
Marriage Scam Alert
Marriage Scam Alert: विवाहेच्छुक कुटुंबांच्या भावनांचा गैरफायदा घेत राज्यभर विवाह एजंटांकडून आर्थिक लूट वाढत चालल्याचे उघड होत आहे. विशेषतः वरपक्ष आणि त्यांचे कुटुंब भावनिक तणावात अडकलेल्या परिस्थितीचा फायदा घेत मोठ्या रकमांची उकळपट्टी केली जात असल्याची तक्रारी वाढल्या आहेत. Marriage Scam Alert:
वधू-वर जुळविण्याच्या प्रक्रियेत आजकाल मोठ्या प्रमाणात खोट्या आश्वासनांची, बनावट प्रोफाइल्सची आणि दिशाभूल करणाऱ्या आकडेवारीची मोहीम सुरू असल्याचे सांगितले जाते. अनेक ठिकाणी फोटो एका व्यक्तीचा तर माहिती दुसऱ्याची, अशा प्रकारचे प्रोफाइल दाखवून ग्राहकांना भूल घालण्याची पद्धत वाढली आहे. ग्राहक जितका भावनिक दबावात आणि तातडीच्या गरजेत, तितका अधिक पैसा विविध मार्गांनी वसूल केला जातो.
काही एजंट वधू-वरांची प्रत्यक्ष भेट घडवून आणण्याचे आश्वासन देऊन भेटीचे ठिकाण, हॉटेल खर्च, भोजन बिल यांची जबाबदारीही ग्राहकावरच टाकतात. तर काही ठिकाणी बनावट स्थळे, बनावट वधू आणि बनावट कुटुंबे निर्माण करून हजारो रुपये घेतले जातात, काही महिलांना किरकोळ मोबदल्यात वधू म्हणून उभे करण्याची फसवणूकही केली जात असल्याचे आरोप आहेत. Fake Marriage Agents Racket
याहून गंभीर बाब म्हणजे, काही प्रकरणांत लग्न झालेल्या महिलांना उपवर म्हणून दाखवून मोठी रक्कम घेऊन विवाह लावला जातो. त्यानंतर ‘सोळाव्या पूजे’पर्यंत ती महिला सासरी राहते आणि त्याच दिवशी घरातील दागिने, रोख रक्कम घेऊन एजंटांच्या टोळीसोबत पसार होते. अशा प्रकारात फसलेल्या कुटुंबांना आर्थिक तोटा आणि सामाजिक प्रतिष्ठेचा धोका सहन करावा लागतो. अनेक वेळा फसवणूक उघडकीस आल्यावरही बदनामीच्या भीतीने तक्रार दाखल केली जात नाही. परिणामी अशा प्रकरणात फसलेली कुटुंबे आर्थिक नुकसानासोबत मानसिक तणावात जगण्यास भाग पडतात.
Mahendra Dalvi Replied Ambadas Danve: तो मीच आहे का? अंबादास दानवेंच्या आरोपाला महेंद्र दळवींचा
तज्ज्ञांच्या मते, लग्न जुळविण्याच्या प्रक्रियेतील ताण, लग्नाचे वय वाढणे आणि समाजातील दबाव यामुळे कुटुंबे अशा एजंटांच्या जाळ्यात अडकतात. “विश्वास न ठेवला तर लग्न जुळणार नाही, आणि ठेवल्यास फसवणूक होण्याची भीती,” अशी द्विधा मनःस्थिती अनेक कुटुंबांमध्ये दिसून येत आहे. Marriage Fraud Network
पुणे, लग्न एकदाच होते मग ते मोठ्या धूमधडाक्यात करण्याची आपली परंपरा कायम आहे. परंतु आता वाढत्या महागाईमध्ये जीएसटीचा बोजा सर्वसामान्य कुटुंबांना चांगलाच छळत आहे. यामुळे वधू-वर पित्यांच्या खिशाला कात्री लागत असून आहेर मात्र सरकारच्या तिजोरीत जमा होत आहे. कपड्यांच्या खरेदीवर जीएसटी असूनही केटरिंग, इव्हेंट मॅनेजमेंट, डेकोरेशन, फुलांची सजावट, मंडप व्यवस्था यांसारख्या सेवांवर प्रत्यक्षात अनेक ठिकाणी जीएसटी आकारला जात नाही. मात्र कागदोपत्री पाहता या सर्व सेवावस्तू जीएसटीच्या कक्षेत आहेत. विवाहसोहळ्यातील जवळजवळ प्रत्येक गोष्ट ‘सेवा’ किंवा ‘वस्तु’ म्हणून गणली गेली आहे.
बैंक्वेट हॉल / लॉन्स ५ ते १८ टक्के
डेकोरेशन व फुलांची सजावट: १८ टक्के
लाईटिंग, साउंड सिस्टम: १८ टक्के
फोटोग्राफी / व्हिडिओग्राफी: १८ टक्के
कैटरिंग ५ ते १८ टक्के
मेहंदी, कलाकारांचे कार्यक्रम, बैण्ड, घोडी १८ टक्के
ट्रॅव्हल व वाहन भाडे ५ ते १२ टक्के