Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Krishna Janmashtami 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News : पुण्यात कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत; वाहनांची तोडफोड केली अन्…

गुन्हेगारांकडून वाहनांचे खळखट्याकचे प्रकार सुरूच असून, लोहगावनंतर आता धनकवडीत कोयतेधारी टोळक्याने कार तसेच दुचाकींची तोडफोड करून दहशत माजवली.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jan 03, 2025 | 04:17 PM
Crime News : पुण्यात कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत; वाहनांची तोडफोड केली अन्...

Crime News : पुण्यात कोयता गँगची पुन्हा एकदा दहशत; वाहनांची तोडफोड केली अन्...

Follow Us
Close
Follow Us:

पुणे : पुणे शहरात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. शहरात गुन्हेगारांकडून वाहनांचे खळखट्याकचे प्रकार सुरूच असून, लोहगावनंतर आता धनकवडीत कोयतेधारी टोळक्याने कार तसेच दुचाकींची तोडफोड करून दहशत माजवली. गेल्या काही दिवसांपासून सातत्याने वाहन तोडफोडीच्या घटना घडत असून, यामध्ये सर्व सामान्य नागरिक भरडले जात आहेत.

याप्रकरणी सहकारनगर पोलिसांनी टोळक्यावर गुन्हा दाखल केला असून, प्रकरणात साहिल दुधाणेला अटक केली आहे. तर त्याच्या साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पियुष मोहन चव्हाण (वय २०, रा. ओम शिवशंभो हाईट्स, मोहननगर, धनकवडी) यांनी सहकारनगर पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार, दुधाणे याच्याशी चव्हाणचा वाद झाला होता. त्याचा राग दुधाणे याच्या मनात होता. बुधवारी रात्री आरोपी दुधाणे आणि साथीदारांनी चव्हाणला धनकवडी परिसरात अडवले. चव्हाण आणि त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांना कोयत्याचा धाक दाखविला. मला धनकवडीचा भाई म्हणतात, असे सांगून त्याने त्यांच्यावर कोयते उगारले. त्यांना जिवे मारण्याची धमकी दिली. आरोपींनी धनकवडीतील बसथांब्याजवळ रस्त्यावर लावलेल्या चार कारच्या काचा फोडल्या, तसेच दोन दुचाकींची तोडफोड केली. चव्हाण याला धमकावून आरोपी कारमधून पसार झाले. या घटनेची माहिती मिळतात वरिष्ठ निरीक्षक छगन कापसे यांनी घटनास्थळी भेट दिली. हवालदार चव्हाण अधिक तपास करत आहेत.

हे सुद्धा वाचा : पुणे हादरलं! तिघांवर कोयत्याने सपासप वार; कारणही आलं समोर

जेलमधून बाहेर आला अन् तिघांना तोडला

पुण्यात गुन्हेगारीचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. पुण्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज गुन्हेगारीच्या घटना उघडकीस येत असतात. टोळक्यांकडून वाहनांची तोडफोड व दहशत माजविण्याच्या घटना घडू लागल्या आहेत. अशातचं गेल्या काही दिवसाखाली कारागृहात राहून आलेल्या सराईत गुन्हेगार व त्याच्या साथीदारांनी तीन तरुणांवर किरकोळ वादातून तीक्ष्ण शस्त्राने वार करून त्यांना जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना मुंढवा परिसरात घडली. एक महिन्यापुर्वीच सराईत कारागृहातून बाहेर आला होता. याप्रकरणी मुंढवा पोलीस ठाण्यात महेश गजसिंह उर्फ दाद्या उर्फ डी याच्यासह दोन ते तीन अनोळखी साथीदारांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. या हल्यात अजय हनुमंत पवार (वय ३१), अमित राजेश परदेशी (वय २६) व सोहेश अलमले (वय २६) हे तिघे जखमी झाले आहेत. याबाबत तुषार मेमाणे (वय २८) यांनी तक्रार दिली आहे.

Web Title: Koyta gang has vandalized vehicles in dhankavadi in pune nrdm

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 03, 2025 | 04:17 PM

Topics:  

  • crime news
  • maharashtra
  • Pune Crime

संबंधित बातम्या

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना गोंदियात अटक; कोयत्यासह धारदार शस्त्रही जप्त
1

दरोड्याच्या तयारीत असलेल्या तरुणांना गोंदियात अटक; कोयत्यासह धारदार शस्त्रही जप्त

चौकशीबद्दल कोणाशी बोलू नकोस, अन्यथा…; अमेरिकेतील भारतीयाला 45 लाखांना घातला गंडा
2

चौकशीबद्दल कोणाशी बोलू नकोस, अन्यथा…; अमेरिकेतील भारतीयाला 45 लाखांना घातला गंडा

अमली पदार्थ तस्करांच्या आवळल्या मुसक्या, तब्बल 76 लाखांचे मेफेड्रॉन जप्त; वाघोलीत पोलिसांची मोठी कारवाई
3

अमली पदार्थ तस्करांच्या आवळल्या मुसक्या, तब्बल 76 लाखांचे मेफेड्रॉन जप्त; वाघोलीत पोलिसांची मोठी कारवाई

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ
4

पत्नीच्या विवाहबाह्य संबंधाला कंटाळून एका नेत्याने संपवले आयुष्य, आत्महत्या करण्यापूर्वी बनवले व्हिडीओ

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.