(फोटो सौजन्य: Pinterest)
UP Crime : पाणीपुरी खायला घालणं महागात पडलं, सनकी आशिकने दुकानदारावर चाकूने केला प्रहार
करोडोंचे गिफ्ट देऊनही आणखी पैशांची मागणी
पिडित वडिल पी. दक्षिणामूर्ति यांनी न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत म्हटले की, त्यांनी २ मार्च २०२५ रोजी आपली एकुलती एक लेक कविता हिचे लग्न तामिळनाडूत राहणाऱ्या डॉ. ओम नागार्जुन याच्यासोबत लावून दिले होते. ओम सध्या जबलपूर येथील जेकेआरआरसीमध्ये मेजर पदावर कार्यरत आहे. त्यांनी आरोप लावला की, लग्नानंतर कविताता सासरी छळ केला जात होता. जावई ओम याला आपले नवीन हाॅस्पिटल ओपन करायचे होते ज्यासाठी त्याने कवितावर दबाव आणला. कविताने जेव्हा माहेरी जाऊन पैसे आणण्यास नकार दिला त्यानंतर तिचा संशयास्पद मृत्यू घडला.
वडिलांचा जावयावर आरोप
या प्रकरणात मृत महिलेच्या वडिलांनी मुलीच्या मृत्यूचा आरोप जावयावर लावला आहे. त्यांनी सांगितले की, लग्नानंतर कविताचे मानसिक शोषण केले जात होते. लग्नाच्या तीन महिन्यांनंतरच नागार्जुनाने कविताशी बोलणे कमी केले. त्याचा जास्त वेळ इंदाैरच्या एका महिला मैत्रणीशी बोलण्यात जात होता. काॅल रेकाॅर्ड्सचा हवाला देत वडिलांनी आरोप केला की, जावई १०० तासांहून अधिक वेळ त्या महिला मैत्रिणीसोबत घालवत होता.
प्रकरणावर उपस्थित अनेक प्रश्न
कविताचा मृत्यू १० जून २०२५ रोजी सकाळी झाला. परंतु याची टाईमलाईन अनेक प्रश्न उपस्थित करते. याचिकेनुसार, ९ मार्च २०२५ रोजी रात्री १२.३० वाजताच्या सुमारास ओम नागार्जुन आपली पत्नी कविता हिला गंभीर अवस्थेत जबलपुरच्या मिलिट्री हाॅस्पिटलमध्ये घेऊन आला. डॉक्टरच्या बंगल्यावर तैनात असलेल्या चौकीदाराच्या जबाबानुसार, मेजर रात्री सुमारे १० वाजता आपल्या जखमी पत्नीला घेऊन गाडीतून घरातून निघाले आणि रात्री सुमारे १ वाजता रुग्णालयात पोहोचले. अशात दक्षिणामूर्ति यांच्या वकिलाने प्रश्न उपस्थित केला की, ५ मिनिटांच्या अंतरावर असलेले हाॅस्पिटल गाठायला मेजरला तीन तासांचा अवधी का लागला.
रुग्णालयात पोहचल्यानंतर मेजर जावईवर डाॅक्टरांची दिशाभूल करण्याचाही आरोप लावण्यात आला आहे. सांगितलं जातंय की, ओमने डाॅक्टरांना सांगितले की, कविताच्या घरी आधीपासून डायबिटिज आणि हृदयाच्या आजाराचा इतिहास आहे ज्यामुळे डाॅक्टरांनी तिला कार्डियक अरेस्ट आला असावा हे समजून तिच्यावर उपचार करायला सुरुवात केली आणि काही वेळातच कविता कोमात गेली. यानंतर सकाळी तिची मृत्यू झाला. ही माहिती मिळाल्यावर, गोराबाजार पोलीस ठाण्याने केवळ गुन्हा दाखल करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. मेजरने आपल्या ओळखीचा फायदा घेत पत्नीचा मृत्यू हृदयविकाराच्या झटक्याने झाला आहे असा खोटा अहवाल तयार केल्याचा आरोपही त्याच्यावर लावण्यात आला आहे.
गोवा बनावटीच्या विदेशी मद्याची चोरटी वाहतूक उघड; दौंड उत्पादन शुल्क विभागाची मोठी कारवाई; तब्बल…
वडिलांची न्यायासाठी मागणी
पिडित वडिलांनी सांगितले की, मागील एक वर्षापासून ते जबलपूर पोलिसांकडे उच्च स्तरीय कारवाईची आणि खुनाचा गुन्हा दाखल करण्याची विनंती करत आहेत. परंतु दबावामुळे पोलिस या प्रकरणावर कोणतीही कारवाई करण्यास तयार नाहीत. मुलीला न्याय मिळवून देण्यासाठी त्यांनी याआधीही प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात तक्रार दाखल केली होती पण तिथून दिलासा न मिळाल्याने त्यांनी आता जिल्हा न्यायालयात पुनरीक्षण याचिका दाखल केली आहे.






