भारतीय रेल्वेचा प्रवास ठरतोय किळसवाणा! वापरलेल्या डिस्पोजेबल प्लेट्स धुवूृन पुन्हा त्यातच जेवण? VIDEO VIRAL (फोटो सौजन्य: सोशल मीडिया)
Shocking Viral Video : अनेकदा लांबच्या प्रवासात रेल्वे किंवा ट्रेनने सफर करताना आपण लांबच्या प्रवासादरम्यान खायला खरेदी करतो. पण गेल्या काही काळात हे अन्न आता सुरक्षित राहिलेले नाही. याचे अनेक धक्कादायक असे व्हिडिओ समोर येत आहे. विशेष करुन भारतीय रेल्वे प्रवासादरम्यान लोकांना खाण्यासाठी घेतलेल्या अन्न-पदार्थांबाबत भयावह अनुभव आले आहे. कधी रेल्वेच्या अन्नामध्ये किडे सापडत आहेत, तर कधी रेल्वे भेळ विकणारे कांदा, टोमॅटो वैगेरे रेल्वेच्या जमिनीवर कापताना दिसत आहेत.
सध्या असाच एक व्हिडिओ व्हायरल होत आहे. रेल्वेच्या केटरिंगचा एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. एक कर्मचारी डस्टबिनमध्ये टाकलेले डिस्पोजेबल प्लेट्स उचलून धुवून त्यांचा पुन्हा वापर करताना दिसत आहे. अमृत भारत एक्सप्रेसमध्ये ही घटना घडली आहे. एका प्रवाशाना याचा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. लोकांना यावर तीव्र संताप व्यक्त करत संबंधित व्यक्तींवर कारवाईची मागणी केली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, कटनीहून सतनाला जाणाऱ्या अमृत भारच एक्सप्रेसमध्ये ही घटवा घडली. व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, डस्टिबनमध्ये पडलेले डिस्पोजेबल प्लेट्स आणि अन्नाचे बॉक्स धुतले जात आहे. त्यानंतर त्यांना वाळूवन ठेवले जात आहे. व्हिडिओ शेअर करणाऱ्याने हे प्लेट्स आणि बॉक्समध्ये पुन्हा अन्न भरले जात असल्याचे म्हटले आहे. त्याने पॅन्ट्री कर्मचाऱ्यांना याबद्दल विचारले तेव्हा त्यांच्या प्रतिक्रिया ऐकूनही अनेकांना धक्का बसला आहे. पॅन्ट्री कर्मचाऱ्याने डिस्पोजेबल सामान अर्ध्या किमतीत परत केले जाते, यामुळे के धुवून वापरले जात असल्यातचे म्हटले आहे.
व्हायरल व्हिडिओ
अमृत भारत एक्सप्रेस की एक और अजूबा कारनामा देखिये
यही तो भारतीय रेल की खूबसूरती है pic.twitter.com/6ZH0m21Sh8 — खुरपेंच का चाचा 🦧 (@chaudharysabg) October 19, 2025
नेटकऱ्यांच्या प्रतिक्रिया
या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर सर्वत्र व्हायरल होत आहे. लोकांनी यावर संताप व्यक्त करत कर्मचाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. अनेकांनी लोकांना रेल्वेमधील अन्न न खाण्याचा सल्ला दिला आहे. तसेच रेल्वे प्रशासानच्या कामकाजावरही टीका केला जात आहे. एका नेटकऱ्याने पंतपप्रधानांविरोधात केस दाखल करुन, त्यांना जाब विचारा असे म्हटले आहे. सध्या या घटनेवर सोशल मीडियावर संतापाची लाट उसळली आहे.
टीप – हे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून आम्ही वाचकांना काय योग्य आणि काय अयोग्य हे दाखविण्यासाठी लेख देत असतो. कोणत्याही प्रकारे अशा व्हिडिओबाबत आमचे मत आम्ही मांडत नाही वा आमचा कोणताही दावा नाही.