Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 6 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • ind vs ire |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Madhya Pradesh Crime : विधवा वाहिनीने लग्नाला नकार दिला; संतापलेल्या दिराने घरात घुसून केला ॲसिड हल्ला

मध्यप्रदेशातील ग्वालियर येथे विधवा महिलेला लग्नाला नकार दिल्याचा राग आल्याने तिच्या दिराने घरात घुसून अॅसिड हल्ला केला. पीडिता गंभीर जखमी असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. प्रकरणाने खळबळ उडाली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Nov 09, 2025 | 05:40 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • ग्वालियरमध्ये विधवा महिलेला तिच्या दिराकडून अॅसिड हल्ला.
  • लग्नाला नकार दिल्यामुळे आरोपी संतापून हल्ला केला.
  • आरोपी मुशीर खानला पोलिसांनी अटक करून तपास सुरू केला.
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक धक्कदायक घटना समोर आली आहे. एका व्यक्तीने विधवा महिलेवर अॅसिड अटॅक केल्याचे समोर आले आहे. हे भयानक कृत्य दुसरं तिसरं कोणी नाही तर पीडितेच्या दिराने केल्याचे समोर आले आहे. पण त्याने हे का केलं? हे जाणून तुम्हाला देखील धक्काच बसेल.

आरबीआयचा इशारा: २०२५ पासून डिजिटल फसवणुकीत वाढ, बँकांनी सावध राहा!

नेमकं प्रकरण काय?

संबंधित थरारक घटना मध्यप्रदेश येथील ग्वालियर जिल्ह्यातील कंपू पोलीस स्टेशन हद्दीतील आवडपुरा परिसरात घडली. पीडित महिलेच्या पतीचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यामुळे पीडितेच्या महिलेचा दिराला पिडीतेसोबत लग्न करायचे होते. परंतु महिलेने त्याला नकार दिला. याच संतापाच्या भरात शुक्रवारी (7 नोव्हेंबर) संध्याकाळी पीडितेच्या माहेरच्या घरात घुसला आणि दीराने अॅसिडने हल्ला केला. या हल्ल्यात पीडिता गंभीररित्या जखमी झाली. उपचारांसाठी तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं. प्रकरणातील आरोपीचं नाव मुशीर खान असल्याची माहिती आहे.

गंभीर जखमी

आरोपी हा पीडितेवर लग्नासाठी सतत दबाव टाकायचा. पीडित महिलेने आरोपीला लग्नासाठी स्पष्टपणे नकार दिला होता. याच रागातून आरोपी संतापला आणि त्याने हे भयानक कृत्य केलं. आरोपीने पीडितेवर केलेल्या हल्ल्यात तिचा पूर्ण चेहरा, हाथ आणि पाय पूर्णपणे भाजल्याचं समोर आले आहे. या घटनेच्या वेळी पीडिता तिच्या घरात भाजी चिरत होती. तेव्हा, अचानक तिच्या दीराने घरात घुसून तिच्यावर हल्ला केला.

आरोपीच्या पत्नीचा देखील निधन

काही महिन्यांपूर्वी, पीडित महिलेच्या पतीचा गंभीर आजारामुळे मृत्यू झाला होता. त्यानंतर, पत्नी तिच्या माहेरीच राहत होती. संबंधित महिलेला एका 10 वर्षांचा मुलगा आणि एक 4 वर्षांची मुलगी आहे. तसेच, आरोपी मुशीर खानच्या पत्नीचं सुद्धा निधन झालं होतं. दरम्यान, आरोपीला तिच्या लहान वहिनीसोबत लग्न करायचं होतं. याच कारणामुळे तो सतत मुलांना भेटण्याच्या बहाण्याने पीडितेच्या माहेरी जायचा.

आरोपीला अटक

या हल्ल्याची माहितीमिळताच स्थानिकांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार नोंदवली. पोलिसांना या प्रकरणाबाबत माहिती मिळताच त्यांनी आरोपीला रात्री ताब्यात घेतला. सध्या पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून त्याची चौकशी सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.

कारवाईची भीती दाखवून ज्येष्ठाची फसवणूक; तब्बल 99 लाखांना घातला गंडा

💡

Frequently Asked Questions

  • Que: अॅसिड हल्ला कुठे घडला?

    Ans: ग्वालियर

  • Que: आरोपीचं नाव काय आहे?

    Ans: मुशीर खान

  • Que: पीडितेने लग्नाला काय उत्तर दिलं होतं?

    Ans: नकार

Web Title: Madhya pradesh crime angry brother in law entered the house and attacked her with acid

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Nov 09, 2025 | 05:12 PM

Topics:  

  • crime
  • Madhya Pradesh crime
  • Madhyapradesh

संबंधित बातम्या

Mumbai: मुंबईत BMC च्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी! कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; मनसैनिक पोलिसांना भिडले
1

Mumbai: मुंबईत BMC च्या निष्काळजीपणाचा आणखी एक बळी! कुर्ल्यात झाड कोसळून 63 वर्षीय वृद्धाचा मृत्यू; मनसैनिक पोलिसांना भिडले

Thane Crime: मम्मीने गळा दाबला, गरम चाकूने चटके दिले… साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची विदारक व्यथा
2

Thane Crime: मम्मीने गळा दाबला, गरम चाकूने चटके दिले… साडेतीन वर्षांच्या चिमुकल्याची विदारक व्यथा

Pune Crime: एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत
3

Pune Crime: एकाच खोलीत राहत होते, किरकोळ वादातून मित्राचा खून; आरोपी 12 तासांत अटकेत

Pune Crime: संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू
4

Pune Crime: संतापजनक! कॉम्प्रेसरचा हायप्रेशर पाईप गुदद्वारात घातला; सहकाऱ्याच्या कृत्यामुळे 42 वर्षीय कामगाराचा मृत्यू

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.