Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • शनि, 3 ऑक्टोबर 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ind vs WI |
  • asian games 2026 |
  • entertainment |
  • bigg boss 20 |
  • crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

मनोहर भोसले प्रकरणाचा एसआयटी तपास वेगाने, २४ सहआरोपी निष्पन्न; तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

मनोहर भोसले प्रकरणाचा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून वेगाने तपास सुरू आहे. आतापर्यंत २४ सहआरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली असून, अटक केलेल्या तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

  • By विवेक
Updated On: Aug 17, 2026 | 09:59 PM
मनोहर भोसले प्रकरणाचा एसआयटी तपास वेगाने, २४ सहआरोपी निष्पन्न; तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

मनोहर भोसले प्रकरणाचा एसआयटी तपास वेगाने, २४ सहआरोपी निष्पन्न; तिघांना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी

Follow Us
Follow Us:

सोलापूर : मनोहर भोसले प्रकरणाचा सोलापूर ग्रामीण पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडून (एसआयटी) वेगाने तपास सुरू असून, आतापर्यंत तपासात २४ सहआरोपी निष्पन्न झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या तीन आरोपींना न्यायालयाने २१ ऑगस्ट २०२६पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान, या प्रकरणातील आरोपी रामदास झोळ फरार असून, त्याच्या शोधासाठी विशेष पथक रवाना करण्यात आले आहे.

कुर्डूवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक १९२/२०२६ अन्वये २३ एप्रिल २०२६ रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भारतीय न्याय संहितेतील विविध कलमांसह महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक अधिनियमातील संबंधित कलमांनुसार पोलिसांकडून कारवाई करण्यात आली आहे. मुख्य आरोपी मनोहर चंद्रकांत भोसले व त्याच्या साथीदारांविरुद्ध सोलापूर ग्रामीण जिल्ह्यात एकूण सहा गुन्हे दाखल असल्याचे पोलिसांनी सांगितले.

एसआयटीकडून आर्थिक व्यवहारांचीही चौकशी

गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष तपास पथकाची स्थापना करण्यात आली आहे. तपासादरम्यान दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथील दत्तकला इन्स्टिट्यूटचे संस्थापक अध्यक्ष रामदास झोळ यांचा मनोहर भोसले याला प्राप्त झालेल्या कथित अवैध पैशांच्या विल्हेवाटीत सहभाग असल्याचे निष्पन्न झाल्याचा दावा पोलिसांनी केला आहे.

Buldhana News: दोन कोटींचा ‘डिजीटल गंडा’; २ आरोपी अटकेत सायबर पोलिसांची कारवाई, ज्येष्ठाची फसवणुक प्रकरण

या अनुषंगाने पोलिसांनी संबंधित आर्थिक व्यवहार तसेच या प्रकरणाशी संबंधित व्यक्तींच्या भूमिकेचा तपास सुरू ठेवला आहे. तपासातून आणखी काही बाबी समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

तिघांना अटक; २१ ऑगस्टपर्यंत कोठडी

या प्रकरणात राजेंद्र गोकुळ हुंबे याला ११ ऑगस्ट रोजी, लक्ष्मीकांत मन्मथ लिगाडे याला १३ ऑगस्ट रोजी, तर माया झोळ यांना १६ ऑगस्ट रोजी अटक करण्यात आली. तिन्ही आरोपींना १७ ऑगस्ट रोजी न्यायालयासमोर हजर करण्यात आले.

पोलिसांनी तपासासाठी कोठडीची मागणी केली. न्यायालयाने पोलिसांची मागणी मान्य करत तिन्ही आरोपींना २१ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. या कालावधीत आरोपींची भूमिका, संबंधित व्यवहार तसेच प्रकरणातील इतर व्यक्तींशी असलेले संबंध याबाबत तपास केला जाणार आहे.

रामदास झोळचा शोध सुरू

दरम्यान, आरोपी रामदास झोळ फरार असून त्याचा शोध घेण्यासाठी पोलिसांचे विशेष पथक रवाना करण्यात आले आहे. त्याच्या संभाव्य ठिकाणांचा शोध घेतला जात असून, तांत्रिक व इतर उपलब्ध माहितीच्या आधारे तपास सुरू आहे.

मनोहर भोसले प्रकरणातील आरोपींची संख्या २४ सहआरोपींपर्यंत पोहोचल्याने तपासाची व्याप्ती वाढली आहे. अटक केलेल्या आरोपींकडून मिळणारी माहिती, आर्थिक व्यवहार आणि इतर संबंधित बाबींच्या आधारे एसआयटीकडून पुढील तपास करण्यात येत आहे.

पोलिसांनी केलेले आरोप हे तपासाचा भाग असून, न्यायालयीन प्रक्रियेत दोष सिद्ध होईपर्यंत संबंधित आरोपींना कायद्यानुसार निर्दोष मानले जाते.

पाटस हद्दीत अष्टविनायक मार्गावर भीषण अपघात; भरधाव कंटेनर थेट नर्सरीत घुसला अन्…

Web Title: Manohar bhosale case sit investigation 24 co accused solapur

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 17, 2026 | 09:59 PM

Topics:  

  • Solapur
  • Solapur News
  • Solapur Police

संबंधित बातम्या

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली
1

Solapur News: पाणीटंचाईने त्रस्त तुळशी गाव चक्क विक्रीला; ५०० हून अधिक तरुणांची लग्ने रखडली

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.