Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Dussehra |
  • Navratri |
  • Ind vs Wi test |
  • Bihar Election 2025 |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Live Updates : दोन दिवस डांबून ठेवत तरुणाला जबर मारहाण

Crime news in Marathi: आज 20 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील, देश आणि विदेशातील गुन्हेगारी संदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 20, 2025 | 06:41 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

पुण्यातून वारंवार गुन्हेगारी घटना समोर येत आहेत. दिवसाढवळ्या होणाऱ्या हाणामाऱ्या, कोयत्याची दहशत,घरफोडी अशा अनेक घटना समोर येत असताना पिंपरी चिंचवड मधून सशस्त्र दरोड्याचा थरार समोर आलाय. पुण्याच्या पिंपरी चिंचवड मध्ये एका बांधकाम व्यवसायिकाच्या घरी चार-पाच दरोडेखोरांनी व्यावसायिकाचे हातपाय बांधून दरोडा टाकला .रात्री उशिरा याप्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती . दरोडेखोरांनी घरातील रोकड रकमेसह लाखोंचा किमती ऐवज लंपास केला आहे . चंद्रभान छोटूराम अग्रवाल असं बांधकाम व्यवसायिकाचे नाव आहे .निगडी प्राधिकरण परिसरात ते राहतात .घटनेच्या वेळी रात्री ते घरात एकटेच होते .हॉलमध्ये बसले असताना बंगल्याचा मुख्य दरवाजा उघडा होता. अचानक चार-पाच सशस्त्र दरोडेखोर घरात घुसले. रात्री नऊच्या सुमारास हा संपूर्ण थरार घडला .

The liveblog has ended.
  • 20 Jul 2025 06:02 PM (IST)

    20 Jul 2025 06:02 PM (IST)

    पुण्यात वाहतूक पोलिसाची आत्महत्या

    पुणे वाहतूक शाखेतील पोलीस हवालदाराने गळफास घेऊन आत्महत्या केली आहे. ही घटना लोहगाव भागात घडली आहे. राजेंद्र विलास गायकवाड (वय ४२, रा. डी वाय पाटील काॅलेजजवळ, धानोरी, लोहगाव) असे आत्महत्या केलेल्या पोलीस हवालदाराचे नाव आहे. गायकवाड हे वाहतूक शाखेच्या नियंत्रण कक्षात नियुक्तीस होते. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.

  • 20 Jul 2025 05:01 PM (IST)

    20 Jul 2025 05:01 PM (IST)

    दोन दिवस डांबून ठेवत तरुणाला जबर मारहाण

    अंबाजोगाई तालुक्यातील देवळा गावात किरकोळ कारणावरून एका तरुणाला दोन दिवस डांबून ठेवत बांबूच्या काठ्यांनी, लाकडी दांडक्यासह लाथाबुक्यांनी बेदम मारहाण केली होती. या मारहाणीत त्याला मार लागून पोटात गंभीर दुखापत झाली. यानंतर त्याच्यावर अंबाजोगाईच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झालाय.अविनाश सगट असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे.मयत तरुणाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून अंबाजोगाई ग्रामीण पोलिस ठाण्यात सात जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला असून यातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केले आहेत. या प्रकरणाचा पुढील तपास अंबाजोगाई ग्रामीण पोलीस करत आहेत.

  • 20 Jul 2025 04:59 PM (IST)

    20 Jul 2025 04:59 PM (IST)

    गणपती मंडळाच्या वादातून तरुणावर हल्ला

    शिरुर शहरातील बाबूराव नगरमध्ये राहणाऱ्या एका तरुणाला गणपती मंडळाच्या वादातून लाकडी दांडके आणि फरशीच्या तुकड्याने मारहाण केल्याची घटना सिद्धार्थनगर परिसरात घडली आहे. याप्रकरणी चौघांविरोधात शिरुर पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. सुरज शशिकांत चव्हाण (वय ३०, रा. बाबूरावनगर, शिरुर) हे मित्रांकडे गेले असताना, सिद्धार्थनगर येथे आकाश शंकर पवार, सागर शंकर पवार, निलेश धोत्रे, राजू शेवाळे व इतर काही युवक बसलेले होते. यावेळी आकाश पवार याने “तू आमच्या गणपती मंडळात कशाला येतोस?” असे म्हणत सुरजला शिवीगाळ व दमदाटी केली. यानंतर सागर पवार, निलेश धोत्रे आणि इतरांनी मिळून सुरजला पकडले व लाकडी दांडके तसेच फरशीच्या तुकड्याने मारहाण केली. या हल्ल्यात सुरज गंभीर जखमी झाला आहे.

