crime (फोटो सौजन्य: social media )
पुण्यातून सतत गुन्हेगारी घटना समोर येत आहे. किरकोळ कारणावरून हत्या, हाणामारी, कोयत्याने दहशत माजवल्याचा प्रकार समोर येत आहे. आता पुन्हा एकदा किरकोळ कारणावरून कोयते उपसत तरुणांनी दहशत माजवल्याचा प्रकार समोर आला आहे. आम्हीच इथले भाई म्हणत तरुणांच्या जमावाने 10-12 गाड्या देखील फोडले आहे. या प्रकरणाने मोठी खळबळ उडाली आहे.
नेमकं काय घडलं?
पुण्यतील भवानी पेठ परिसरात किरकोळ कारणावरून काही तरुणांनी हातात कोयते आणि तलवारी घेत परिसरात हिंसाचार घडवून आणला आहे. या तरुणांनी थेट रस्त्यावर जळवळपास 10 ते 12 दुचाकी आणि चारचाकी वाहनांची तोडफोड करत दहशहत माजवली आहे. याघटनेचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. “आम्हीच इथले भाई, आमच्या नादी कोणी लागू नये” असे व्हिडिओमध्ये हे तरुण म्हणत आहे. या दहशतीमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दोन गटांमध्ये किरकोळ वाद झाला होता. मात्र हा वाद काही तासात विकोपाला गेला. या वादाला हिंसक वळण आल्यावर मध्यरात्रीच्या सुमारास या तरुणांनी जमाव करून हातात धारधार शस्त्र घेऊन परिसरात दहशत निर्माण केली. त्यांनी रस्त्यावर उभ्या असलेल्या अनेक वाहनांवर जोरदार हल्ला चढवत तोडफोड केली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. या प्रकरणामुळे भवानी पेठ परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी परिसरात बंदोबस्त वाढवून नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे.
दरम्यान पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका पोलीस कर्मचार्याने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. पुणे वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लोहगाव भागात घडली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२, रा. डी वाय पाटील काॅलेजजवळ, धानोरी, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे.
गायकवाड हे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात नियुक्तीस होते. शनिवारी (१९ जुलै) गायकवाड यांची साप्ताहिक सुटी होती. त्यांची पत्नी दौंडला गेली होती. त्यांना १२ आणि १४ वर्षांची दोन मुले आहेत. मुले सकाळी शाळेत गेली होती. सकाळी त्यांच्या पत्नीने मोबाइल क्रमांकावर संपर्क साधला. तेव्हा त्यांनी प्रतिसाद दिला नाही. मुले दुपारी शाळेतून घरी आले. तेव्हा घराचा दरवाजा आतून बंद होता. मुलांनी दरवाजा वाजविला. मात्र, त्यांनी प्रतिसाद दिला नाही. त्यांनी शेजाऱ्यांना या घटनेची माहिती दिली.
दरवाजा वाजवूनही त्यांनी प्रतिसाद न दिल्याने शेजाऱ्यांनी या घटनेची माहिती विमानतळ पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली. पोलिसांनी दरवाजा उघडला. तेव्हा गायकवाड यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे उघडकीस आले. गायकवाड यांच्या आत्महत्येमागचे निश्चित कारण समजू शकले नाही. पोलिसांनी घटनास्थळाची पाहणी केली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
Crime News : पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्यांचा डाव फसला; दोघांना ठोकल्या बेड्या