
पत्रकार असल्याचे सांगून पैसे उकळणाऱ्या वर नेरूळ मध्ये खंडणीचा गुन्हा दाखल (फोटो सौजन्य-X)
Navi Mumbai Crime News Marathi : विविध बार व हॉटेलमध्ये जाऊन पैसे मागणाऱ्या व स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्यावर इस्मावर नेरुळ पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नवी मुंबई शहरात अनेक ठिकाणी डान्सबार, सर्विस बार, या आस्थापना आहेत. या चालू ठेवण्यासाठी पैशाची मागणी करणाऱ्या, व स्वतःला पत्रकार म्हणवणाऱ्या देवेश मिश्रा याच्या विरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
देवेश मिश्रा हा नेरुळ परिसरातील शिरवणे गावातील बार चालकांना बार सुरू ठेवण्यासाठी फोनवरून पैशांची मागणी करत होता. जर पैसे दिले नाही तर बारचे फोटो ट्विटरवर ट्विट करून तसेच बातम्यांमध्ये प्रसारी करण्याची धमकी देत बार चालकांकडून दरमहा 2 हजार ते 4 हजार रुपयांची मागणी करत होता. देवेन मिश्रा याच्या या वागणुकीला त्रस्त होऊन अखेर नेरुळ पोलीस ठाण्यात त्याच्या विरुद्ध बार चालकांनी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी पत्रकार म्हनवणाऱ्या देवेन मिश्रा याच्यावर खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. तर देवेन मिश्र याने एपीएमसी पोलीस ठाणे हद्दीत देखील बाबा पॅलेस या बारमध्ये अशाच प्रकारे धमकी देऊन पैशाची मागणी केल्याने देवेन मिश्रा याच्यावर एपीएमसी पोलीस ठाण्यात देखील गुन्हा दाखल आहे. याबाबत पुढील तपास पोलीस करत आहेत.
काही दिवसांपूर्वी दिव्यातील विकासकाकडे खंडणी मागितल्याप्रकारणी चौघा जणांवर रबाळे पोलीस ठाण्यात खंडणीचा गुन्हा दाखल केला आहे. विकासक कन्हैयासिंग कुशवाह यांनी बांधलेल्या घणसोली डी मार्ट समोर जिजामाता नगरमधील महालक्ष्मी अपार्टमेंट अनधिकृत असल्याचे सांगून कुशवाह यांच्याकडून पैसे मागितले तसेच पैसे ना दिल्यास त्या इमारतीवर कारवाई करण्याची धमकी दिल्याने विकासक कुशवाह यांनी रबाळे पोलीस ठाण्यात चौघांविरोधात खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान दिव्यातील रहिवासी असणारे विकासाक कन्हैयासिंग कुशवाह यांनी तीन वर्षांपूर्वी, घनसोली डी मार्ट समोरील जिजामाता नगर मध्ये महालक्ष्मी बिल्डिंग बनवली होती. ही बिल्डिंग बनवत असताना त्यांची ओळख सचिन कदम यांच्याशी झाली. सचिन कदम यांनी स्वतःची ओळख पत्रकार म्हणून सांगितली. दोघांमध्ये ओळख वाढल्यावर सचिन कदमचे कुशवाह यांच्या कार्यालयात येणे जाणे वाढले. त्यामुळे ऑफिसमध्ये काम करणारी महिला रेखा शिंदे याच्याशी ओळख झाली. नंतर सचिन याने सुरेश मंगरूळकर हे देखील पत्रकार असल्याचे सांगत त्यांची ओळख कुशवाह यांच्याशी करून दिली.