
मध्य प्रदेशातून पिस्तुलांचा पुरवठा, पुण्यात विक्रीचा डाव; वाघोली पोलिसांची मोठी कारवाई
आकाश ऊर्फ गज्या अशोक मोरे (वय २१, रा. वडगाव शेरी), मनिष दिलीप फेर्नाडिस (वय २६) आणि चंद्रेश्वर मल्लेशी चारी (वय २१, दोघे रा. चांदोर, मडगाव, गोवा) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. एका १७ वर्षीय विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेतले आहे. मध्य प्रदेशातील सेंधवा येथील विशाल सिंह हा या टोळीला पिस्तुले पुरवत असल्याचे तपासात समोर आले आहे.
मध्य प्रदेशातून शस्त्रांचा पुरवठा
पोलिसांनी आकाश मोरे याच्या बॅगेची झडती घेतली असता त्यामध्ये चार देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे आणि एक रिकामे मॅगझिन आढळले. प्राथमिक चौकशीत ही पिस्तुले मध्य प्रदेशातील सेंधवा येथील विशाल सिंह याच्याकडून विकत आणल्याची माहिती आकाशने दिली. ही शस्त्रे गोव्यातील तरुणांना विकण्यासाठी आणल्याचेही त्याने सांगितले. त्यामुळे पुणे, गोवा आणि मध्य प्रदेश असे शस्त्र तस्करीचे धागेदोरे समोर आले आहेत. पोलिस उपनिरीक्षक शिवशंकर राघू पुढील तपास करीत आहेत.
आंतरराज्य टोळी सक्रीय असल्याचा पोलिसांचा संशय
आरोपीविरुद्धही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाघोली पोलिसांच्या तपास पथकाला गोपनीय बातमीदारामार्फत या शस्त्रविक्रीची माहिती मिळाली. गोवा पासिंगच्या केटीएम दुचाकीवरून आलेले दोघे तरुण केसनंद परिसरात आकाश मोरेकडून पिस्तूल खरेदी करणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिस उपनिरीक्षक शिवशंकर राघू यांच्या पथकाने जोगेश्वरी पॅलेस परिसरात दोन पंचांसह साध्या वेशात सापळा रचला.
Ans: वाघोली पोलिसांनी तिघांना अटक केली असून, एका १७ वर्षीय विधीसंघर्षित बालकालाही ताब्यात घेतले आहे. अटक केलेल्यांमध्ये गोव्यातील दोघे आणि पुण्यातील एका सराईत गुन्हेगाराचा समावेश आहे.
Ans: आरोपींकडून चार देशी बनावटीची पिस्तुले, १५ जिवंत काडतुसे, एक रिकामे मॅगझिन, दोन दुचाकी, मोबाईल आणि रोकड असा एकूण ४ लाख १८ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
Ans: प्राथमिक तपासात मध्य प्रदेशातील सेंधवा येथील विशाल सिंह हा आरोपींना पिस्तुलांचा पुरवठा करत असल्याचे समोर आले आहे. या प्रकरणाचे धागेदोरे पुणे, गोवा आणि मध्य प्रदेशपर्यंत पोहोचले आहेत.