Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • वेब स्टोरीज
    • व्हायरल
    • करिअर
    • धर्म
    • टेक
    • ऑटो
    • फोटो
    • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Independence Day 2025 |
  • Shravan 2025 |
  • Today's Gold Rate |
  • Ind vs Eng
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Crime News Updates : साताऱ्यातील महिलेच्या खुनाचा लागला छडा, आरोपी अटकेत

Crime news in Marathi: आज 08 जुलै 2025 रोजी महाराष्ट्रातील, देश आणि विदेशातील गुन्हेगारी संदर्भातील घडामोडी वाचा एका क्लिकवर...

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: Jul 08, 2025 | 06:37 PM
Crime News Live Updates

Crime News Live Updates

Follow Us
Close
Follow Us:

अमराठी व्यापाऱ्यांनी केलेल्या शक्तीप्रदर्शनाला प्रत्युत्तर म्हणून मीरा-भाईंदर शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून आज मोर्चा काढण्यात येणार आहे. मात्र, पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारत प्रतिबंधात्मक कारवाईला सुरुवात केली होती. त्यानुसार पोलिसांनी सोमवारपासून मनसे आणि ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांना नोटीस बजावण्यास सुरुवात केली होती. मात्र, मंगळवारी पहाटे पोलिसांनी त्यापेक्षा मोठी कारवाई केली. पोलिसांनी मंगळवारी पहाटे साडेतीन वाजता मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांना ताब्यात घेतले आहे. अविनाश जाधव यांनाही पोलिसांनी नोटीस बजावली होती. मात्र, अविनाश जाधव मोर्चाला जाण्यावर ठाम होते.

The liveblog has ended.
  • 08 Jul 2025 06:04 PM (IST)

    08 Jul 2025 06:04 PM (IST)

    साताऱ्यातील 'त्या' महिलेच्या खुनाचा लागला छडा

    शिवथर येथील खून प्रकरणाचा उलगडा सातारा तालुका पोलिसांनी अवघ्या बारा तासात केला आहे. विवाहितेचा खून गावातील अक्षय रामचंद्र साबळे (वय २८) याने केल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी त्याला रात्री पुणे येथील स्वारगेट मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून ताब्यात घेतले. चौकशीत त्याने आपण हा खून केल्याची कबुली दिली. सातारा तालुका पोलिसांनी मोबाईल लोकेशनवरून संशयिताला ताब्यात घेतले. अनैतिक संबंधातून हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे.

  • 08 Jul 2025 05:53 PM (IST)

    08 Jul 2025 05:53 PM (IST)

    पुण्यात टोळक्याकडून एकाला बेदम मारहाण

    पुण्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे. वैमनस्यातून टोळक्याने एकाला बेदम मारहाण केल्याची घटना हडपसरमधील शिंदे वस्तीत घडली आहे. याप्रकरणी टोळक्यावर गुन्हा दाखल केला आहे. गंभीर दुखापत केल्याप्रकरणी टोळक्यावर हडपसर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. काकासाहेब शिरोळे (वय ४६, रा. कसबा पेठ) असे गंभीर जखमी झालेल्याचे नाव आहे. याप्रकरणी ऋषीकेश बागुल याच्यासह नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शिरोळे यांनी याबाबत हडपसर पोलिसांत तक्रार दिली आहे.

  • 08 Jul 2025 05:12 PM (IST)

    08 Jul 2025 05:12 PM (IST)

    Indigo Flight: विमानानं उड्डाण केलं अन्...; Indore च्या हवाई क्षेत्रात इमर्जन्सी लँडिंग, प्रवाशांचा जीव

    इंदोर: इंदोरमध्ये इंडिगोच्या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. इंदोरमधून रायपूरला जाणाऱ्या या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. तर दुसरीकडे सूरत जयपूर फ्लाइटचे देखील इमर्जन्सी लँडिंग करण्यात आले आहे. अहमदाबाद दुर्घटनेनंतर विमानांच्या इमर्जन्सी लँडिंगच्या घटना वाढलेल्या पाहायला मिळत आहेत.

  • 08 Jul 2025 04:48 PM (IST)

    08 Jul 2025 04:48 PM (IST)

    पुण्यात पोलीस शिपायाची आत्महत्या

    पुणे शहर पोलीस दलातील पोलीस शिपायाने राहत्या खोलीत टॉवेलने गळफास लावून आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. त्याच्या आत्महत्येचे कारण समजू शकलेले नाही. त्याचा मोबाईल पोलिसांनी ताब्यात घेतला आहे. स्वारगेट पोलीस वसाहतीत ही घटना घडली आहे. स्वरूप विष्णू जाधव (वय २८, रा. स्वारगेट पोलिस वसाहत) असे आत्महत्या केलेल्या पोलीस शिपायाचे नाव आहे. याप्रकरणी खडक पोलिसांत घटनेची नोंद करण्यात आली आहे.

