Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Kolkata Case : ‘ती ओरडत होती म्हणून तिचा…’, त्या रात्री महिला डॉक्टरची हत्या कशी झाली? आरोपी संजय रॉयची संतापजनक कबुली

कोलकाता येथील आरजी कार हॉस्पिटलमधील अत्याचार आणि हत्या प्रकरणानंतर संपूर्ण देश हादरून गेला. ९ ऑगस्ट रोजी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडला होता. याहत्येचा आरोप संजय रॉयवर आहे. त्यानेच अत्याचार करुन हत्या केल्याची कबुली दिली आहे.

  • By श्वेता झगडे
Updated On: Aug 27, 2024 | 01:26 PM
त्या रात्री महिला डॉक्टरची हत्या कशी झाली? आरोपी संजय रॉयची संतापजनक कबुली

त्या रात्री महिला डॉक्टरची हत्या कशी झाली? आरोपी संजय रॉयची संतापजनक कबुली

Follow Us
Close
Follow Us:

कोलकात्याच्या आरजी कार हॉस्पिटलमध्ये ९ ऑगस्टच्या रात्री आरजी कर रुग्णालयात एका प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर आत्याचार करून तिची हत्या करण्यात आली. या घटनेने संपूर्ण देशात खळबळ उडाली. या प्रकरणात सीबीआय तपास करत असून आतापर्यंत सात लोकांची पॉलीग्राफ टेस्ट करण्यात आली आहे. या टेस्टमध्ये आरोपी संजय रॉयने गुन्ह्याची कबुली दिली आहे. आरोपी संजय रॉयने सीबीआयच्या चौकशीदरम्यान प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरची हत्या केल्याची कबुली दिली आहे. महिला डॉक्टर सतत ओरडत असल्याने तिच्यावर अत्याचार करून तिची हत्या करण्यात आल्याची आरोपी संजय रॉयने कबुली दिली. प्रत्यक्षात ९ ऑगस्ट रोजी आरजी कार हॉस्पिटलच्या सेमिनार हॉलमध्ये प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह आढळून आला होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये तिच्यावर अत्याचार झाल्याची पुष्टी झाली.

मिळालेल्या माहितीनुसार, ‘ट्रेनी महिला डॉक्टर सतत ओरडत होती, त्यामुळे मी तिचा गळा दाबला आणि ती मरेपर्यंत घट्ट धरून ठेवला’, असे सूत्रांचे म्हणणे आहे. त्यामुळे पीडितेला त्याच्या हातातून स्वत:चा बचाव करता आला नाही. आणि याच कारणामुळे संजय रॉय पीडितेचा मृत्यू होईपर्यंत गळा दाबत राहिला. पीडितेनेही तिच्या बचावासाठी आवाज उठवला. ती किंचाळत होती. संजय रॉय पकडले जाण्याची भीती होती. यामुळेच त्याने हाताच्या जोरावर पीडितेचा गळा दाबून खून केला.

हे सुद्धा वाचा: धक्कादायक ! कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर अत्याचार; मुलगी खेळता खेळता घरात आली अन् नराधमाने…

संजयची पॉलीग्राफ चाचणी

सुत्रांनी सांगितले की, आरोपी संजय रॉयने त्याच्या वैद्यकीय चाचणीतही हे उघड केले होते. आरजी कार मेडिकल कॉलेजमधील प्रशिक्षणार्थी डॉक्टरवर अत्याचार करून हत्या केल्याप्रकरणी संजय रॉय हा मुख्य आरोपी आहे. कोलकात्याच्या प्रेसिडेन्सी जेलमध्ये संजय रॉय यांची ‘पॉलीग्राफ टेस्ट’ करण्यात आली. संजय रॉय यांना तिथेच बंदिस्त करण्यात आले आहे. ‘पॉलिग्राफ टेस्ट’ दरम्यान, एखादी व्यक्ती प्रश्नांची उत्तरे देत असताना, त्याच्या शारीरिक प्रतिक्रियांचे मोजमाप मशीनच्या मदतीने केले जाते आणि तो खरे बोलतो की खोटे बोलतो हे कळते. सीबीआयने रॉय आणि घोष यांच्यासह सात जणांची ‘लाय डिटेक्टर चाचणी’ करण्याची परवानगी न्यायालयाकडून घेतली आहे. चाचणी दरम्यान ही चाचणी पुरावा म्हणून वापरली जाऊ शकत नाही परंतु त्याचे परिणाम पुढील तपासासाठी एजन्सीला दिशा देईल.

