Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 20 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • CJP |
  • Ind vs WI |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

RMS CET 2026: राष्ट्रीय मिलिट्री स्कूल प्रवेशासाठी अर्ज करण्याची आज शेवटची संधी; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!

RMS CET 2026: राष्ट्रीय मिलिट्री स्कूल (RMS CET 2026) प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे. पात्रता, वयोमर्यादा आणि ऑनलाईन अर्ज प्रक्रिया जाणून घ्या सविस्तर..

  • By श्रेया देशमुख
Updated On: Oct 20, 2026 | 08:21 AM
Image

Image

Follow Us
Follow Us:

RMS CET 2026:  जर तुम्हालाही तुमच्या मुलांचे राष्ट्रीय मिलिट्री स्कूल्समध्ये (RMS) शैक्षणिक सत्र २०२७-२८ साठी इयत्ता ६ वी किंवा इयत्ता ९ वी मध्ये प्रवेश मिळवून द्यायचा असेल, तर ही तुमच्यासाठी शेवटची संधी ठरू शकते. वास्तविक, NTA नुसार कॉमन एन्ट्रन्स टेस्ट २०२६ द्वारे होणाऱ्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाइन अर्ज भरण्याची अंतिम तारीख जवळ आली आहे.

या परीक्षेसाठीचे ऑनलाइन अर्ज उद्या म्हणजेच २० ऑक्टोबरपर्यंत भरले जातील. त्यानंतर लेट फीसह अर्ज भरता येतील. अशा परिस्थितीत, जर तुम्हाला तुमच्या मुलांचे प्रवेश राष्ट्रीय मिलिट्री स्कूल्समध्ये करायचे असतील, तर लवकरात लवकर अधिकृत पोर्टलवर जाऊन अर्ज करून घ्या.

RMS CET २०२६ साठी पात्रता

इयत्ता ६ वी मधील प्रवेशासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे इयत्ता ५ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे किंवा मूल इयत्ता ५ वी मध्ये शिकत असावे. तथापि, त्यांना राष्ट्रीय मिलिट्री स्कूलमधील प्रवेशाच्या तारखेपूर्वी इयत्ता ५ वी उत्तीर्ण करणे बंधनकारक आहे. दुसरीकडे, इयत्ता ९ वी मधील प्रवेशासाठी उमेदवारांचे प्रवेशाच्या तारखेपूर्वी कोणत्याही सरकारी किंवा मान्यताप्राप्त शाळेतून इयत्ता ८ वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. इयत्ता ९ वी मध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या उमेदवाराला इंग्रजीचे ज्ञान असणे गरजेचे आहे, कारण राष्ट्रीय मिलिट्री स्कूल्समध्ये शिक्षण इंग्रजी माध्यमातून दिले जाते.

RMS CET २०२६ साठी वयोमर्यादा

राष्ट्रीय मिलिट्री स्कूलच्या इयत्ता ६ वी आणि ९ वी मधील प्रवेशासाठी उमेदवारांची वयोमर्यादा देखील निश्चित करण्यात आली आहे. यात ३१ मार्च २०२७ रोजी गृहीत धरून वय १० ते १६ वर्षांच्या दरम्यान असावे. त्यानुसार, इयत्ता ६ वी मधील प्रवेशासाठी विद्यार्थ्याचा जन्म १ एप्रिल २०१४ ते ३१ मार्च २०१६ दरम्यान झालेला असावा. तसेच, इयत्ता ९ वी मधील प्रवेशासाठी विद्यार्थ्याचा जन्म १ एप्रिल २०१२ ते ३१ मार्च २०१४ दरम्यान झालेला असावा.

किती लागेल अर्ज फी?

अर्जासाठी उमेदवारांना त्यांच्या वर्गवारीनुसार अर्ज फी भरावी लागेल. यामध्ये जनरल, ओबीसी आणि ओबीसी-एनसीएल प्रवर्गातील उमेदवारांना १००० रुपये अर्ज फी द्यावी लागेल. तर एससी-एसटी आणि युद्धात शहीद झालेल्या जवानांच्या पाल्यांना ७५० रुपये फी भरावी लागेल. याशिवाय, उमेदवारांना लागू होणारे विलंब शुल्क आणि पेमेंट संबंधीच्या सूचनांसाठी अधिकृत पोर्टल पाहणे आवश्यक आहे.