  • 20 Jul 2025 04:43 PM (IST)

    20 Jul 2025 04:43 PM (IST)

    एकाच कुटुंबातील 5 जणांनी विष पिऊन संपवलं जीवन

    गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज (रविवारी, ता-20) एकाच कुटुंबातील पाच जणांनी विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मृतांमध्ये पती-पत्नी, त्यांच्या दोन मुली आणि एका मुलाचा समावेश आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांना घटनास्थळी पोहोचले आणि मृतदेह ताब्यात घेतले असून ते पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. सामूहिक आत्महत्येमागील कारण अद्याप समजू शकलेले नाही. पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.

  • 20 Jul 2025 04:41 PM (IST)

    20 Jul 2025 04:41 PM (IST)

    पोलिसांच्या सतर्कतेने चोरट्यांचा डाव फसला

    पुणे जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. चोरीच्या उद्देशाने लपलेल्या दोन तरुणांना रांजणगाव गणपती (ता. शिरुर) येथील औद्योगिक वसाहतीत गस्तीवर असलेल्या पोलिसांनी पकडून बेड्या ठोकल्या आहेत. ज्योतून कंपनीच्या पार्किंगजवळ दोन तरुण पोलिसांना पाहून अंधारात लपताना आढळले. पोलिसांनी तत्काळ त्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली असता, त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली. त्यामुळे चोरीच्या उद्देशाने ते त्या ठिकाणी आल्याचा पोलिसांना संशय आला आणि त्यानंतर दोघांनाही ताब्यात घेतले. याबाबत पोलीस शिपाई संतोष अशोक अडसूळ (रा. रांजणगाव गणपती, ता. शिरुर, जि. पुणे) यांनी रांजणगाव एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या व्यक्तींची नावे प्रवीण मोहन अंधारे (वय १८, रा. विश्रांतवाडी, पुणे; मूळगाव - उंबरी, ता. माजलगाव, जि. बीड), लक्ष्मण राजेंद्र घोडके (वय २२, रा. शास्त्री चौक, भोसरी, पुणे; मूळगाव - नदीहत्तरगा, ता. निलंगा, जि. लातूर) आहेत.

  • 20 Jul 2025 04:25 PM (IST)

    20 Jul 2025 04:25 PM (IST)

    गिरीश महाजनांचा एकेकाळचा निकटवर्तीय पोलिसांच्या जाळ्यात

    एकेकाळी मंत्री गिरीश महाजन यांच्यासोबत आरोग्यदूत म्हणून काम करणारे आणि भाजपचे कार्यकर्ता राहिलेले प्रफुल लोढा यांच्यावर मुंबईमध्ये साकीनाका पोलिस ठाण्यात पॉक्सोसह हनी ट्रॅप प्रकरणात गुन्हा दाखल झाल्याच्या सूत्रांच्या माहिती आहे, ही माहिती समोर आल्यानंतर राजकीय क्षेत्रात चर्चांना उधाण आलं आहे. सध्या राज्यभर हनीट्रॅप विषय गाजत असून त्याची पाळेमुळे ही नाशिक, जळगावपर्यंत पोहोचली असल्याचं सांगितले जात आहे.

  • 20 Jul 2025 03:49 PM (IST)

    20 Jul 2025 03:49 PM (IST)

    रत्नागिरी हादरली! कौटुंबिक वादातून मोठ्या भावाने सख्या लहान भावाची केली हत्या

    रत्नागिरी जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मोठ्या भावाने सख्या लहान भावाची धारधार कुऱ्हाडीने सपासप वार करून हत्या केली. ही हत्या कौटुंबिक वादातून करण्यात आल्याचे समोर आले आहे. मृत व्यक्तीच नाव विनोद गणपत तांबे असून, आरोपी मोठा भाऊ रवींद्र तांबे याला पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शनिवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

  • 20 Jul 2025 03:47 PM (IST)

    20 Jul 2025 03:47 PM (IST)

    संतापजनक! प्रॉपर्टीसाठी सख्ख्या बहिणीला दिल वेड्याचे इंजेक्शन आणि…..

