Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Live Updates : बाबा सिद्धीकी हत्या प्रकरण! मुंबई पोलिसांनी आणखी एका आरोपीला केलं अटक

Crime News Live Updates Marathi : आज दिनांक 29 - 08- 2025 रोजी देश-विदेशासह राज्यातील गुन्हेगारी संदर्भातल्या ताज्या घडामोडींचे अपडेट वाचा फक्त एका क्लिकवर...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Aug 29, 2025 | 05:32 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणी महत्वाची अपडेट समोर आली आहे. याप्रकरणी मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमोल गायकवाड नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील हा 28 वा अटक आरोपी आहे. अमोल गायकवाडचा पंजाबमधील एका गार्मेट व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. तर बाबा सिद्धीकी यांच्या हत्येच्या कटावेळी झालेल्या बैठकितही अमोलचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

The liveblog has ended.
  • 29 Aug 2025 03:20 PM (IST)

    29 Aug 2025 03:20 PM (IST)

    उल्हासनगरच्या पर्यावरण कार्यकर्त्या सरिता खानचंदानी यांचे निधन

     

    उल्हासनगरमधील प्रसिद्ध पर्यावरणप्रेमी आणि ॲक्टिविस्ट ॲड. सरिता खानचंदानी यांनी इमारतीवरून उडी मारून जीवन संपवल्याची धक्कादायक घटना घडली आहे. उपचारादरम्यान त्यांचे निधन झाले असून, या घटनेमुळे संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त होत आहे. प्राथमिक माहितीनुसार, त्यांच्याकडे काम करणाऱ्या एका तरुणीने केलेल्या गंभीर आरोपांमुळे त्यांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे बोलले जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.

  • 29 Aug 2025 03:10 PM (IST)

    29 Aug 2025 03:10 PM (IST)

    शौचालयात लघुशंकेसाठी गेलेल्या भावोजीवर त्याच्याच मेहूण्याने केला अंदाधुंद गोळीबार

    उल्हासनगरमध्ये एक धक्कादायक घटना समोर आली आहे. उल्हासनगरमधील साईनाथ कॉलनी परिसरात सार्वजनिक शौचालयात लघुशंकेसाठी गेलेल्या भावोजीवर त्यांच्याच मेहूण्याने अंदाधुंद गोळीबार केल्याची धक्कदायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात योगेश मिश्रा आणि त्याचा धीरज मोठाले हे दोघे जखमी झाले आहेत.

  • 29 Aug 2025 02:40 PM (IST)

    29 Aug 2025 02:40 PM (IST)

    जन्मदेताच अवघ्या दोन तासात बाळाला गोणीत गुंडाळून कचऱ्यात फेकलं

    छत्रपती संभाजीनगर मधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. नवजात बालकाला जन्मदेताच निर्दयी आईनेच रस्त्यावरील कचर्यात फेकल्याची संतापजनक घटना समोर आली आहे. घरातच मुलाला जन्म देऊन निर्दयी आईने रस्त्यावरील कचऱ्यात फेकले. त्यांनतर त्या बालकाचे कुत्र्याने लचके तोडण्याचाही प्रयत्न केला. सुदैवाने नागरिकांच्या सतर्कतेमुळे बाळाला सुखरूप पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले आहे.

  • 29 Aug 2025 02:25 PM (IST)

    29 Aug 2025 02:25 PM (IST)

    बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात नवीन अपडेट

    बाबा सिद्धीकी हत्या प्रकरणात एक महत्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. मुंबई पोलिसांच्या गुन्हे शाखेने अमोल गायकवाड नावाच्या व्यक्तीला अटक केली आहे. या प्रकरणातील हा २८ वा अटक आरोपी आहे. हा बाबा सिद्धीकी यांच्या हत्येच्या कटावेळी झालेल्या बैठकीत अमोलचा सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे. अमोल गायकवाड हा पंजाबमधील एका गार्मेट व्यावसायिकाच्या हत्या प्रकरणातही सहभाग असल्याचे तपासात समोर आले आहे.

  • 29 Aug 2025 02:10 PM (IST)

    29 Aug 2025 02:10 PM (IST)

    परभणी हादरलं! पतीने केली पत्नीची हत्या, हत्या करण्याआधीच ठेवले भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस

    परभणीमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. पतीने आपल्या पत्नीची निर्घृण हत्या केल्याचे समोर आहे. हत्या करण्याआधीच त्याने आपल्या व्हॉट्सअप अकाऊंटवर पत्नीसाठी भावपूर्ण श्रद्धांजलीचे स्टेटस ठेवले. या घटनेने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. मृतकाचे नाव विद्या विजय राठोड असे आहे.