संजय रॉय यांना कधी आणि कशी अटक करण्यात आली?

मेडिकल कॉलेजच्या सेमिनार हॉलमध्ये 31 वर्षीय प्रशिक्षणार्थी महिला डॉक्टरचा मृतदेह सापडल्यानंतर 10 ऑगस्ट रोजी कोलकाता पोलिसांनी संजय रॉयला अटक केली होती. प्रशिक्षणार्थी डॉक्टरच्या मृतदेहाजवळ सीसीटीव्ही फुटेज आणि एक ब्लूटूथ डिव्हाइस आढळल्यानंतर रॉय यांना अटक करण्यात आली, सकाळी 4 वाजताच्या सुमारास मृतदेह सापडलेल्या महाविद्यालयाच्या सेमिनार हॉलमध्ये प्रवेश करताना दिसला होता. त्याच वेळी, आरजी कार हॉस्पिटल प्रकरणात, सीबीआयने सध्या सर्व 7 लोकांच्या पॉलीग्राफ चाचण्या पूर्ण केल्या आहेत. एकीकडे सीबीआय रुग्णालयाचे माजी प्राचार्य संदीप घोष यांच्याविरुद्ध संजय रॉय यांच्या संबंधाचा तपास करत असताना दुसरीकडे भ्रष्टाचार प्रकरणाचाही तपास करत आहे.

हे सुद्धा वाचा:  ‘तू माझ्याशी बोलत जा, मला…’ असे म्हणत एकाने 13 वर्षीय मुलीवर केली बळजबरी

दरम्यान, संजय रॉय 2019 पासून कोलकाता पोलिसांमध्ये नागरी स्वयंसेवक म्हणून काम करत होता. संजय रॉय गेल्या काही वर्षांत काही वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांशी जवळीक साधत होता, त्यानंतर त्यांचा कोलकाता पोलिस कल्याण मंडळात समावेश करण्यात आला आणि मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलच्या पोलिस चौकीत आरजी म्हणून नियुक्त करण्यात आले. सुरुवातीला त्यांनी आपल्यावरील आरोप फेटाळून लावले होते. कोलकात्याच्या सरकारी आरजी कार मेडिकल कॉलेज आणि हॉस्पिटलमध्ये ९ ऑगस्ट रोजी डॉक्टरचा मृतदेह सापडला होता, ज्यावर गंभीर जखमांच्या खुणा होत्या. या घटनेच्या विरोधात देशभरात निदर्शने होत आहेत. कोलकाता उच्च न्यायालयाने १३ ऑगस्ट रोजी या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला होता आणि दुसऱ्या दिवशी केंद्रीय एजन्सीने कोलकाता पोलिसांकडून तपास ताब्यात घेतला.

Web Title: Kolkata doctor case i strangled her because she was screaming accused sanjay roys shocking revelations

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 27, 2024 | 01:25 PM

Topics:  

  • crime news
  • Kolkata doctor case

संबंधित बातम्या

सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक; वारसा हक्कातील मालमत्ता बेकायदेशीररित्या केली हस्तगत
1

सख्ख्या भावानेच केली बहिणीची फसवणूक; वारसा हक्कातील मालमत्ता बेकायदेशीररित्या केली हस्तगत

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले
2

चरस विक्री करणाऱ्या रेकॉर्डवरील गुन्हेगाराला ठोकल्या बेड्या; ‘या’ भागात सापळा रचून पकडले

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन
3

आर्थिक विवंचनेतून शेतकऱ्याची आत्महत्या; गळफास घेऊन संपवलं जीवन

मामेभावाशी बोलल्याने विवाहितेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण; पतीने पत्नीला बेल्टने…
4

मामेभावाशी बोलल्याने विवाहितेला सासरच्या मंडळींकडून बेदम मारहाण; पतीने पत्नीला बेल्टने…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.