  • 08 Jul 2025 03:44 PM (IST)

    08 Jul 2025 03:44 PM (IST)

    लॉर्ड्सवर टीम इंडियाचा रेकॉर्ड अस्वस्थ करणारा! वाचा किती सामन्यात साधली सरशी..

    बर्मिंगहॅममधील एजबॅस्टन येथे खेळवण्यात आलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने इंग्लंडचा ३३६ धावांनी धुव्वा उडवायला आहे. या विजयासह भारतीय संघाने इतिहास रचला आहे. त्यानंतर, एजबॅस्टनवरील विजयानंतर टीम इंडियाकडून चाहत्यांच्या अपेक्षा खूप वाढल्या आहेत. या मालिकेतील तिसरा सामना लॉर्ड्सवर खेळवण्यात येणार आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत, दोन्ही संघ १-१ असे बरोबरीत आले आहेत.

  • 08 Jul 2025 03:20 PM (IST)

    08 Jul 2025 03:20 PM (IST)

    नाशिकमध्ये दिवसाढवळ्या रक्तरंजित थरार

    नाशिकमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. अंबड पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या दत्त मंदिर बसस्टॉपजवळील देशी दारू दुकानासमोर मंगळवारी दुपारी साडे बारा वाजण्याच्या सुमारास दारूच्या नशेत झालेल्या वादातून एका व्यक्तीचा लाकडी दांडका डोक्यात मारून खून करण्यात आला. गणपत घारे (50, उंटवाडी, नाशिक) असे मृत व्यक्तीचे नाव असून, या प्रकरणात समोद कौर (वय 35) या इसमाला अटक करण्यात आली आहे.

  • 08 Jul 2025 03:00 PM (IST)

    08 Jul 2025 03:00 PM (IST)

    मोबाईल चोरीच्या गुन्ह्यात अटक असलेल्या हॉटेल शेफची लॉकअपमध्ये आत्महत्या

    मोबाईल चोरीच्या आरोपाखाली सहार पोलिसांनी अटक केलेल्या एका २६ वर्षीय तरुणाने लॉकअपमध्येच आत्महत्या केली. ही घटना सोमवारी (०७ जुलै २०२५) सकाळी घडली. आरोपीने लॉकअपमधील शौचालयाच्या पाइपला गळफास लावून आत्महत्या केली, अशी माहिती सहार पोलिसांनी दिली आहे. आरोपीचा मृतदेह शवविच्छेदन तपासणीसाठी जेजे रुग्णालयात पाठवण्यात आला असून मुंबई क्राइम ब्रांच या प्रकरणात तपास करीत आहे.

  • 08 Jul 2025 02:54 PM (IST)

    08 Jul 2025 02:54 PM (IST)

    बाबा सिद्दीकींच्या खात्यातील रक्कम चोरण्याचा मोठा डाव

    माजी राज्यमंत्री बाबा सिद्दीकी यांची गोळ्या झाडून गेल्या वर्षी हत्या करण्यात आली. पण त्यानंतरही तपासातून अनेक धक्कादायक माहिती समोर येत आहेत. सिद्दीकींच्या सिम कार्डचा वापर करून बँक खाते रिकामे करण्याचा कट उघडकीस आला आहे. या धक्कादायक घटनेत पोलिसांनी दिल्लीतील एका व्यक्तीला अटक केली आहे. या अशाप्रकाराने एकच खळबळ उडाली आहे.

  • 08 Jul 2025 02:45 PM (IST)

    08 Jul 2025 02:45 PM (IST)

    जन्मदात्या आईने ४५ दिवसाच्या बाळाला पाण्याच्या भांड्यात बुडवून मारलं

     

    बंगळुरूमधील एका महिलेने तिच्या ४५ दिवसांच्या नवजात बाळाची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नेलमंगला येथील विश्वेश्वरपुरा येथे ही घटना घडली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी महिलेने बाळाला एका पाण्याच्या भांड्यात बुडवलं. गरिबीला कंटाळून तिने हे भयानक पाऊल उचललं. महिला नैराश्यात होती.

