crime (फोटो सौजन्य: social media)
लातूर: लातूरमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. फेसबुक लाईव्ह करत एका तरुणाने छातीत सुरा खुपसून घेऊन आत्महत्या केली. या घटनेने लातूर जिल्हा हादरला आहे. या तरुणाने आत्महत्या का केली? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही आहे. आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव भरत बालाजी सागावे (वय ३२) असे आहे. भरत हा लातूर जिल्ह्यातील अंबुलगा येथील रहिवासी असल्याचे सांगण्यात येत आहे.
याप्रकरणाची सविस्तर माहिती अशी की, लातूर जिल्ह्यातील भरत नावाच्या तरुणाने फेसबुक लाईव्हवर आत्महत्या करत असल्याचे सांगत स्वतःच्या छातीत सुरा खुपसून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली.
भरत हा अनेक वर्षांपासून मुंबईत वास्तव्यास होता. ९ ऑगस्ट रोजी दुपारी १२.३० च्या सुमारास तो निलंगा शहरातील लांबोटकर पेट्रोल पंपाजवळ आंब्याच्या झाडाखाली बसून फेसबुक लाईव्ह करत होता. “मी आत्महत्या करत आहे” असे सांगत त्याने काही वेळानंतर छातीत सुरा खुपसला. नातेवाईकांनी फोन करून समजवण्याचा प्रयत्न केला, मात्र त्याने फोन बंद करून टाकला होता.
त्याचा शोध घेतल्यानंतर तो पेट्रोल पंपाजवळ रक्ताच्या थारोळ्यात जखमी अवस्थेत सापडला आहे. त्याला तात्काळ लातूरमधील सह्याद्री हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. परंतु उपचार सुरु असतांनाच काही वेळात त्याचा मृत्यू झाला आहे.
भंडारा हादरलं! दोन गटात अस्तित्वाच्या लढाईतून धारधार शस्त्राने दोघांची हत्या
भंडाऱ्यातून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. भंडाऱ्यामध्ये दोन गटात अस्तित्वाची लढाई सुरु होती. त्यातून शनिवारी (९ ऑगस्ट) दोघांवर धारधार शस्त्राने हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आल्याचे समोर आले आहे. ही घटना भंडाऱ्यात रात्री ९ वाजताच्या सुमारास घडली आहे. गेल्या काही वर्षांपासून ही लढाई सुरु होती. हत्या झालेल्या व्यक्तींची नावे वसीम उर्फ टिंकू खान (35) आणि शशांक गजभिये (30) असे मृतांची नवे आहेत.
हल्ला करणारे हे तीन ते चार हल्लेखोर होते. टिंकू खान हे त्यांच्या मुस्लिम लायब्ररीतून चौकातील कार्यालयात बसले असतांना हल्लेखोरांशी वाद झाला. त्यातूनच ही हत्या घडल्याची माहिती समोर येत आहे. टिंकू खान आणि हल्लेखोरांमध्ये गेल्या काही वर्षांपासून भंडाऱ्यात वाद सुरु होता. यातूनच ही १हत्या घडल्याचं बोलल्या जात आहे.
‘तू मला दारू पाजली नाही’ असे म्हणत तरुणावर चाकूने वार; वर्ध्यातील धक्कादायक घटना