मुंबई उपनगरातील मानखुर्द येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका ११ वर्षीय मुलाच्या अंगावर एका विकृत व्यक्तीने पिटबुल कुत्रा सोडल्याची घटना समोर आली आहे. या कुत्र्याने मुलाच्या हनुवटीच्या चावा घेतल्यामुळे तो जखमी झाला. विकृत व्यक्तीने केवळ आनंद मिळवण्यासाठी असे केल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या घटनेचा व्हिडीओ देखील विकृत व्यक्तीने बनवले असल्याचे समोर आले आहे.
राज्य उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; पाटस टोल नाक्यावर लाखोंचा मद्यसाठा केला जप्त
नेमकं काय घडलं?
जखमी झालेल्या ११ वर्षीय मुलाचे नाव हमजा खान असे आहे. हमजा खान हा एका रिक्षात खेळात होता. तेव्हा तिथे सोहेल खान (वय 43) तिथे त्याचा पिटबुल जातीचा कुत्रा घेऊन आला. त्याने पिटबुल कुत्रा हमजाच्या अंगावर सोडला. या कुत्र्याने हमजाच्या मानेला आणि हनुवटीला चावा घेतला. हमजा रिक्षातून पळल्यावर सोहेलने हा कुत्रा त्याच्या मागे सोडला. कुत्र्याने या मुलाला ठिकठिकाणी चावा घेतला. मुलगा भयभीत झाला. एवढे सगळे झाल्यावर सोहेलने त्याला दूर करण्याऐवजी सोहेल जोरजोरात हसू लागला आणि याचा व्हिडीओ देखील बनवला.
यांनतर मुलाने या सर्व प्रकरणाबाबत त्याच्या वडिलांना माहिती दिली तेव्हा त्यांनी मानखुर्द पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.मानखुर्द पोलीस स्टेशनमध्ये मोहम्मद सोहेल हसन खान याच्याविरोधात बीएनएसच्या कलम 35 (3) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहम्मद सौहेल हसन खान हा तिथलाच स्थानिक रहिवासी असून एसी दुरुस्तीचे काम करतो.
पीडित मुलाने सांगितली आपबिती
हमजा खान याने पोलिसांना सांगितले की, आम्ही खेळत होतो, तेव्हा तो पिटबुल घेऊन आला. सगळे जण घाबरून पळाले, पण मी अडकलो. कुत्रा मला चावला, माझे कपडेही फाटले. माझ्यावर कुत्र्याने हल्ला केला तेव्हा मोहम्मद सोहेल हसत होता.
बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची धाड, भिवंडीतील धक्कदायक प्रकार समोर
दरम्यान, भिवंडीतून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. अमूल बटरचे बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड झाला आहे. अमूल बटर बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. तिथे दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने शांतीनगर पोलिसांच्या मदतीने गुरुवारी १७ जुलैला करण्यात आली.
मिळालेल्या माहितीनुसार, भिवंडी शहरामध्ये बनावट अमूल बटरचे उत्पादन चालू असल्याची गोपनीय माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त संतोष सिरोसिया यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली अन्न सुरक्षा अधिकारी शुभांगी करणे यांनी शांतीनगर पोलीस ठाण्यातील पोलीस उपनिरीक्षक काळू गवारे व पथकातील पोलिसांसह नागाव भागातील भुसावळ कंपाऊंड, कासिमपुरा एका कारखान्यावर धाड टाकली.
Crime News : पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्यांचा डाव फसला; दोघांना ठोकल्या बेड्या