  • 08 Jul 2025 02:30 PM (IST)

    08 Jul 2025 02:30 PM (IST)

    Nashik Crime : दिव्यांग महिलेला धमकावून एटीएम कार्ड हिसकावले, २३ हजारांची चोरी

     

    नाशिक रोड- दिव्यांग महिलेला दमबाजी करून तिचे एटीएम कार्ड हिसकावून त्याद्वारे २३ हजार रुपये चोरी करणाऱ्या रिक्षाचालकाला नाशिक रोड पोलिसांच्या गुन्हे शोध पथकाने अटक केली आहे. आरोपीकडून गुन्ह्यात वापरलेली रिक्षा आणि चोरीलेली रक्कम हस्तगत करण्यात आली असून, एकूण १ लाख ३ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

  • 08 Jul 2025 02:15 PM (IST)

    08 Jul 2025 02:15 PM (IST)

    ‘त्या’ मायलेकींना गरम सळाखीने चटके, यातनागृह पाहून पोलिसांचाही थरकाप उडालाय;

    यवतमाळ मध्ये अशी एक अंधश्रद्धेची घटना घडली आहे की त्यामुळे यवतमाळ शहर हादरला आहे. एका भोंदू बाबाने आपल्या घरी यातनागृह तयार करून एका महिलेला आणि तिच्या मुलीला डांबून ठेवले. एवढेच नाही तर त्यांना गरम सळाखीने चटके सुद्धा देण्यात आले. मायलेकीवर दुष्ट आत्म्याचा वावर असल्याचं सांगत त्यांच्यावर हे कृत्य करण्यात आलं. तक्रारीवरून भोंदू बाबा विरोधात बाल संरक्षण अधिनियम आणि जादूटोणा कायद्यानुसार यवतमाळ शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

  • 08 Jul 2025 02:00 PM (IST)

    08 Jul 2025 02:00 PM (IST)

    सातारा हादरला! राहत्या घरी एका विवाहितेची गळा चिरून हत्या

    सातारा तालुक्यातून एक धक्कादायक घटना समोर येत आहे. शिवथर गावात राहणाऱ्या एका विवाहितेचा तिच्याच घरी गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना समोर आली आहे. मृतक महिलेचे नाव ३० वर्षीय पूजा जाधव असे आहे. ही घटना सोमवारी (७ जुलै) ला घरी कोणी नसतांना घडली आहे. घरात कोणी नसल्याचं पाहून गळा चिरत खून करण्यात आला आहे. प्रेमसंबंधातून ही हत्या करण्यात आल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अक्षय रामचंद्र साबळे असे आहे.

  • 08 Jul 2025 01:45 PM (IST)

    08 Jul 2025 01:45 PM (IST)

    नागपूर हादरलं! प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायु पतीला संपवलं

    नागपूर: प्रियकराच्या मदतीने अर्धांगवायू झालेल्या पतीला पत्नीने संपवल्याची धक्कादायक घटना नागपुरातून समोर आली आहे. त्यांनतर पत्नीने पतीच्या हत्येनंतर नैसर्गिक मृत्यू (हार्ट अटॅक) झाल्याचा बनाव केला. मात्र हा बनाव फसला. शवविच्छेदन अहवालात ही नैसर्गिक मृत्यू नसून हत्या असल्याचं समोर आलं. ही हत्या अनैतिक संबंधास अडसर ठरत असल्याने करण्यात आली. पोलिसांनी आरोपी पत्नी आणि तिच्या प्रियकराला अटक केली आहे. नागपुरातील वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. आरोपी पत्नीचे नाव दिशा रामटेके असून आसिफ इस्लाम अन्सारी उर्फ राजाबाबु टायरवाला असं प्रियकराचं नाव आहे. मृतकाचे नाव चांद्रसेन रामटेके आहे.

  • 08 Jul 2025 01:30 PM (IST)

    08 Jul 2025 01:30 PM (IST)

    महिलेने आधी सेल्फी घेतली अन् नंतर आत्महत्या केली

    नागपूर : निर्माल्य नदीत टाकण्यासाठी आलेल्या दाम्पत्याने सर्वात आधी सेल्फी घेतली. त्यानंतर निर्माल्य नदीमध्ये टाकल्यानंतर अचानक त्या महिलेने नदीमध्ये उडी घेतली. ही घटना रविवारी घडली असून, सोमवारी त्या महिलेचा मृतदेह पोलिसांना मिळून आला आहे. ज्ञानेश्वरी विजय साकोरे (वय २३) असे आत्महत्या करणाऱ्या महिलेचे नाव आहे. विजय साकोरे आणि ज्ञानेश्वरी दोघे रामटेकच्या काचूरवाही गावातील रहिवासी आहेत.

