जम्मू काश्मीरमध्ये दहशदवादी हल्ला करुन अशांतता निर्माण करण्यात आली आहे. पहलगाम भागात भीषण दहशतवादी हल्ला करण्यात आला आहे. या हल्ल्यात हिंदू पर्यटकांना लक्ष्य करण्यात आले. यामध्ये आतापर्यंत 28 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये सहा महाराष्ट्रातील पर्यटकांचा समावेश आहे. या घटनेचे तीव्र पडसाद आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील पडत आहेत. यानंतर पाकिस्तानचा बदला घेण्याची मागणी देशभरातून होत आहे. संताप व्यक्त केला जात आहे. भारताने चांगलीच आक्रमक भूमिका घेतली आहे. अशातचं आता बिश्नोई गँग सुद्धा मैदानात उतरली आहे. त्यांनी पाकिस्तानमध्ये एका व्यक्तीचा गेम करणार असल्याची थेट धमकी पाकिस्तानला दिली आहे.
कुख्यात लॉरेन्स बिश्नोई गँगने जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या हल्ल्याचा बदला घेण्याची धमकी पाकिस्तानला दिली आहे. याविषयीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. निष्पाप आणि निरपराध लोकांच्या हत्येचा बदल घेणार असल्याचे गँगने स्पष्ट केले आहे. पाकिस्तानमध्ये घुसून एकाच व्यक्तीला उडवणार असल्याचे गँगने स्पष्ट केले आहे. ही व्यक्ती ठार होताच पाकिस्तानला आतापर्यंतचा सर्वात मोठा झटका बसणार असल्याचे पोस्टमध्ये म्हटले आहे.
पाकिस्तानमध्ये कुणाचा होणार गेम?
या पोस्टमध्ये दहशतवादी संघटना लष्कर-ए-तैयबाचा म्होरक्या आणि दहशतवाद्यांचा आका हाफिज सईद याचा फोटो लावण्यात आला आहे. त्याच्या चेहर्यावर क्रॉस असे चिन्हं आहे. त्याचा अर्थ हाफिजला ठार करणार असल्याचा दावा बिश्नोई गँगने केला आहे. ही पोस्ट व्हायरल झाली आहे. भारतात अनेक गुन्हेगारी घटना करणाऱ्या बिश्नोई गँगने आता पाकिस्तानात मोर्चा वळवला आहे. पाकिस्तानमध्ये सुद्धा या पोस्टची चर्चा होत आहे.