Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • West Bengal Election Result 2026 |
  • IPL 2026 |
  • Marathi News |
  • West Bengal Election Result 2026 |
  • US-Israel Iran War
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

समुपदेशनाच्या नावाखाली ‘तो’ करायचा मुलींचे लैंगिक शोषण; एका तरुणीला तर दारू पाजली अन्…

मृणाल विजय घायवट (वय 33) आणि पल्लवी किशोर बेलखोडे (वय 27) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पल्लवी ही सुद्धा पूर्वी घायवटची विद्यार्थिनी होती. नंतर ती घायवटच्या समुपदेशन केंद्रात काम करू लागली.

  • By कृपादान आवळे
Updated On: May 30, 2025 | 07:59 AM
धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

धक्कादायक ! अल्पवयीन मुलीवर तीन महिन्यांत तिघांकडून वेळोवेळी लैंगिक अत्याचार; इतर दोघांनी केला विनयभंग

Follow Us
Close
Follow Us:

नागपूर : अभ्यासात एकाग्रता वाढवण्याच्या नावाखाली अनेक मुलींचे शोषण करणारा बोगस मानसशास्त्रज्ञ विजय प्रभाकर घायवट हा सध्या तुरुंगात आहे. दरम्यान, एसआयटीने आता या प्रकरणात त्याची पत्नी आणि मैत्रिणीलाही अटक केली आहे. त्या दोघींच्या मदतीनेच घायवट हे कृत्य करत होता, असे म्हटले जात आहे.

मृणाल विजय घायवट (वय 33) आणि पल्लवी किशोर बेलखोडे (वय 27) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. पल्लवी ही सुद्धा पूर्वी घायवटची विद्यार्थिनी होती. नंतर ती घायवटच्या समुपदेशन केंद्रात काम करू लागली. सध्या ती वर्धेच्या देवळी येथे पुरवठा निरीक्षक म्हणून काम करते. गेल्या वर्षी एका अल्पवयीन मुलीने घायवटच्या दुष्कृत्यांचा पर्दाफाश केला होता. 2014 मध्ये, ती घायवटच्या मानेवाडा परिसरातील मनोविकास माइंड डेव्हलपमेंट सेंटरमध्ये समुपदेशनासाठी गेली होती. अभ्यासात एकाग्रता वाढवण्यासाठी घायवटने तिला थेरपी घेण्याचा सल्ला दिला. तो थेरपीच्या बहाण्याने तिच्यासोबत अश्लील कृत्ये करायचा.

दरम्यान, घायवटने दारू पाजून तिच्यावर लैंगिक अत्याचारही केला. त्याने या दुष्कृत्याचे फोटो आणि व्हिडिओ देखील बनवले आणि ते त्याने आपल्या पेन ड्राइव्ह आणि संगणकाच्या हार्ड डिस्कमध्ये ठेवले. नंतर, तो ते व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देऊन तिचे शोषण करत होता. त्याच्या जाळ्यात अडकणारी ती काही एकटी नव्हती.

31 मेपर्यंत पोलिस कोठडी

पीडितांच्या चौकशीदरम्यान, घायवट हा त्याची पत्नी मृणाल आणि पल्लवी यांच्या मदतीने हे कृत्य करत असल्याचे उघड झाले. त्या दोघीही केंद्रात येणाऱ्या तरुणींना त्याच्याशी लैंगिक संबंध प्रस्थापित करण्यासाठी प्रोत्साहित करत होत्या. पोलिस बऱ्याच दिवसांपासून त्या दोघींचा शोध घेत होते. अखेर बुधवारी पोलिसांना त्यांच्याबद्दल माहिती मिळाली. हुडकेश्वरचे ठाणेदार ज्ञानेश्वर भेदोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक रामटेके, साखरकर आणि कॉन्स्टेबल कल्याणी यांनी दोघांनाही अटक केली. पोलिसांनी दोघींनाही गुरुवारी न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यांना 31 मेपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत.

अनेक तक्रारी येताहेत पुढे

घायवटकडे आपली मानसिक समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येक मुलीसोबत तो असेच कृत्य करायचा. त्या मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आणि एकामागून एक इतर तीन मुलींनी घायवटविरुद्ध तक्रार केली.

पीडितांना तक्रारीसाठी पुढे येण्याचे आवाहन

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घायवटच्या लॅपटॉप, संगणक आणि पेन , ड्राइव्हमध्ये अनेक मुलींचे आक्षेपार्ह व्हिडिओ आणि छायाचित्रे सापडली आहेत. परंतु काही पीडित मुलींचे लग्न झाले आहेत आणि काही शिक्षण घेतल्यानंतर नोकरी करत आहेत. बदनामीच्या भीतीपोटी पीडित मुली तक्रार करण्यासाठी पुढे येण्याचे टाळत आहेत. एसीपी नरेंद्र हिवरे यांनी सर्व पीडितांना कोणतीही न भीती न बाळगता पोलिसांकडे तक्रार करण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Man abused girls under the name of counseling

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 30, 2025 | 07:59 AM

Topics:  

  • Crime in Nagpur
  • crime news

संबंधित बातम्या

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन
1

तरुणीने थोबाडीत मारल्यामुळे तरुणानं उचललं टोकाचं पाऊल; गळफास लावून संपवले जिवन

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ
2

मुलांची आठवण आली, वडील भेटायला सासरवाडीत गेले अन्…; पुण्यातील घटनेनं खळबळ

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी
3

पुण्यात ‘हिट अँड रन’, 4 वर्षाच्या चिमुकल्याचा मृत्यू; दाम्पत्य गंभीर जखमी

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई
4

शंभरहून अधिक गुन्हे दाखल असलेल्या सराईताला ठोकल्या बेड्या; अलंकार पोलिसांची मोठी कारवाई

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.