Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड

राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक प्रविण सोनवणे यांनी ही माहिती दिली. उत्पादन शुल्क विभागाचे पथक 31 मे रोजी दौंड परिसरात अवैध मद्यविरोधी गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली होती.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jun 04, 2026 | 03:29 PM
दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड

दौंड उत्पादन शुल्काची मोठी कारवाई; गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड

Follow Us
Follow Us:

पाटस : राज्य उत्पादन शुल्क, दौंड विभागाने अवैध मद्यविक्री आणि वाहतुकीविरोधात धडक कारवाई करत गोवा राज्यनिर्मित विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उधळून लावली आहे. या कारवाईत एका आरोपीला अटक करण्यात आली आहे. मद्यसाठा, चारचाकी वाहन आणि मोबाईलसह सुमारे 6 लाख 98 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पाटस दौंड अष्टविनायक रोडवरील बेटवाडी हद्दीत ही कारवाई करण्यात आली आहे.

याबाबत राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलिस निरीक्षक प्रविण सोनवणे यांनी ही माहिती दिली. उत्पादन शुल्क विभागाचे पथक 31 मे रोजी दौंड परिसरात अवैध मद्यविरोधी गस्त घालत असताना गोपनीय माहिती मिळाली होती. त्यानुसार पाटस-दौंड रस्त्यावर बेटवाडी गावच्या हद्दीत माय ऊर्जा कंपनी आउटलेट समोर सापळा रचण्यात आला. पाटसकडून दौंडकडे येणारी मारुती सुझुकी स्विफ्ट (क्रमांक MH-12-KE-9799) ही गाडी थांबवून तपासणी केली असता या गाडीत गोवा बनावटीच्या विदेशी मद्याचा मोठा साठा आढळून आला.

तसेच गाडीचालक शुभम उत्तम रुपनवर (रा. दापोडी, ता. दौंड जि.पुणे) याला ताब्यात घेऊन अटक करण्यात आली. त्याच्या चौकशीतून मिळालेल्या माहितीवरून, आरोपीच्या दापोडी येथील राहत्या घरासमोरील खोलीवर छापा टाकण्यात आला. तेथेही मोठ्या प्रमाणावर अवैध विदेशी मद्याचा साठा आढळला. यावेळी पोलीसांनी इम्पिरियल ब्ल्यू, रॉयल स्टॅग, मॅकडोवेल्स नंबर वन आणि रॉयल चॅलेंज या ब्रँडच्या 180 मिलीच्या एकूण 816 सीलबंद बाटल्या तसेच या गुन्ह्यात वापरलेली मारुती स्विफ्ट कार, एक रियलमी कंपनीचा मोबाईल फोन असा एकूण किंमत 6 लाख 98 हजार 160 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

आरोपीकडे मद्य बाळगण्यासाठी किंवा वाहतुकीसाठी कोणताही वैध परवाना नसल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई राज्य उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस निरीक्षक प्रवीण सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम निरीक्षक प्रदीप झुंजरुक, मयुर गाडे, ठाकूर, सहाय्यक दुय्यम निरीक्षक सुवास पोळ तसेच जवान संकेत वाजे, सोपान टोंपे, साळुंके, देवकर आणि वामने यांच्या पथकाने ही कारवाई केली. पुढील तपास दुय्यम निरीक्षक मयुर विजय गाडे करीत आहेत.

ट्वीशा शर्मा प्रकरणाची पुनरावृत्ती ! 3 कोटींच्या हुंड्यानंतर केली 2 कोटींची मागणी, मुलीने संपवलं आयुष्य; सैनिक नवऱ्यावर FIR दाखल

दरम्यान, परराज्यातून अवैध मद्याची वाहतूक रोखण्यासाठी उत्पादन शुल्क विभागाची अशी धडक कारवाई सुरूच राहणार असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

Web Title: Major excise department operation in daund illicit transport of goa made foreign liquor exposed

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 04, 2026 | 03:29 PM

Topics:  

  • crime news
  • Liquor Case
  • pune news

संबंधित बातम्या

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका
1

Bombay HC : ‘सण कोणताही असो, नियम एकच!’ ध्वनीप्रदूषणावर हायकोर्टाची महत्त्वाची भूमिका

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश
2

दर आठवड्याला मनपा अधिकारी उतरणार वॉर्डामध्ये; तक्रारी वाढल्यानंतर महापालिका आयुक्तांचे आदेश

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
3

पुणे जिल्हा बँकेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी-भाजपमध्ये चुरस? आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल
4

राज ठाकरेंवर रील केली अन् महेश मोटेला ‘मनसे’वाल्यांनी काळं फासलं; डोक्यावर चप्पल ठेवून उठाबशा, VIDEO व्हायरल

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.