crime (फोटो सौजन्य: SOCIAL MEDIA )
मध्यप्रदेश: मध्यप्रदेश येथून एक संतापजनक घटना समोर आली आहे. गुंडांनी एका तरुणाला बेदम मारहाण करत नग्न अवस्थेत गावभर फिरवल्याचं समोर आलं आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. या घटनेनंतर पोलिसांनी चार तरुणांना अटक केल्याची माहिती समोर आली आहे. ही घटना मऊगंज जिल्ह्यातील कोणी पोलीस स्टेशन परिसरात घडली आहे. आरोपींचा नाव अनिल कुशवाह, लालमणी कुशवाह, सोहन कुशवाह आणि सुनील कुशवाह असे आहे.
नेमकं काय घडलं?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीचे नाव मनीष यादव असे आहे. तो मऊगंज जिल्ह्यातील हनुमान पोलीस स्टेशन हद्दीतील कोनी गावचा रहिवासी असल्याची माहिती आहे. पीडित मनीषच्या म्हणण्यानुसार, कर्जाच्या व्यवहारावरून झालेल्या वादामुळे आरोपींनी त्याचे कपडे काढून त्याला बेदम मारहाण केली. पोलिसांच्या तपासातून, या घटनेबाबत एक वेगळीच बाब समोर आली आहे. आरोपी गुंडांनी आधी पीडित तरुणाला मारहाण केली आणि नंतर दारूसाठी 1200 रुपये मागितलं असल्याचं म्हटलं जात आहे.
नग्न अवस्थेत परिसरात फिरवलं
पीडित तरुणाने पैसे देण्यास नकार दिल्यानंतर आरोपींनी त्याला बेदम मारहाण केली आणि त्याला नग्न अवस्थेत परिसरात फिरवलं. सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या या घटनेच्या व्हिडिओमध्ये बरेच तरुण एका तरुणाला नग्न अवस्थेत फिरवत असल्याचं दिसून येत आहे. तो नग्न पुरूष आरोपीच्या आज्ञेनुसार डोकं टेकवून सरळ चालताना दिसत आहे आणि घटनेतील पीडित तरुण घाबरलेल्या अवस्थेत दिसत आहे.
या संपूर्ण घटनेबाबत एका पोलिस अधिकाऱ्याने सांगितलं की पीडितेच्या तक्रारीनंतर चारही आरोपींना अटक करण्यात आली असून हे चौघेही कुशवाहा समुदायाचे तरुण आहेत. आरोपींचा नाव अनिल कुशवाह, लालमणी कुशवाह, सोहन कुशवाह आणि सुनील कुशवाह असे आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना काही दिवसांपूर्वी घडली असून सोशल मीडियावर व्हायरल झालेला हा व्हिडिओ सुमारे एक महिना जुना आहे.
मध्यप्रदेशमध्ये विषारी कप सिरपमुळे 11 मुलांचा मृत्यू; डॉक्टरला अटक
मध्यप्रदेश मध्ये कप सिरपमुळे लहान मुलांचा मृत्यू झाल्याचे समोर आले होते. याप्रकरणी धिंदवाडा पोलिसांनी आरोपी डॉक्टर प्रवीण सोनाली अटक केली आहे. डॉ. प्रवीण सोनीवर विषारी सिरपचं प्रिस्क्रिप्शन दिल्याचा आरोप करण्यात आला आहे. डॉक्टरला उशिरा रात्री अटक केली आहे. या कप सिरपमुळे ११ मुलांची मृत्यू झाले. विषारी कप सिरपचं प्रिस्क्रिप्शन दिल्याप्रकरणी आरोग्य विभागाचे बीएमओ अंकित यांनी तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी डॉ.सोनी आणि श्रीसन कंपनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. आता त्या डॉक्टरला अटक करण्यात आली आहे.