छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठा दरोडा पडला होता. वाळूजमधील उद्योजक संतोष लड्डा यांच्या निवासस्थानी १५ मी रोजी मोठा दरोडा पडला होता. या दरोड्यात साडेपाच किलो सोनं, ३२ किलो चांदी, ७० हजार रुपयांचा मुद्देमाल चोरी झाल्याचा गुन्हा दाखल झाला होता. या मोठ्या दरोड्यात एक खळबळजनक बाब समोर आली आहे. संतोष लड्डा यांच्या घरातील रोकडवर डोळा ठेवून जादूटोण्याच्या सहाय्याने ती पळवण्याचा अजब कट आखण्यात आला आला होता. लड्डा यांच्या घरी मोठ्या प्रमाणात रोकड जमा असल्याची टीप त्यांच्या जवळचाच मित्र बाळासाहेब इंगोले याने आपल्या काही साथीदारांना दिली होती. ही रक्कम चोरून नेण्यासाठी त्यांनी थेट जादूटोण्याचा आधार घेण्याचा निर्णय घेतला होता.
धक्कादायक ! 13 वर्षांच्या मुलाची गळा चिरून हत्या; शेतातच फेकून दिला मृतदेह
दरोड्याच्या घटनेतील संशयित आरोपी अमोल खोतकर याचा पोलिसांनी एन्काऊंटर केला आहे. अमोल खोतकर यांने गोळीबार करून पळण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी पोलिसांनी केलेल्या प्रत्युत्तरात्मक त्याचा मृत्यू झाला असं पोलिसांकडून सांगण्यात आले आहे. यानंतर आता या प्रकरणात आणखी एक खळबळजनक बाब समोर आली आहे.
संतोष लड्डा यांच्या जवळच्याच मित्राने ही टीप दिली असल्याचे समोर आले आहे. संतोष लड्डा यांच्या घरी करोडो रुपये पोत्यात भरून ठेवलेले आहेत. अशी टीप त्यांचाच मित्र बाळासाहेब इंगोले यांने दिली होती. पण बाळासाहेब इंगोले आणि त्याच्या काही साथीदारांना ही रक्कम जादूटोणा करून पाठवायची होती. म्हणजे एक महाराज जादूटोणा करतो आणि घरात असलेले पैसे हात न लावता बाहेर काढतो, अशी त्यांची धारणा होती. त्यांनी तो महाराजही शोधून ठेवला होता. पण, याबाबतची माहिती हासबे नावाच्या आरोपीला मिळाली होती. हासबे याने त्याच्या टीमसह संतोष लड्डा यांच्या घरी दरोडा टाकत मुद्देमाल पळवून नेल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. पोलीस याबाबतीत अधिक तपास करत आहे.
Kalyan Politics: कल्याणमध्ये ‘गायकवाड विरुद्ध गायकवाड’ वाद पुन्हा उफाळणार