latur Crime News:
latur Crime News: लातूरमधून धक्कादायक प्रकरण उघडकीस आले आहे. प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध झाल्याने एका नर्स महिलेने आणि एमपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाने एकत्रित आत्महत्या केली. ही धक्कादायक घटना पेठ गावच्या शिवारात घडली. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. मृतांचे नाव नितीन दराडे आणि राणी दराडे असून, दोघेही दरडवाडी, ता. आंबेजोगाई, जि. बीड येथील रहिवासी होते. या प्रकरणाची सखोल तपासणी लातूर पोलिस करत आहेत आणि मृत्यूच्या कारणांचा अधिकृत अहवाल लवकरच समोर येण्याची अपेक्षा आहे.
Good News: मुलगा झाला हो! परिणीती चोप्रा झाली आई, राघव चढ्ढाने शेअर केली आनंदाची बातमी
प्रेमसंबंधांना घरच्यांचा विरोध झाल्याने एका नर्स आणि एमपीएससीची तयारी करणाऱ्या अपंग तरुणाने एकत्र आत्महत्या केल्याची हृदयद्रावक घटना लातूर जिल्ह्यात घडली आहे. “कायमचं एकत्र राहण्यासाठी” असे ठरवून जोडप्याने घेतलेले हे टोकाचे पाऊल परिसरातील लोकांसह सर्वांना हादरवून सोडले आहे. माहितीनुसार, पत्र्याच्या एका खोलीत तरुणाने गळफास घेत आपले जीवन संपवले, तर त्याच खोलीत नर्स तरुणीनेही गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नितीन दराडे हा शारीरिकदृष्ट्या अपंग असून मागील दोन ते तीन वर्षांपासून एमपीएससी परीक्षेची तयारी करत होता. तो अहमदपूर येथे राहून अभ्यास करत होता. तर राणी दराडे ही व्यवसायाने नर्स असून लातूर येथील खासगी रुग्णालयात कार्यरत होती. दोघांची ओळख पूर्वीपासून होती आणि ओळखीचं नातं हळूहळू प्रेमात रूपांतरित झाले. मात्र, त्यांच्या प्रेमसंबंधांना दोन्ही कुटुंबीयांनी विरोध दर्शवला. घरच्यांच्या विरोधामुळे मानसिक ताणाखाली आलेल्या या जोडप्याने टोकाचा निर्णय घेऊन आपली जीवनयात्रा संपवली, अशी प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली आहे.
स्थानिक नागरिकांनी पोलिसांना या घटनेची माहिती दिल्यानंतर लातूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पथक आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी (पोस्टमार्टेमसाठी) लातूर जिल्हा रुग्णालयात पाठवले आहेत.
या घटनेमुळे दरडवाडी गावासह संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. दोघेही शिक्षित आणि स्वतःच्या पायावर उभे राहण्याचा प्रयत्न करणारे तरुण होते. नितीनने शारीरिक अपंगत्वावर मात करून स्पर्धा परीक्षांची तयारी केली होती, तर राणीने वैद्यकीय क्षेत्रात स्वतःचं स्थान निर्माण केलं होतं. मात्र समाजातील दडपण आणि घरच्यांच्या विरोधामुळे त्यांनी घेतलेल्या या निर्णयाने गावकऱ्यांसह कुटुंबीय सुन्न झाले आहेत.