Supreme Court Recruitment 2026: १० वी पास उमेदवारांना सर्वोच्च न्यायालयात नोकरीची संधी! ‘या’ तारखेपासून करा अर्ज

RMS CET २०२६ साठी अर्ज कसा करावा?

1. अर्ज करण्यासाठी सर्वात प्रथम rashtriyamilitaryschools.edu.in या अधिकृत वेबसाइटवर जा.

2. होम पेजवर ‘Apply Online’ मधील ‘CET 2026’ या लिंकवर क्लिक करा.

3. आता तुमच्या मोबाईल नंबर आणि ईमेल आयडीने नोंदणी करा.

4. त्यानंतर लॉगिन करून अर्ज फॉर्ममध्ये विद्यार्थी आणि पालकांची वैयक्तिक व शैक्षणिक माहिती भरा.

6. विद्यार्थ्याचा पासपोर्ट साईझ फोटो, सही आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा.

7. आता तुमच्या प्रवर्गानुसार ऑनलाइन अर्ज फी भरून फॉर्म सबमिट करा.

NMC Medical Education: नॅशनल मेडिकल कमिशनचा मोठा निर्णय! २०२३ चे वैद्यकीय शिक्षणाचे ‘हे’ नियम तात्काळ प्रभावाने रद्द

काय आहे राष्ट्रीय मिलिट्री स्कूल?

राष्ट्रीय मिलिट्री स्कूल ही संरक्षण मंत्रालयाद्वारे चालवली जाणारी इंग्रजी माध्यमाची निवासी सार्वजनिक शाळा आहे. या शाळा संरक्षण कर्मचाऱ्यांच्या मुलांसोबतच सामान्य नागरिकांच्या मुलावंही इयत्ता ६ वी ते १२ वी पर्यंतचे शिक्षण देतात. भारतात एकूण पाच राष्ट्रीय मिलिट्री स्कूल्स आहेत. हे हिमाचल प्रदेशमधील चैल, राजस्थानमधील अजमेर आणि धौलपुर येथे तसेच कर्नाटकातील बेलगाम आणि बंगळुरू येथे स्थित आहेत.

💡

Frequently Asked Questions

  • Que: राष्ट्रीय मिलिट्री स्कूलच्या प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख कोणती आहे?

    Ans: या परीक्षेसाठी २० ऑक्टोबरपर्यंत विना विलंब शुल्काचे अर्ज भरले जातील, त्यानंतर लेट फीसह अर्ज करता येतील.

  • Que: RMS CET साठी कोणकोणत्या इयत्तांमध्ये प्रवेश मिळतो?

    Ans: राष्ट्रीय मिलिट्री स्कूलमध्ये प्रामुख्याने इयत्ता ६ वी आणि इयत्ता ९ वी मध्ये प्रवेश दिला जातो.

Web Title: Rms cet 2026 application last date eligibility marathi sd

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 20, 2026 | 08:21 AM

Topics:  

  • Admission Process
  • CET
  • indian army

संबंधित बातम्या

JNV Admission 2027: नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज
1

JNV Admission 2027: नवोदय विद्यालयातील प्रवेशासाठी अर्ज करण्याची अंतिम तारीख वाढली; आता ‘या’ तारखेपर्यंत करा अर्ज

UNIFIL Withdrawal: इस्रायल-लेबनॉन सीमा विवादावर मोठा निर्णय; ‘या’ कारणामुळे UN आणि भारताचेही शांतता सैनिक अखेर मायदेशी परतणार
2

UNIFIL Withdrawal: इस्रायल-लेबनॉन सीमा विवादावर मोठा निर्णय; ‘या’ कारणामुळे UN आणि भारताचेही शांतता सैनिक अखेर मायदेशी परतणार

एका निर्णयाने बदललं आयुष्य! Gautam Gambhir यांच्या मनात आजही एक खंत! पहिलं प्रेम अधुरं राहिलं? जाणून घ्या खास किस्सा
3

एका निर्णयाने बदललं आयुष्य! Gautam Gambhir यांच्या मनात आजही एक खंत! पहिलं प्रेम अधुरं राहिलं? जाणून घ्या खास किस्सा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.