    पुण्यातून के धक्कादायक घटना समोर आली आहे. भावा-बहिणीच्या पवित्र नात्याला काळीमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने पोलिसांनाही धक्का बसला आहे. वडिलोपार्जित मालमत्तेसाठी एका भावाने आपल्या सख्ख्या बहिणीला वेड्याचे इंजेक्शन देऊन तिला खोट्या बहाण्याने मानसिक रुग्णालयात दाखल केल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेने सर्वांना धक्का बसला आहे. पोलिसांनी आरोपी भावावर आणि चार खासगी बाऊन्सरवर गुन्हा दाखल केला आहे. गुन्हा दाखल करण्यात आलेल्या भावाचे नाव धमेंद्र इंदूर रॉय असे आहे.

  • 20 Jul 2025 03:27 PM (IST)

    20 Jul 2025 03:27 PM (IST)

    वाईत भरदिवसा चोरट्यांनी दोन घरे फाेडली

    वाई तालुक्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वाईच्या गंगापुरीतील सृष्टी अपार्टमेंटमधील बंद सदनिका हेरून सकाळी ११ ते १२ च्या दरम्यान चोरट्यांनी कुलुप तोडले, आत प्रवेश करुन कपाटातील सोने आणखी दिड लाख रुपये रोख घेऊन चोरटे पसार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. तेथीलच आणखी एका फ्लॅटचे कुलूप तोडून तेथील कपाटात ठेवलेले १० हजार रुपये रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. दिवसाढवळ्या वाई शहरात झालेल्या या घटनेने खळबळ उडाली आहे. या घटनेची नोंद वाई पोलिस ठाण्यात झाली आहे.

  • 20 Jul 2025 03:25 PM (IST)

    20 Jul 2025 03:25 PM (IST)

    अभिनेत्री बिजलानींचा बंद बंगला फोडला

    मावळ तालुक्यातील तिकोना पेठ येथे असलेल्या अभिनेत्री संगीता बिजलानी यांच्या बंद बंगल्यात शिरलेल्या चोरट्यांनी ५७ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी चोरट्यांविरुद्ध लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत मोहमद मुजीफ खान (वय ५४, रा . जयसिंगपुरा, छत्रपती संभाजीनगर) यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मोहमद खान हे माजी क्रिकेटपटू मोहमद अजहरउद्दीन यांचे स्वीय सहायक आहेत. संगीता मोहमद अजहरउद्दीन-बिजलानी यांच्या मालकीचा मावळ तालुक्यातील तिकोना पेठ येथे बंगला आहे.

  • 20 Jul 2025 01:14 PM (IST)

    20 Jul 2025 01:14 PM (IST)

    महामार्गावर लूटमार करणाऱ्या परप्रांतीय टोळीला ठोकल्या बेड्या

    राज्यात लुटमारीच्या घटना वाढल्या आहे. राज्यातील वेगवेगळ्या भागातून दररोज, घरफोडी, दरोडे, लूटमार यासारख्या घटना उघडकीस येत असतात. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे- बेंगलोर महामार्गावर कार अडवून कार मधील वीस लाखाचा मुद्देमाल चोरणे आणि चालकाला मारहाण करून त्याचे अपहरण करणे या गंभीर गुन्ह्यांमध्ये भुईंज पोलीस व स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांनी संयुक्तपणे कारवाई करून केरळ मधील सात जणांच्या टोळीला ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून रोख रक्कम २० लाख व गुन्ह्यात वापरलेली वाहने असा ३५ लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणातील इतर सहा आरोपी फरार आहेत.

  • 20 Jul 2025 01:07 PM (IST)

    20 Jul 2025 01:07 PM (IST)

    बनावट अमूल बटरच्या उत्पादन कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाची धाड

    भिवंडीतून एक धक्कदायक प्रकार समोर आला आहे. अमूल बटरचे बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्याचा भांडाफोड झाला आहे. अमूल बटर बनावट उत्पादन करणाऱ्या कारखान्यावर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकला. तिथे दोन जणांना ताब्यात घेण्यात आले.ही कारवाई अन्न व औषध प्रशासनाने शांतीनगर पोलिसांच्या मदतीने गुरुवारी १७ जुलैला करण्यात आली.

  • 20 Jul 2025 12:14 PM (IST)

    20 Jul 2025 12:14 PM (IST)

    घरात घुसले, हातपाय बांधले, खोलीत कोंडले अन्... पुण्यात दरोड्याचा थरार

     

     

    पुण्यातून गुन्हेगारीच्या धक्कदायक घटना समोर येत आहे. दिवसाढवळ्या हाणामारी, मारहाण, कोयत्याची दहशत, घरफोडी अश्या अनेक घटना पुण्यात घडत आहे. आता पिंपरी चिंचवड मधून सशस्त्र दरोड्याचा थरार समोर आला आहे. घरात घुसले, हातपाय बांधले, खोलीत कोंडले आणि दरोडा टाकला. ही घटना बांधकाम व्यावसायिकाच्या घरी चार- पाच दरोडेखोरांनी दरोडा टाकला. दरोडेखोरांनी घरातील रोकड रकमेसह लाखोंचा किमती ऐवज लंपास केला आहे.

