Washim News: विकासकामे वेळेत पूर्ण करा, पालकमंत्री भरणे यांचे निर्देश; जिल्हा वार्षिक योजनेची बैठक
सायबर पोलिस स्टेशन बुलढाणाचे पोलिस निरीक्षक गजानन कांबळे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ३ ऑगस्ट रोजी अहिल्यानगर येथून शुभम नांगल याला ताब्यात घेतले. त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे गुरुवारी मुंबई येथून धनराज उर्फ रॉबीन विश्णाराम विश्नोई जोधपुर, राजस्थान आणि मुनाफ शेख अनवर शेख अहिल्यानगर या दोघांचा ठाणे येथे सिनेस्टाईल पाठलाग करून ५ लाख रुपयांचा चेक विड्रॉ करताना रंगेहात पकडण्यात आले.
२ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल फ्रीज जप्त, तपासादरम्यान पोलिसांनी जप्त केले. एनसीसीआरपी पोर्टलवर गोठवलेली रक्कम ३९ लाख रुपये, गोल्ड लोन,अकाउंटवरील रक्कमः १४ लाख रुपये, रंगेहात जप्त चेक रक्कम ५ लाख रुपये, जप्त अॅपल व अँड्रॉईड फौन्नसः १ लाख २७ हजार, एमआरएम पोर्टलद्वारे फ्रीज रक्कम १ लाख ५० हजार रुपये, एकूण जप्त/गोठवलेला मुद्देमाल ५२ लाख ७७हजार रुपयांचा मुद्देमाल करण्यात आला.
ज्येष्ठ नागरिकाचे गेलेले संपूर्ण २ कोटी रुपये परत मिळवण्यासाठी पोलिस अहोरात्र प्रयत्न करत आहेत. अटक आरोपीकडून मिळालेल्या माहितीनुसार या गुन्हाची सेंट्रल कमांड राजस्थान येथे असल्याचे समोर येत आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक नीलेश तांबे व अपर पोलिस अधीक्षक अमोल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक गजानन कांबळे, एएसआय शकील खान, हेकों प्रशांत गावंडे, राजदीप वानखडे विक्की खरात, राजू आहदे, पोकों कैलास ठोंबरे, राहुल इंगवी, क्षितिज तायडे व शुभम बोराडे यांच्या पथकाने केली, आरोपींना नांदुरा न्यायालयात हजर करण्यात आले, डिजीटल अरेस्ट, टास्क फ्रॉड, आणि शेअर मार्केट ट्रेडिंगच्या नावाखाली होणान्या फसवणुकीपासून नागरिकांनी सावध राहावे.