
कोथरूडकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर! डेंग्यू रोखा, अन्यथा...; शरद पवारांच्या राष्ट्रवादीचा इशारा
कोथरूड परिसरात डेंग्यूच्या रुग्णसंख्येत वाढ होत असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. डेंग्यूचा प्रसार रोखण्यासाठी महापालिका प्रशासनाने तातडीने ठोस पावले उचलण्याची गरज असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले. परिसरातील स्वच्छता नियमित आणि प्रभावीपणे राखावी, साचलेल्या पाण्याची ठिकाणे शोधून त्यावर योग्य उपाययोजना कराव्यात, तसेच डासांची उत्पत्ती रोखण्यासाठी आवश्यक त्या ठिकाणी औषध फवारणी करावी, अशी मागणी करण्यात आली.
पावसाळ्यानंतर अनेक ठिकाणी पाणी साचल्याने डासांची उत्पत्ती होण्याची शक्यता असते. त्यामुळे परिसरातील सार्वजनिक ठिकाणे, गल्ल्या आणि साचलेल्या पाण्याच्या ठिकाणांची नियमित तपासणी करून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने सांगण्यात आले आहे.
नागरिकांच्या आरोग्याशी संबंधित या महत्त्वाच्या प्रश्नाकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष द्यावे. डेंग्यू नियंत्रणासाठी केवळ तात्पुरत्या उपाययोजना न करता ठोस कृती आराखडा तयार करून त्याची प्रभावी अंमलबजावणी करावी, अशी मागणी गिरीश गुरनानी यांनी केली. प्रशासनाकडून त्वरित कार्यवाही न झाल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्र पवार) यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी प्रियंका तांबे, सचिन यादव, सीताराम तोंडे पाटील, अधिराज कसबे, अमोल गायकवाड यांच्यासह पक्षाचे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. कोथरूड परिसर डेंग्यूमुक्त करण्यासाठी प्रशासनाने तातडीने कार्यवाही करून नागरिकांना दिलासा द्यावा, अशी मागणी पक्षाच्या वतीने करण्यात आली.
हे सुद्धा वाचा : लोणावळ्यात बनावट कॉल सेंटरचा पर्दाफाश; २० जणांना अटक, ३६.४१ लाखांचा मुद्देमाल जप्त
Ans: परिसरात स्वच्छता, औषध फवारणी आणि साचलेल्या पाण्याच्या ठिकाणी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली.
Ans: राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे कोथरूड विधानसभा अध्यक्ष गिरीश गुरनानी आणि कार्यकर्त्यांनी सहाय्यक आयुक्त सुहास जाधव यांना निवेदन दिले.
Ans: डेंग्यू रोखण्यासाठी तातडीने उपाययोजना न केल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा पक्षाने दिला.