Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • रवि, 27 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

रक्षकच झाले भक्षक! पाच वर्षांच्या चिमुकलीवर पोलिसांकडून अत्याचार; लोणावळ्यातील घटनेने एकच संताप

लोणावळ्यातील विसापूर किल्ला फिरायला आलेल्या चिमुकल्या मुलीवर अत्याचार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कर्तव्यावर असताना हा पोलीसाने हा प्रकार केला आहे.

  • By प्रीति माने
Updated On: Dec 26, 2024 | 11:39 AM
Lonavala Visapur Fort girl who came to visit was tortured Vadgaon Maval Crime News

Lonavala Visapur Fort girl who came to visit was tortured Vadgaon Maval Crime News

Follow Us
Follow Us:

वडगाव मावळ : राज्यामधील महिलांवरील अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढले आहे. लहान मुलींपासून अगदी महिलांवर देखील नराधम अत्याचार करत आहे. रोज नवीन धक्कादायक घटना समोर येत असल्यामुळे राज्यामध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. आता लोणावळ्यामध्ये देखील धक्कादायक प्रकार घडला आहे. मावळ तालुक्यातील विसापूर किल्ला परिसरात आई- वडिलांसोबत फिरण्यासाठी आलेल्या पाच वर्षाच्या चिमुकलीवर बंदोबस्तावर असलेल्या पोलिसाने लैंगिक अत्याचार केला. मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून आडोशाला नेऊन तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी संबंधित पोलिसाला अटक केली आहे. ही धक्कादायक घटना बुधवारी (दि. 25) घडली.

सचिन वसंत सस्ते असे अटक केलेल्या आरोपी पोलिसाचे नाव आहे. याप्रकरणी पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, नाताळनिमित्त मावळ तालुक्यातील पर्यटन स्थळांवर पोलिसांकडून अधिकचा बंदोबस्त लावण्यात आला होता. पर्यटन स्थळावर सुट्टीच्या अनुषंगाने लोक फिरण्यासाठी येतात. कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त लावला होता. लोणावळा ग्रामीण पोलिसांच्या हद्दीत येणाऱ्या विसापूर किल्ल्यावर पुणे ग्रामीण मुख्यालय येथून अधिकचा बंदोबस्त मागविण्यात आला होता. त्यामध्ये पोलीस सचिन सस्ते हा देखील विसापूर किल्ला परिसरात बंदोबस्तावर होता.

राजकीय घडामोडी वाचण्यासाठी येथे क्लिक करा

विसापूर किल्ला पाहण्यासाठी पाच वर्षीय चिमुकली तिच्या आई-वडिलांसोबत आली होती. त्या चिमुकलीला सचिन सस्ते याने चॉकलेटचा आमिष दाखवले आणि आडोशाला नेले. तिथे तिच्यावर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला. हा प्रकार मुलीने आपल्या पालकांना सांगितला. पालकांनी तात्काळ पोलिसात धाव घेत गुन्हा दाखल केला. लोणावळा ग्रामीण पोलिसांनी पोलीस सचिन सस्ते याला अटक केली आहे.पोलिसांकडून कृत्ये झाल्याने रक्षकच झाले भक्षक यामुळे सर्वच स्तरातून संताप व्यक्त केला जात आहे.

आरोपी पोलीस मद्यधुंद

विसापूर किल्ल्याच्या पायथ्याला हा प्रकार घडला. कर्तव्यावर असताना हा पोलीस दारूच्या नशेत होता, याचं नशेत त्याने पाच वर्षीय चिमुरडीसोबत अश्लील चाळे केलेत. याप्रकरणी सचिन सस्तेला लोणावळा ग्रामीण पोलिसांनी बेड्या ठोकल्यात. नाताळची सुट्टी असल्यानं पर्यटक विसापूर किल्ल्यावर गर्दी करत होते. म्हणून नराधम पोलीस सस्ते तिथं बंदोबस्तावर होता.

क्राईम न्यूज वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाराणसीमध्ये चिमुकलीवर अत्याचार

वाराणसीमध्ये सकाळी एका मुलीचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. शाळेच्या आत मृतदेह सापडला असून मुलगी एक दिवशी आधी संध्याकाळी बेपत्ता होती. हे प्रकरण रामनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सुजाबादचे आहे. येथील रहिवासी असलेल्या ८ वर्षीय मुलीचा मृतदेह बुधवारी सकाळी बहादूरपूर येथील प्राथमिक शाळेत गोणीत बांधलेल्या अवस्थेत आढळून आला. मुलीवर लैंगिक अत्याचार करून तिच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचा संशय आहे. रामनगर पोलीस सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमातून घटनेचा तपास करत आहेत. या प्रकरणाचा तपास सुरू करण्यात आल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. माहिती देताना अपंग वडिलांनी पोलिसांना सांगितले की, मुलगी मंगळवारी सायंकाळी सात वाजण्याच्या सुमारास समाधीजवळील दुकानातून सामान आणण्यासाठी घरातून निघाली होती. ती मच्छरचं कॉइल घेण्यासाठी बाहेर गेली होती.

 

Web Title: Lonavala visapur fort girl who came to visit was tortured vadgaon maval crime news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Dec 26, 2024 | 11:39 AM

Topics:  

  • crime news

संबंधित बातम्या

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई; मुलुंडमधील कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल
1

महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या निदर्शनास आल्यानंतर कारवाई; मुलुंडमधील कथित जमीन गैरव्यवहाराप्रकरणी गुन्हा दाखल

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…
2

वाघोलीत थरार! बहिणीसोबत संबंधाच्या संशयातून तरुणाची निर्घृण हत्या; आधी कारने उडवले अन् नंतर…

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?
3

गणेश विसर्जन मिरवणुकीनंतर किरकोळ वाद, तरुणाच्या डोक्यात भात वाढणी घालून हल्ला; नेमकं काय घडलं?

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव
4

Pune Crime: लॉजच्या खोलीत नेमकं काय घडलं? काही वेळाने खोली उघडली अन् समोर आले धक्कादायक वास्तव

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.