अर्भक अनैतिक संबंधातून किंवा चाचणी केल्यानंतर गर्भपात करून पुरल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
Cyber Fraud : ज्येष्ठ नागरिकाला ऑनलाईन प्रेम पडलं महागात; सायबर चोरट्यांकडून ९ कोटींची फसवणूक
मिळालेल्या माहितीनुसार, धोंडिबा फडतरे यांच्या उसाच्या शेतात हा सर्व प्रकार घडला आहे. धोंडिबा फडतरे हे सकाळच्या सुमारास आपल्या शेतात गेले होते. तेव्हा त्यांना त्यांच्या उसाच्या शेतामध्ये खड्डा खणलेला दिसून आला. त्याचबरोबर खड्ड्याच्या शेजारी मिठाची पिशवी आणि इतर संशयास्पद साहित्य आढळून आले. हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर धोंडिबा फडतरेंना धक्काच बसला. यांनी या घटनेची माहिती पाटील गावचे पोलिस यांना दिली. त्यानुसार हुपरी पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी आणि अप्पर तहसीलदारांनी घटनास्थळाला भेट दिली.
नवजात अर्भक का पुरण्यात आला याचा कारण समोर आलेला नाही आहे. मात्र लिंग चाचणी केल्यानंतर गर्भपात करून पुरल्याचा संशय आहे, याशिवाय अनैतिक संबंधातून हा प्रकार घडला असावा अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे. दरम्यान पोलिसांकडून याबाबत अधिक तपास केला जात आहे.
आईशी सतत भांडतो म्हणून सख्ख्या भावानेच केली भावाची हत्या; भंडाऱ्यात एकच खळबळ
आईशी वारंवार भांडण करणाऱ्या थोरल्या भावाचा धाकट्या भावाने खून केला. या तरुणाने रागाच्या भरात हल्ला करून त्याचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. जिल्ह्यातील तुमसर शहरात घरगुती वाद घालत होता. त्यामुळे रोशनचा धाकटा भाऊ राकेश प्रकाश वासनिक याने आपल्या मित्र किरण उर्फ लारा मारबते याच्यासोबत मिळून हा अत्यंत गंभीर निर्णय घेतला.
विटांनी मारहाण करून हत्या केली. ही हत्या एका मित्राच्या मदतीने केली गेली असून, सुरुवातीला हा मृत्यू नैसर्गिक असल्याचे भासवण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र, पोलिसांनी तपासाची सखोल दिशा घेत या मृत्यूमागील क्रूर सत्य उघडकीस आणले. तुमसर शहरातील आंबाटोली परिसरात राहणारा रोशन प्रकाश वासनिक (वय ३५) हा काही दिवसांपासून मद्यधुंद अवस्थेत सतत आईशी वाद घालत होता. त्यामुळे रोशनचा धाकटा भाऊ राकेश प्रकाश वासनिक याने आपला मित्र किरण उर्फ लारा मारबते याच्यासोबत मिळून हा अत्यंत गंभीर प्रकार केला.
शवविच्छेदन अहवालातून गुन्हा झाला उघडकीस
आरोपी राकेश आणि किरण यांनी रोशनचा मृत्यू नैसर्गिक असल्याचा बनाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र, मृतदेहावर आढळलेल्या गंभीर जखमांमुळे पोलिसांना संशय आला. शवविच्छेदन अहवालात मारहाणीचे स्पष्ट पुरावे समोर आल्यावर तपास अधिकच खोलवर करण्यात आला. पोलिसांनी शंका घेऊन राकेश आणि किरण यांना ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान दोघांनी गुन्ह्याची कबुली दिली.