  • 20 Jul 2025 11:40 AM (IST)

    20 Jul 2025 11:40 AM (IST)

    दुबईत मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचे आमिष देत महिलेवर केले वारंवार अत्याचार

    नवी मुंबई येथून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. दुबईमध्ये मोठ्या पगाराची नोकरी लावण्याचं आमिष देत पीडित महिलेवर जबरदस्ती लैंगिक अत्याचार करण्यात आल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या ५५ वर्षीय सिराज इद्रीस चौधरी याला पोलिसांनी मुंबईतून अटक केली आहे.

  • 20 Jul 2025 11:38 AM (IST)

    20 Jul 2025 11:38 AM (IST)

    सांगलीतील कवठेमहांकाळ येथे एकाच कुटुंबातील चौघांचा आत्महत्येचा प्रयत्न

    सांगलीच्या कवठेमहांकाळ तालुक्यात एक धक्कादायक घटना घडली. नांगोळे येथील एकाच कुटुंबातील चौघांनी विषारी द्रव्य प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यामध्ये सासू आणि सुनेचा मृत्यू झाला तर वडील आणि मुलाची प्रकृती चिंताजनक आहे. या घटनेने सांगलीसह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

  • 20 Jul 2025 11:38 AM (IST)

    20 Jul 2025 11:38 AM (IST)

    रेल्वेतच महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न; विरोध करताच धावत्या रेल्वेखाली दिलं ढकलून

    मुंबई : मुंबईतील दिवा रेल्वे स्थानकादरम्यान एक धक्कादायक घटना समोर आली. रेल्वेतील एका अनोळखी महिलेशी लगट करण्याचा प्रयत्न एका तरुणाने केला. मात्र, ती महिला प्रतिसाद देत नाही म्हणून या माथेफिरूने तिला थेट रेल्वेखाली ढकलून तिची हत्या केली. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राजन शिवनारायण सिंग याला अटक केली आहे.

  • 20 Jul 2025 11:37 AM (IST)

    20 Jul 2025 11:37 AM (IST)

    बीड हादरलं! प्रेयसीच्या घरी जाणे बेतले जीवावर; बेदम मारहाणीत २१ वर्षीय तरुणांचा मृत्यू

    Beed Crime News: बीडमधून धक्कादायक घटना समोर आली. प्रेम संबंधातून अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणाला बेदम मारहाण करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत तरुण गंभीर जखमी झाला. त्याचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी पाच जणांवर तलवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून आता यात खुनाचे कलम वाढविले जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

     

  • 20 Jul 2025 11:34 AM (IST)

    20 Jul 2025 11:34 AM (IST)

    Crime news in Marathi: आज 19 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील, देश आणि विदेशातील गुन्हेगारी संदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

    कबनूर येथील रवी परीट यांच्या मालकीच्या खाेलीत बेकायदेशीरपणे विनपरवाना सुरु असलेल्या जुगार अड्ड्यावर शिवाजीनगर पाेलिसांनी छापा टाकला आहे. यामध्ये तीनपानी जुगार खेळणाऱ्या ९ जणांना ताब्यात घेऊन राेख रक्कम, माेबाईल व माेटरसायकली व इतर साहित्य असा २ लाख १९ हजार ३४० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या प्रकरणी पाेलिस काॅन्स्टेबल सुनिल दत्तात्रय बाईत यांनी फिर्याद दिली आहे.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates 33

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 20, 2025 | 11:33 AM

Topics:  

  • Arrested News
  • crime news
  • House Theft
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक
1

Vasai News : खानावळीच्या पैशासाठी सहकाऱ्याचा खून;आरोपीला गुजरातमधून केली अटक

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…
2

पुणे-नाशिक महामार्गावरील पेट्रोल पंपावर दरोडा; चोरट्यांनी हवेत गोळीबार केला अन्…

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”
3

Gautami Patil: गौतमीला उचलायचं की…? पाटलांच्या ‘त्या’ Video वर रोहित पवार म्हणाले, “कार्यकर्त्यांचं किती…”

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?
4

Crime News : घर फोडण्याचा डाव फसला, पण चोरट्यांनी परत जाताना…; कोथरुडमध्ये नेमकं काय घडलं?

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.