  • 29 Aug 2025 01:40 PM (IST)

    29 Aug 2025 01:40 PM (IST)

    Nanded Crime: धक्कादायक! जन्मदात्या वडिलानेच केली लेकीची आणि प्रियकराची हत्या

    दोन दिवसापूर्वी नांदेड येथे ऑनर किलिंगची घटना समोर आली होती. जन्मदात्या वडिलानेच आपल्या लेकीची आणि तिच्या प्रियकराची हत्या करून त्यांचे मृतदेह विहिरीत फेकल्याची समोर आली होती. आता याच प्रकरणातील आणखी एक खळबळजनक प्रकार समोर आला आहे. या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर वायरल होत आहे. या धक्कदायक व्हिडीओने हत्या करणयात आलेल्या प्रेमी युगुलांची हत्या करण्यापूर्वी हात बांधून गावातून काढण्यात आल्याचं दिसून येत आहे.

  • 29 Aug 2025 01:21 PM (IST)

    29 Aug 2025 01:21 PM (IST)

    नागपूर हादरलं! सोशल मीडियावर मैत्री करून घरी बोलावणं हे महागात पडलं

    नागपूरमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका १८ वर्षीय मुलाने अल्पवयीन मुलीवर लैंगिक शोषण केल्याचे समोर आले आहे. आरोपीचे नाव दिवाणशु मेरावी असे असून तो पाचपावली ठक्करग्राम येथील रहिवासी आहे. आरोपीवर बाल लैंगिक शोषण प्रतिबंधक कायदा (POCSO Act) कलम चार अंतर्गत आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

  • 29 Aug 2025 01:00 PM (IST)

    29 Aug 2025 01:00 PM (IST)

    दुचाकीस्वारांकडून कार चालकाला बेदम मारहाण

    दुचाकीने चुकीच्या बाजुने येऊन कार चालकाचा रस्ता आडवून त्याला बेदम मारहाण केल्याची घटना घडली. मारहाणीत चालकाचे नाक फ्रॅक्चर झाले आहे. ही घटना खडकी येथील एलफिस्टन रोडवरील गुरूद्वारा समोर घडली. याप्रकरणी चौघांना खडकी पोलिसांनी अटक केली. याबाबत सत्यम सुखसागर भार्गव (२९, रा. खराडी) यांनी खडकी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे.

  • 29 Aug 2025 12:40 PM (IST)

    29 Aug 2025 12:40 PM (IST)

    पुण्यात तळीरामांची चांदी

    मध्यभागातील म्हणजेच खडक, विश्रामबाग आणि फरासखाना पोलिस ठाण्यांच्या हद्दीत २७ ऑगस्ट ते ६ सप्टेंबर या संपूर्ण गणेशोत्सवाच्या काळात दारू आणि वाईन शॉपीची दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला होता. जिल्हाधिकाऱ्यांनी तसे आदेश देखील पारित केले होते. मात्र, निवडक दारूबंदीविरोधात दाखल झालेल्या याचिकेवर सुनावणी करत उच्च न्यायालयाने हा आदेश फेटाळत स्थगिती दिली. त्यामुळे आता मध्यवर्ती भागातील दुकाने पूर्ण दहा दिवस बंद राहणार नाहीत. त्यानूसार सुधारित आदेश काढण्यात आला आहे.

  • 29 Aug 2025 12:20 PM (IST)

    29 Aug 2025 12:20 PM (IST)

    नामांकित हॉटेल व्यवसायिकाचा चाकूने भोसकून खून

    पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. पुणे शहरातील नामांकित हॉटेल ‘पीकॉक गार्डन अँड रेस्टॉरंट’चे मालक संतोष शेट्टी (वय ४५) यांचा त्यांच्याच हॉटेलातील कामगाराने रागाच्या भरात खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. ही घटना मंगळवारी (दि. २६) रात्री उशिरा घडली आहे. किचनमधला चाकू आणत तो अचानक त्यांच्या पोटात घुपसून व वार करून खून केला आहे. बेसावध असल्याचे पाहून त्याने वार केले. किरकोळ कारणावरून झालेल्या वादातून ही घटना घडल्याचे सांगण्यात आले आहे. या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. याप्रकरणी उत्तमनगर पोलिसांनी कामगार उमेश दिलीप गिरी (वय ३९) याला ताब्यात घेतले आहे. याप्रकरणी रात्री उशिरा गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

