crime (फोटो सौजन्य: social media)
कोल्हापूरतुन एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कोल्हापूरच्या हातकणंगले तालुक्यातील आळते येथे एका धार्मिक शिक्षण देणाऱ्या संस्थेत अल्पवयीन विद्यार्थ्यांची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या या संस्थेतील एका अल्पवयीन मुलानेच केल्याचे उघड झाले आहे. ही संस्था बंद पडून आपल्याला घरी जायला मिळावे, यासाठी अल्पवयीन विद्यार्थ्याने फैजानची हत्या केल्याची माहिती समोर आली आहे. मृत मुलाचे नाव फैजान नाजिमा (वय ११) असे आहे.
संतोष लड्डांच्या घरातील पैसे पळवण्याचा कट जादूटोण्याच्या साहाय्याने; कट आखणारा जवळचाच मित्र
फैजानचा मृतदेह सापडला होता. झोपेतच त्याचा मृत्यू झाल्याचे सुरवातीला सांगितले जात होते. मात्र पोलिसांना संशय आल्याने त्यांनी संस्थेतील मुलांची चौकशी केली. त्यावेळी एका अल्पवयीन विद्यार्थ्याने आपणाच इलेक्ट्रिक वायरचा शॉक देऊन त्याची हत्या केल्याची कबुली दिली. हत्या करणार विध्यार्थी आणि हत्या झालेला फैजण नाजिमा दोघेही बिहारचे होते. आळते येथे असणाऱ्या या धार्मिक शिक्षण संस्थेत तब्बल 80 विद्यार्थी आहेत. यापैकी बहुतांश म्हणजे 70 विद्यार्थी हे बिहारमधील आहेत. हत्या करणाऱ्या विद्यार्थ्याला बिहारमधील आल्या गावी जायचे होते. त्यासाठी ही संस्था बंद पडावी, या उद्देशाने त्याने फैजानची शॉक देऊन हत्या केली.
पुणेकरांनो सावधान! पहाटे घरोघरी डोकावत मोबाईल चोरणाऱ्या महिलेचा CCTV त थरार
साथीदारासह पहाटेच्या वेळी घरात शिरून मोबाईल आणि रोख रक्कम लंपास करणाऱ्या महिलेचा थरार सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाला आहे. ही घटना कर्वेनगर भागात घडली आहे. पहाटेच्या सुमारास महिला आणि तिचे साथीदार घराच्या आत डोकावत महिलेने चार मोबाईल फोन आणि रोकड चोरी केल्याची घटना समोर आली आहे. मुरलीधर आंगरे यांनी याबाबत पोलिसात तक्रार दिल्यानंतर वारजे पोलीस ठाण्यात या प्रकरणी अज्ञात व्यक्तींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे..
सीसीटीव्हीत काय ?
चोरी करतांना महिला सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. त्यावरून चोर महिलेला ओळखण्याचे प्रयत्न सुरु आहेत. वारजे पोलीस ठाण्यात अज्ञात महिला चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे घटनेच्या तपासात समोर आलेल्या सीसीटीव्हीत कॅमेरात, एक महिला अपार्टमेंटमध्ये जाताना दिसते . घरांमध्ये डोकावत एकूण चार मोबाईल ती आपल्या ड्रेसमध्ये लपवत असल्याची घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद झाली आहे .
धक्कादायक ! अल्पवयीन मुलाची गळा चिरून हत्या; शेतातच फेकून दिला मृतदेह