Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 13 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolhapur : लाच घेताना तलाठी सापडले रंगेहात; इचलकरंजीमध्ये कायदा सुव्यवस्ठा धाब्यावर

वारसा नौद करण्यास गट खुला करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना शहापुर येथील तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Nov 08, 2025 | 05:00 PM
Kolhapur : लाच घेताना तलाठी सापडले रंगेहात; इचलकरंजीमध्ये कायदा सुव्यवस्ठा धाब्यावर
Follow Us
Follow Us:
  • लाच घेताना तलाठी सापडले रंगेहात
  • इचलकरंजीमध्ये कायदा सुव्यवस्ठा धाब्यावर
  • नेमकं प्रकरण काय ?
इचलकरंजी : वारसा नौद करण्यास गट खुला करण्यासाठी १० हजार रुपयांची लाच स्विकारताना शहापुर येथील तलाठी आणि कोतवाल लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात रंगेहात सापडले. गणेश विष्णुपंत सोनवणे (वय ३२ रा. मगदुम कॉलनी जयसिंगपूर) असे तलाठ्याचे नाव असून नेताजी केशव पाटील (वय ४५ रा. म्हसोबा रोड दर्गा गल्ली शहापुर) असे कोतवालचे नाव आहे. स्टेशन रोडवरील गुरुचित्र मंदिर परिसरात ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरु होते.

तक्रारदाराने वारस नोंद करण्यासाठी शहापूर तलाठी कार्यालयात कागदपत्रे दिली होती. कागदोपत्री नाव नोंदणीसाठी तक्रारदार शहापूरचे तलाठी गणेश सोनवणे आणि कोतवाल नेताजी पाटील यांच्याकडे पाठपुरावा करत होते. या नोंदीसाठी गट नं. ७२९ हा ब्लॉक असलेला गट खुला करण्यासाठी कोतवाल पाटील याने तलाठी सोनवणे यांच्यासाठी २५ हजार रुपये लाचेची मागणी केली होती. तडजोडीअंती तक्रारदाराने सुरुवातीला १० हजार रुपये आणि काम झाल्यानंतर उर्वरित रक्कम देण्याचे ठरले होते. तर लाच मागितल्याबद्दल तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पोर्टलवर ३ नोव्हेंबर रोजी तक्रार नोंदवली होती. त्या अनुषंगाने कोल्हापुर लाचलुचपत विभागाच्या पथकाने दोन दिवसांपूर्वी तलाठी कार्यालयात शहानिशा केली होती. गुरुवारी स्टेशन रोडवरील गुरु चित्रमंदिर नजीकच्या चहा टपरीवर तक्रारदाराकडुन १० हजाराची लाच स्वीकारताना तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांना पथकाने रंगेहात पकडले.

भीषण दुर्घटना! तुर्कीच्या परफ्यूम कारखान्यात लागली आग; सहा जणांचा होरपळून मृत्यू, VIDEO

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या उपअधिक्षक वैष्णवी पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली केलेल्या या कारवाईत पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप, सुधील पाटील, कृष्णा पाटील, प्रकाश चौगुले सहभागी झाले होते.

दोघांच्या घरांची घेतली झडती

दरम्यान, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवाईनंतर तलाठी सोनवणे आणि कोतवाल पाटील या दोघांच्याही घरांची झाडाझडती घेतल्याचे सांगण्यात आले. दोन्ही संशयितांना शिवाजीनगर पोलिस ठाण्यात आणल्यानंतर हातकणंगले आणि शिरोळ तालुक्यातील गावातील तलाठी आणि संघटनेचे पदाधिकाऱ्यांनी पोलिस ठाण्याच्या आवारात गर्दी केली होती.

Demonetization: 9 वर्षापूर्वी PM Modi यांनी केली अशी घोषणा, देशभरात भूकंप; बँकांसमोरील रांगा थांबेना!

Web Title: Kolhapur talathi caught red handed while taking bribe law and order situation in ichalkaranji at risk

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 08, 2025 | 05:00 PM

Topics:  

  • Ichalkaranji
  • kolhapur
  • maharashtra news

संबंधित बातम्या

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक
1

Satara News: रस्ते खड्ड्यात अन् टोलवसुली सुरूच!; साताऱ्यात १९ ज्येष्ठ नागरिक संघटना आक्रमक

मराठ्यांच्या वाटेला जाल तर जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील
2

मराठ्यांच्या वाटेला जाल तर जिंदगीत यशस्वी होऊ देणार नाही – मनोज जरांगे पाटील

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !
3

Satara News : गोडोलीत पालिकेचा हातोडा; रस्त्यावरील १५ फलक हटविले !

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक
4

Pune Crime: पुण्यात खळबळ! भाचा गेला, सून माहेरी निघून गेली… मामाच्या मनात पेटला संताप, पुढे घडलं धक्कादायक

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.