  • 29 Aug 2025 12:00 PM (IST)

    29 Aug 2025 12:00 PM (IST)

    गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर 29 गुंडांना केले तडीपार

    राज्यासह देश आणि विदेशातून बाप्पाच्या दर्शनासाठी अनेकजण पुण्यात येत असतात. गणेशोत्सव काळात कायदा-सुव्यवस्था ठेवणे तसेच गुन्हेगारी कृत्ये रोखण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली असून अनेक गुन्हेगारांना शहरातून हद्दपार केले आहे. परिमंडळ चारचे पोलिस उपायुक्त सोमय मुंढे यांनी बाणेर, चतुःशृंगी, येरवडा, खराडी, वाघाली, लोणीकंद व चंदननगर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील २६ सराइतांना तडीपारीचे आदेश दिले आहेत. परिमंडळ दोनचे पोलिस उपायुक्त मिलिंद मोहिते यांनी कात्रज भागातील तीन गुंडाना तडीपार करण्याचे आदेश दिले.

  • 29 Aug 2025 11:42 AM (IST)

    29 Aug 2025 11:42 AM (IST)

    फुरसूंगी अन् वानवडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले

    . पुणे शहरातही चोरट्यांनी धुमाकूळ घातला असून, फुरसूंगी तसेच वानवडीत बंद फ्लॅट फोडत दहा लाखांचा ऐवज लांबविला आहे. सातत्याने घरफोडीच्या घटना होत असताना पोलिसांना मात्र, या चोरट्यांचा थांगपत्ता लागत नसल्याचे दिसत आहे. पहिल्या घटनेत फुरसूंगीत एका इमारतीमधील पहिल्या माळ्यावरील फ्लॅटच्या बेडरुमधील स्लायडींगच्या खिडकीतून प्रवेश करून चोरट्यांनी सोन्याचे दागिणे आणि रोकड असा ४ लाख ९५ हजार रुपयांचा ऐवज चोरी केला आहे. याप्रकरणी मयुर अग्रवाल यांनी फुरसूंगी पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध घरफोडीचा गुन्हा दाखल केला आहे. हा प्रकार २४ ते २५ ऑगस्ट दरम्यान घडला आहे. मंतरवाडी उरूळी देवाची येथे अग्रवाल हे राहण्यास असून, ते घराला कुलूप लावून गेल्यानतंर चोरट्यांनी घरफोडी केली. दुसरी घटना घोरपडी येथील सोपानबाग येथील एका सोसायटीतील ज्येष्ठ नागरिकाच्या घरातून ५ लाख ८७ हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला आहे. उघड्या दरवाजातून आत प्रवेश करून चोरट्यांनी ऐवज लांबविला आहे. याप्रकरणी वानवडी पोलिस ठाण्यात ७८ वर्षीय व्यक्तीने तक्रार दिली आहे. ही घटना २१ ते २७ ऑगस्ट या काळात घडली आहे.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates baba siddiqui case

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 29, 2025 | 11:39 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • crime news
  • Murder Case

संबंधित बातम्या

Ahilyanagar : राहुरीत १३ ट्रकसह सुपारी व तंबाखूचा तब्बल ८.४३ कोटींचा मुद्देमाल जप्त
1

Ahilyanagar : राहुरीत १३ ट्रकसह सुपारी व तंबाखूचा तब्बल ८.४३ कोटींचा मुद्देमाल जप्त

शोरूममध्ये घुसून कामगारानेच केली चोरी; सुरक्षा रक्षकाचे हात- पाय बांधले अन्…
2

शोरूममध्ये घुसून कामगारानेच केली चोरी; सुरक्षा रक्षकाचे हात- पाय बांधले अन्…

फुरसूंगी अन् वानवडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले; खिडकीतून प्रवेश केला अन्…
3

फुरसूंगी अन् वानवडीत चोरट्यांनी बंद फ्लॅट फोडले; खिडकीतून प्रवेश केला अन्…

Amol khatal Attack: शिवसेना आमदार अमोल खताळांवर जीवघेणा हल्ला, एक तरुण आला अन्…
4

Amol khatal Attack: शिवसेना आमदार अमोल खताळांवर जीवघेणा हल्ला, एक तरुण आला अन्…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.