  • 08 Jul 2025 01:18 PM (IST)

    08 Jul 2025 01:18 PM (IST)

    पुण्याला आणखी नवीन 5 पोलीस ठाणे!

    वेगाने वाढणाऱ्या शहराच्या सुरक्षिततेसाठी तसेच पुणेकरांच्या अडचणींना तत्काळ मदत मिळण्यासाठी पुण्यात आणखी नवीन ५ पोलिस ठाण्यांची निर्मिती करण्यात येणार आहे. नव्या पाच पोलिस ठाण्यांची रूपरेषा निश्चित झाली असून, त्यासंदंर्भानुसार प्रशासनाला प्रस्ताव येत्या आठवड्यात सादर करण्यात येणार आहे. शहराची गरज ओळखून पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे पोलिस दल सक्षम करण्यासाठी पावले उचलली आहेत. नुकतीच ७ पोलिस ठाणी कार्यान्वित झाल्यानंतर आणखी ५ पोलिस ठाणी सुरू करण्यासाठी जोरदार हालचाली सुरू केल्या आहेत.

  • 08 Jul 2025 01:15 PM (IST)

    08 Jul 2025 01:15 PM (IST)

    Tinder, Bumble वर बनावट प्रोफाइलद्वारे तरुणांची फसवणूक

    मुंबई मधून मोठ्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. डेटिंग अ‍ॅपवर फेक महिला प्रोफाइल तयार करून तरुणांना हॉटेलमध्ये बोलावून महागड्या ड्रिंक व अवाजवी बिलाच्या माध्यमातून फसवणूक करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात आला आहे. या प्रकरणी एकूण २२ जणांना पोलिसांनी अटक केली असून यामध्ये ६ महिलांचा समावेश आहे. या महिलांच्या ओळखीचे, चॅटिंगचे आमिष दाखवून तरुणांना आर्थिक गंडा घालण्यात येत असल्याचे पोलीस तपासातून समोर आलं आहे.

  • 08 Jul 2025 01:00 PM (IST)

    08 Jul 2025 01:00 PM (IST)

    पंढरपूर हादरलं ! पत्नीने मुलांसह आत्महत्या केल्याचे समजताच पतीनेही घेतला गळफास

    पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील कासेगाव येथे कौटुंबिक वादातून चौघांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आषाढी एकादशीच्या दिवशी हा प्रकार घडला. यामध्ये महिलेने दोन मुलांसह आपल्याच शेतातील विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मोनाली हिने आपल्या दोन मुलांना घेऊन विहिरीत उडी टाकल्याचे समजताच पती म्हमाजी यानेदेखील घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. या प्रकारामुळे पंढरपूरसह सोलापूर जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

  • 08 Jul 2025 12:45 PM (IST)

    08 Jul 2025 12:45 PM (IST)

    यवतमाळमध्ये काळा पैसा पांढरा करण्याचा प्रकार उघड;

    Yavatmal : यवतमाळ मधून काळापैसा पांढरा करण्याचा प्रकार समोर आला आहे. यवतमाळमधील अनेक मजुरांच्या खात्याचा वापर करून तीन महिन्यात १०० कोटीहून अधिक उलाढाल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. हा पैसा आयपीएलमधील असल्याचा आरोप करण्यात येत आहे. या प्रकरणात पोलिसांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला आहे.

  • 08 Jul 2025 12:35 PM (IST)

    08 Jul 2025 12:35 PM (IST)

    अखेर मनसेचा मोर्चा मीरा रोडवर दाखल

    अखेर मनसेचा मोर्चा मीरा रोडवर दाखल झाला आहे.  सकाळपासून  मनसेच्या कार्यकर्त्यांपासून अगदी सर्वसामान्य मराठी माणूसही या मोर्च्यात सहभागी झाल्याचे दिसत आहे. सुरूवातीला पोलिसांनी गर्दींवर नियंत्रण मिळवण्याचा प्रयत्न सुरू केला. पण मोठ्या गर्दीमुळे पोलिसांना गर्दीवर नियंत्रण मिळवणे अशक्य झाले आहे. याच दरम्यान पोलिस आणि नागरिकांमध्ये झटापटही झाली. अनेकांना पोलिसांनी ताब्यातही घेतले, मात्र तरीही मनसेचा मोर्चा सुरूच असल्याचे दिसत आहे

  • 08 Jul 2025 12:32 PM (IST)

    08 Jul 2025 12:32 PM (IST)

    तू राज ठाकरेंच्या घरी जा, मी तुला विकत घेऊ शकतो; अर्धनग्न अवस्थेत मनसे नेत्याच्या मुलाची हुल्लडबाजी

