
crime (फोटो सौजन्य: social media)
काय घडलं नेमकं?
सुरज आणि गणवी (26) असे मृत दाम्पत्याचा नाव आहे. २९ ऑक्टोबर 2025 रोजी बेंगळुरूमध्ये मोठ्या थाटामाटात लग्न झाले होते. लग्नानंतर ते हनिमूनसाठी श्रीलंकेला गेले होते. मात्र तिथेच त्यांच्यात खटके उडू लागले आणि नियोजित सहल अर्ध्यावर सोडून ते गेल्या आठवड्यात बेंगळुरूला परतले. त्यानंतर मंगळवारी कौटुंबिक वाद आणि सासरच्यांकडून अपमान झाल्याच्या कारणावरून गणवीने राहत्या घरी छताच्या पंख्याला लटकून आत्महत्येचा प्रयत्न केला. गुरुवारी उपचारादरम्यान गांवींचा मृत्यू झाला. तिच्या पालकांनी सुरज आणि त्याच्या कुटुंबियांवर हुंड्यासाठी छळ आणि आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला.
घराबाहेर निर्दर्शने आणि अटकेची मागणी
शनिवारी बंगळुरूमध्ये सासरच्या मंडळींनी घराबाहेर निर्दर्शने देखील केली आणि अटकेची मागणी केली. यामुळे घाबरलेल्या सुरज आणि त्याची आई जयंती नागपूरला गेले. तिथे वर्धा रोडवरील एका हॉटेलमध्ये सुरजणे आत्महत्या केली. तर आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला. आई नागपूरच्या स्थानिक रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
गांवींच्या कुटुंबीयांचा आरोप काय?
गांवींच्या मृत्यूनंतर कुटुंबीयांनी सुरज व त्याच्या कुटुंबियांवर आरोप केले आहे. लग्नानंतर काही दिवसातच तिला हुंड्यासाठी मानसिक आणि शारीरिक त्रास दिला जात होता. त्यामुळेच तिला माहेरी परत आणावे लागले होते.
पत्नीच्या चारित्र्यावर संशय; भररस्त्यात अडकवत गोळ्या झाडून केली हत्या, नंतर थेट पोलीस ठाण्यात केले सरेंडर
बंगळुरूमधून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. पतीनेच आपल्या पत्नीची गोळ्या झाडून हत्या केल्याचे समोर आले आहे. हत्या केल्यानंतर त्याने थेट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन सरेंडर केले. मंगळवारी संध्याकाळच्या सुमारास ही घटना घडली. हत्या करणारा ४० वर्षीय सॉफ्टवेअर इंजीनिअर आहे. त्याने आपल्या पत्नीच्या चारित्र्यावर संशय घेऊन हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.
Ans: पत्नीच्या मृत्यूनंतर हुंडाबळीचे आरोप, कायदेशीर कारवाई आणि सामाजिक दबावामुळे तो तणावात होता.
Ans: सूरजसोबत नागपूरला आलेल्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केला असून ती रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत आहे.
Ans: पत्नीच्या मृत्यू प्रकरणी हुंडाबळीचा गुन्हा दाखल असून सूरजच्या आत्महत्येचा तपास नागपूर पोलीस करत आहेत.