
Risod Crime News
सासरच्या छळाला कंटाळून हिनाने संपवले जीवन; पतीसह तिघांवर पोलिसांची मोठी कारवाई
घटनेनंतर फरार झालेल्या पतीला पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. माहितीनुसार, कल्पना योगेश ढवळे या उच्चशिक्षित होत्या. त्यांना मुलगा आणि मुलगी अशी दोन मुलं आहेत. त्यांचे माहेर दाताडा बुद्रुक येथे असून, त्यांचे आई-वडील शेती व्यवसाय करतात. ढवळे कुटुंब काही महिन्यांपूर्वी रिसोड शहरातील हिंगोली मार्गावरील छत्रपती संभाजीनगर परिसरात भाड्याच्या घरात राहण्यासाठी आले होते. दरम्यान, रविवारी सकाळी पती-पत्नीमध्ये झालेल्या वादाची माहिती पुढे आली. या वादातून पत्नीच्या चारित्र्याविषयी संशय घेत योगेशने कल्पनावर धारदार चाकूने वार केल्याचा आरोप आहे.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या यांना उपचारासाठी कल्पना रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत माळवली. या घटनेमुळे रिसोड शहरात व छत्रपती संभाजी नगरामध्ये खळबळ उडाली. घटनेनंतर आरोपी पती घटनास्थळावरून पसार झाला होता. मात्र, रिसोड पोलिस ठाण्याचे ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवली. त्यानंतर आरोपी पतीला ताब्यात घेण्यात आल्याची माहिती समोर आली. या प्रकरणात मृत महिलेचे भाऊ दत्ता लक्षण कंकाळ यांनी पोलिसांकडे रीतसर तक्रार दिली. तक्रारीतील तपशील, पोलिसांची अधिकृत भूमिका आणि पुढील कायदेशीर कारवाईबाबत अधिकृत माहिती मिळणे अपेक्षित आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, आरोपीचे साडू नंदू सुदामा तहकीक (मसला) आणि दीपक मगर (मकोडी) यांनी यापूर्वीही त्याला अनेकवेळा समजावून सांगितले होते. मात्र, कौटुंबिक वादाचे नेमके स्वरूप काय होते आणि या घटनेमागील परिस्थिती काय होती. याचा तपासातून उलगडा होणे आवश्यक आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे २ लहान मुलांच्या आयुष्यातून आईचे प्रेम आणि आधार हरपला. उच्चशिक्षित असलेल्या कल्पना यांच्या मृत्यूने त्यांच्या माहेरच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कौटुंबिक मतभेद आणि संशयाचे रूपांतर हिंसाचारात झाल्यास त्याचे परिणाम संपूर्ण कुटुंबाला भोगावे लागतात, याची जाणीव करून देणारी ही घटना आहे. सध्या या प्रकरणातील पुढील तपास आणि कायदेशीर प्रक्रिया महत्त्वाची असून, पोलिसांच्या अधिकृत तपासातून घटनेचे नेमके कारण स्पष्ट होणार आहे.
मद्यधुंद महिलेचा धिंगाणा! महिला पोलिस कर्मचाऱ्याच्या लगावली कानशिलात; पुण्यातील प्रकार