Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • मंगळ, 11 ऑगस्ट 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • IND vs SL |
  • Politics |
  • NEET Exam |
  • maharashtra |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

पुण्यात ‘खाकी’ला डाग! गेल्या 7 वर्षात 333 पोलिसांचे निलंबन; तर ‘इतक्या’ जणांवर बडतर्फीची कारवाई

गेल्या सात वर्षात तब्बल ३३३ जणांवर निलंबनाची कारवाई, तर ६१ जणांवर बडतर्फीची कारवाई झाल्याचे समोर आले आहे.

  • By ज्ञानेश्वर मोरे
Updated On: May 12, 2026 | 12:03 PM
राज्यात 15 हजार PSI पदाची भरती केली जाणार; पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची माहिती

राज्यात 15 हजार PSI पदाची भरती केली जाणार; पोलिस महासंचालक सदानंद दाते यांची माहिती

Follow Us
Follow Us:

पुणे/ अक्षय फाटक : पुणे शहराचे स्वास्थ राखण्यासाठी पुणे शहर पोलिस दल रात्रंदिवस पहारा देत असताना, काही अधिकारी अन् अंमलदारांमुळे पोलिस खाते डागाळले जात आहेच, पण पोलिस दलाची लक्तरे देखील वेशीला टांगली जात आहेत. अशा या अधिकारी अन् पोलिस अंमलदारांवर निलंबन आणि बडतर्फीची कारवाई होते, पण मलिन झालेली प्रतिमा पुन्हा उंचावण्यासाठी वर्षेनवर्षे पोलिस दलाला खस्ता खाव्या लागतात. पुणे शहर पोलिस दल देखील अशाच काही महाभागांमुळे गेल्या काही वर्षात डागाळले गेले असून, गेल्या सात वर्षात तब्बल ३३३ जणांवर निलंबनाची कारवाई, तर ६१ जणांवर बडतर्फीची कारवाई झाल्याचे समोर आले आहे.

शहरातील गुन्हेगारीचा आलेख वर्षागणीक वाढतच आहे. मारामारीपासून खूनापर्यंत अन् लुटमारीपासून खंडणीपर्यंत, तसेच जुगार ते अंमली पदार्थांचे काळे धंदे सातत्याने समोर येत आहेत. हे रोखण्यासाठी एकीकडे पोलिस दल मेहनत करत असताना मात्र, अशा गोष्टींना पाठबळ किंवा त्यांना प्रोत्साहित करण्याचे काम काहींकडून होत असल्याचे समोर येत आहे. अडवणूक करून किंवा धमकावून पैसा उकळला जात असल्याचीही प्रकरणे समोर आली आहेत.

एकाच महिन्यात गंभीर प्रकरणे उघडकीस

गेल्या एकाच महिन्यातील प्रकरणांवर नजर टाकली तर, शिवाजीनगर पोलिस ठाण्यातील महिला अंमलदार, एक अधिकारी व अंमलदाराने ब्लॅकमेलिंग करून एका प्राचार्याकडूनच ७ लाखांची खंडणी उकळली, तर अर्ज प्रकरणात तब्बल २८ लाख रुपयांची लाच घेताना महिला अधिकारी व दोघांना एसीबीने अटक केली. नंतर एका अंमलदारानेही वॉरंट न बजावण्यासाठी व अटक न करण्यासाठी एका कंपनीच्या मालकांकडून ५ लाख घेतले. पुन्हा आणखी दीड लाख मागणी केली. या प्रकरणांनी पुणे पोलिस दलाच्या प्रतिमेची लक्तरं निघाली.

वरिष्ठांच्या प्रयत्नांना लाचखोरांकडून फाटा

पोलिस दलात शिस्त, पारदर्शकता आणि विश्वासार्हता टिकवण्यासाठी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कठोर भूमिका घेतली जात असली, तरी काही कर्मचाऱ्यांचे वर्तन संपूर्ण दलासाठी लाजिरवाणे ठरत आहे. जनतेमध्ये पोलिसांविषयी विश्वास निर्माण करण्यासाठी केवळ गुन्हे उघडकीस आणणे पुरेसे नसून दलातील ‘काळ्या मेंढ्यां’वर वेळेत कारवाई होणेही तितकेच आवश्यक असल्याचे मत व्यक्त होत आहे.

हे सुद्धा वाचा : दुसऱ्या लग्नाला विरोध; संतापलेल्या माजी सैनिक वडिलांनी मुलावर झाडली गोळी, नंतर स्वतःलाही संपवलं

आकडेवारी डोळ्यात अंजन घालणारी

शहर पोलिस दलातील आकडेवारीनुसार २०२० ते एप्रिल २०२६ या कालावधीत ६० अधिकारी व २७३ अंमलदारांवर निलंबनाची कारवाई झाली. विशेष म्हणजे, २०२३ आणि २०२४ या दोन वर्षांत सर्वाधिक कारवाया झाल्या. २०२३ मध्ये ६६, तर २०२४ मध्ये ६५ पोलिस कर्मचाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यात आली. इतकेच नव्हे, तर शासकीय सेवेतून बडतर्फ किंवा सक्तीने सेवाबाहेर केलेल्यांची संख्याही चिंताजनक आहे. गेल्या ७ वर्षात ६१ जणांना बडतर्फ केले आहे.

पुणे पोलिस दलातील वर्षनिहाय निलंबन आकडेवारी

वर्ष अधिकारी अंमलदार
२०२०   २ २७
२०२१ ५ ३२
२०२२ ७ ४६
२०२३ १८ ४८
२०२४ १७ ४८
२०२५ ८ ५२
२०२६ (एप्रिलपर्यंत) ३ २०
एकूण अधिकारी (६०) ३३३

बडतर्फीची कारवाई

वर्ष संख्या
२०२० ३०
२०२१ २
२०२२ ५
२०२३ ३
२०२४ १४
२०२५  ४
२०२६ (एप्रिलपर्यंत) ३

कोणत्या कारणांमुळे कारवाई?

  • गुन्ह्यातील आरोपींना मदत
  • लाचखोरी
  • अटक करण्याची भीती दाखवून खंडणी
  • अवैध धंदेवाल्यांशी संबंध
  • ड्युटीवर मद्यपान
  • विनापरवानगी गैरहजर
  • कौटुंबिक वाद-विवाद
  • शिस्तभंग व गैरवर्तन
  • पत्नी व कौटुंबिक वाद
  • वाहतूक पोलिसांची शिस्तभंग व घोळक्यांच्या कारवाया

Web Title: Many police personnel in pune have been suspended in the last seven years

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: May 12, 2026 | 12:03 PM

Topics:  

  • CM Devedra Fadnavis
  • pune news
  • Pune Police Action

संबंधित बातम्या

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू
1

महाबळेश्वरच्या सहलीला निघालेल्या मित्रांवर काळाचा घाला; शिरवळजवळ भीषण अपघातात चौघांचा मृत्यू

Maharashtra Breaking News Live Updates Today:  नाशिक कुंभमेळ्याच्या नावे ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा
2

Maharashtra Breaking News Live Updates Today:  नाशिक कुंभमेळ्याच्या नावे ५०० कोटींचा बनावट टेंडर घोटाळा

पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?
3

पुण्यात जुन्या वादातून रिक्षा चालकावर हल्ला, लाकूड अन् बेल्टने बेदम मारहाण; नेमकं काय घडलं?

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद
4

Pune Traffic : तिरंगा रॅलीनिमित्त पुण्यातील वाहतुकीत बदल; दुपारपासून ‘हे’ मार्ग राहणार बंद

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.