Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शुक्र, 23 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Asian Para Games 2026 |
  • India Vs New Zealand |
  • tiger shroff |
  • entertainment |
  • bigg boss 20
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Dengue Death News: नियतीचा क्रूर खेळ! अवघ्या काहीच तासांत हिरावले आई-वडिलांचे छत्र; गावात पसरली शोककळा

Dengue Death News: डेंग्यूच्या जीवघेण्या संसर्गाने एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर काळाने असा काय डल्ला मारला? पतीच्या निधनाची वार्ता ऐकताच अवघ्या ४ तासांत पत्नीचीही मालवली प्राणज्योत! गावामध्ये एकाच चितेवर दोघांचे झाले अंत्यसंस्कार अन् ४ निष्पाप बालके झाली अचानक अनाथ...

  • By Sanofar Nayakawadi
Updated On: Oct 23, 2026 | 05:32 PM
Dengue Death News: नियतीचा क्रूर खेळ! अवघ्या काहीच तासांत हिरावले आई-वडिलांचे छत्र; गावात पसरली शोककळा

Dengue Death News: नियतीचा क्रूर खेळ! अवघ्या काहीच तासांत हिरावले आई-वडिलांचे छत्र; गावात पसरली शोककळा

Follow Us
Follow Us:
  • डेंग्यूच्या आजाराने अवघ्या ४ तासांच्या अंतराने पती-पत्नी दोघांचाही मृत्यू
  • गावात मृतदेह पोहोचताच शोककळा पसरली
  • हृदयद्रावक दुर्घटनेमुळे कुटुंबातील चार निष्पाप बालकांचे छत्र अचानक हरपले.
Dengue Death News: एका हसत्या-खेळत्या कुटुंबावर नियतीने अत्यंत क्रूर आघात केल्याची मन हेलावून टाकणारी घटना समोर आली आहे. उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील एलाऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसद गावात डेंग्यूच्या आजाराने अवघ्या चार तासांच्या अंतराने पती-पत्नी दोघांचाही बळी घेतला. ४८ वर्षीय मुकेश कुमार यांच्या निधनानंतर त्यांच्या ४२ वर्षीय पत्नी दीपा यांनीही रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. या हृदयद्रावक घटनेमुळे संपूर्ण गावात शोककळा पसरली असून चार निष्पाप मुले अचानक पोरकी झाली आहेत.

तापाची लागण अन् आग्रा येथे डेंग्यूचे निदान

मिळालेल्या माहितीनुसार, शेती करून कुटुंबाचा गाडा चालवणारे मुकेश कुमार यांना १९ ऑक्टोबर रोजी अचानक तीव्र ताप आला. प्रकृती खालावल्याने कुटुंबीयांनी त्यांना स्थानिक रुग्णालयात नेले; मात्र स्थिती गंभीर असल्याने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार त्यांना आग्रा येथील रुग्णालयात हलवण्यात आले. तेथे तपासणीदरम्यान त्यांना डेंग्यू झाल्याचे निष्पन्न झाले. पती लवकरच ठणठणीत बरे होऊन घरी येतील, या आशेवर कुटुंबीय होते; पण परिस्थिती वेगळेच वळण घेत होती.

हेही वाचा: Dharashiv Accident News: तुळजापूरकडे पायी जाणाऱ्या भाविकांना कंटेनरची धडक; एकाचा मृत्यू, ६ जण गंभीर

पति-पत्नी वेगवेगळ्या रुग्णालयात दाखल; दुःखाचा डोंगर

मुकेश यांच्यावर उपचार सुरू असतानाच त्यांची पत्नी दीपा यांनाही तापाचा त्रास सुरू झाला. त्यामुळे त्यांनाही आग्रा येथील दुसऱ्या एका रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. दोघेही वेगवेगळ्या रुग्णालयात मृत्यूशी झुंज देत होते. बुधवारी रात्री उपचारादरम्यान मुकेश कुमार यांची प्राणज्योत मालवली. पतीच्या निधनाची दुःखद वार्ता कानावर पडताच रुग्णालयात दाखल असलेल्या दीपा यांची प्रकृती अत्यंत खालावली. पतीच्या विरहाचा धक्का सहन न झाल्याने अवघ्या चार तासांत दीपा यांनीही या जगाचा निरोप घेतला.

हेही वाचा: Satara News: ‘तो’ आघात सहन झाला नाही! मित्राच्या विरहाने ग्रासलेल्या पूजाने वसतिगृहात संपवली जीवनयात्रा

एकाच चितेवर अंत्यसंस्कार; गाव अश्रूंत न्हाले

गुरुवारी सायंकाळी जेव्हा पती-पत्नीचे मृतदेह कसद गावात पोहोचले, तेव्हा संपूर्ण गावाने टाहो फोडला. नातेवाइकांनी व ग्रामस्थांनी अत्यंत जड अंतःकरणाने एकाच चितेवर या दुर्दैवी दांपत्यावर अंतिम संस्कार केले. एकाच रात्री आई आणि वडिलांचे छत्र हरपल्याने अनाथ झालेल्या चार चिमुकल्यांकडे पाहून उपस्थित प्रत्येकाचे डोळे पाणावले होते.

💡

Frequently Asked Questions

  • Que: ही दुर्दैवी घटना कुठे घडली आहे?

    Ans: उत्तर प्रदेशातील मैनपुरी जिल्ह्यातील एलाऊ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कसद गावात ही घटना घडली.

  • Que: पती-पत्नीच्या मृत्यूचे मुख्य कारण काय होते?

    Ans: डेंग्यूच्या जीवघेण्या आजाराच्या संसर्गामुळे आणि झालेल्या तीव्र आघातामुळे दोघांचा मृत्यू झाला.

  • Que: मृत दांपत्याचे नाव काय होते?

    Ans: मृत पतीचे नाव मुकेश कुमार (वय ४८) आणि पत्नीचे नाव दीपा (वय ४२) असे होते.

Web Title: Mainpuri dengue couple death four children orphaned news sn

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Oct 23, 2026 | 05:32 PM

Topics:  

  • Dengue
  • Dengue Virus
  • Husband and wife

संबंधित बातम्या

Crime News: घरगुती वादातून रक्तरंजित थरार; पत्नीची चाकूने वार करून हत्या, रिसोड येथील घटना; आरोपी पती अटकेत
1

Crime News: घरगुती वादातून रक्तरंजित थरार; पत्नीची चाकूने वार करून हत्या, रिसोड येथील घटना; आरोपी पती अटकेत

कोथरूडकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! डेंग्यू रोखा, अन्यथा…; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा
2

कोथरूडकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! डेंग्यू रोखा, अन्यथा…; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.