    एका मराठी महिलेसोबत मनसेच्या नेत्याच्या मुलाने हुल्लडबाजी केल्याचा प्रकार समोर आले आहे. त्याने दारू  पियुन अर्धनग्न अवस्थेत धिंगाणा घालत एका मुंबईतील सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरच्या गाडीला धडक देत तिच्याशी हुज्जत घातली. तसेच, इन्फ्लुएन्स व मॉडेलला शिवीगाळ करत पैशाचा आणि आपले वडिल मनसेचे नेते असल्याचा माजही दाखवला होता. ही घटना मुंबईतील अंधेरी पश्चिम परिसरात मध्य रात्री 1 वाजता घडली. सोशल मीडियावर व्हिडीओ तुफान व्हायरल झाला. मनसेच्या वतीने पत्रक काढून संबंधित मुलाचा माणसे पक्षाशी काहीही संबंद नसल्याचे पत्रकात म्हटले आहे.

  • 08 Jul 2025 12:25 PM (IST)

    08 Jul 2025 12:25 PM (IST)

    हिम्मत असेल तर अडवा - प्रताप सरनाईक

    मीरा भाईंदर इथे मनसेसह मराठी एकीकरण समितीच्या कार्यकर्त्यांनी मराठीच्या मुद्द्यावरून मोर्चाचं आयोजन केलं आहे. मात्र, या मोर्चाला परवानगी नाकारत पोलिसांनी कार्यकर्त्यांची धरपकड सुरू केली आहे. यावर शिंदेंच्या शिवसेनेचे नेते प्रताप सरनाईक यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. शिवाय त्यांनी मी स्वत: मीरा भाईंदरच्या मोर्चात सहभागी होण्यास निघतोय, हिम्मत असेल तर अडवा, असं आव्हान पोलिसांना दिलं आहे. ते म्हणाले, काल मराठी एकीकरण समितीचे नेत्यांना परवानगी नाकारली. काही लोकांना तडीपारीच्या नोटीस दिल्या आहेत. याबाबत मी पोलिस आयुक्तांची मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली आहे. त्या भागाचा आमदार म्हणून मी हे सहन करणार नाही. मी मोर्चामध्ये सामील व्हायला निघालो आहे मला पोलिसांनी अडवून दाखवावं असं सरनाईक यांनी म्हटलं आहे.

  • 08 Jul 2025 11:23 AM (IST)

    08 Jul 2025 11:23 AM (IST)

    पुण्यात लुटमारीच्या घटना वाढल्या

    कोरेगाव पार्क परिसरात दुचाकीस्वारांना धमकावून लुटल्याची घटना घडली. चोरट्यांनी मारहाण करुन  ४७ वर्षीय व्यक्तीने कोरेगाव पार्क पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या माहितीनुसार, तक्रारदार हे दौंड तालुक्यातील खोंडाचीवाडी परिसरातील आहेत. ते ३ जुलै रोजी दुपारी अडीचच्या सुमारास वाडिया महाविद्यालय परिसरातून निघाले होते. त्यावेळी महावितरण कार्यालयाजवळ दुचाकीवरुन आलेल्या चार चोरट्यांनी त्यांना अडवले. त्यांना कोयत्याचा धाक दाखवून मारहाण केली. आरडाओरडा केला, तर जीवे मारू, अशी धमकी दिली. त्यांच्याकडील १० हजारांचा मोबाइल हिसकावून नेला. पोलीस हवालदार लोणकर तपास करत आहेत.

Web Title: Maharashtra crime news in marathi live updates mumbai news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 08, 2025 | 11:21 AM

Topics:  

  • Arrested News
  • CM Devedra Fadnavis
  • cmomaharashtra
  • crime news

संबंधित बातम्या

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर
1

महिलेचे दागिने चोरणाऱ्याला दिल्लीतून ठोकल्या बेड्या; चौकशीतून आरोपीबाबत धक्कादायक माहिती समोर

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश
2

Mumbai Monorail: मुंबईतील मोनोरेलमध्ये अडकलेल्या प्रवाशांची सुखरुप सुटका; मुख्यमंत्र्यांनी दिले चौकशीचे आदेश

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप
3

पुण्यात वैष्णवी हगवणेनंतर दिव्याचाही मृत्यू; पतीसह सासरच्यांनी हत्या केल्याचा आरोप

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा
4

सावळजमध्ये राजकीय खळबळ; माजी सरपंच- उपसरपंचासह 4 सदस्यांनी दिला राजीनामा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.