Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • सोम, 21 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

Ambernath Crime: दीड महिन्यांपूर्वीच झाले लग्न; घरात CCTV, शेजाऱ्यांशी बोलल्याने मारहाण, 26 वर्षीय महिलेचं टोकाचं पाऊल

अंबरनाथमध्ये सासरच्या छळाला कंटाळून 26 वर्षीय विशाखा तिळकर हिने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. घरात CCTV लावून तिच्यावर पाळत ठेवली जात होती. माहेराहून पैसे व दागिने आणण्यासाठी दबाव टाकला जात होता. या प्रकरणी डॉक्टर पतीला अटक करण्यात आली आहे.

  • By वैष्णवी कामडी
Updated On: Jun 18, 2026 | 10:16 AM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:
  • लग्नानंतर विशाखावर मानसिक आणि शारीरिक छळ केल्याचा आरोप.
  • घरात CCTV लावून तिच्या हालचालींवर पतीकडून पाळत ठेवली जात होती.
  • आत्महत्येप्रकरणी डॉक्टर पती अटकेत, सासू आणि दीराचा शोध सुरू.
अंबरनाथ: अंबरनाथ  येथून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. दीड महिन्या पूर्वीच झाले होते लग्न. पत्नीवर पाळत ठेवण्यासाठी डॉक्टर पतीने सीसीटीव्ही कॅमेरे लावले. शेजाऱ्यांशी बोलली म्हणून बेदम मारहाण करण्यात आली. अखेर सासरच्या छळाला कंटाळून २६ वर्षीय महिलेने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणात डॉक्टर पतीला अटक करण्यात आली आहे. तर सासू आणि दीर यांचा पोलिसांकडून शोध घेतला जात आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

काय घडलं महिलेसोबत?

या घटनेतील मृत महिलेचे नाव विशाखा तिळकर (वय २६) असे आहे. अवघ्या दीड महिन्यापूर्वी म्हणजे ३० एप्रिल रोजी विशाखाचा डॉक्टर नितीन तिळकर याच्याशी झाला होता. लग्नाआधी दोघांमध्ये चांगले संबंध होते. तोपर्यंत सर्व काही सुरळीत होतं. मात्र लग्नानंतर विशाखाला मानसिक आणि शारीरिक त्रास देण्यास सुरुवात झाली. ती दिवसभर काय करते कोणाशी बोलते यावर लक्ष ठेवण्यासाठी डॉक्टर पतीकडून घरात सीसीटीव्ही कॅमेरे लावण्यात आले. माहेराहून सोनं आणि पैसे आणण्याची वारंवार मागणी केली जात होती. लग्नावेळी हवं तेवढे मानपान मिळालं नाही म्हणून सासरच्या मंडळींकडून विशाखाला त्रास दिला जात होता.

खळबळजनक ! पुण्यात आयटी मॅनेजरवर भोंदूबाबाचा लैंगिक अत्याचार; 25 वर्षांपासून प्रकार होता सुरु, व्हिडिओ-फोटो काढले अन्…

सीसीटीव्ही कॅमेरेमध्ये ती कोणाशी बोलतांना दिसली तर घरी आल्यांनतर तिला मारहाण करण्यात येत होती. दोन दिवसांपूर्वी एका शेजारी महिलेसोबत बोलल्याच्या कारणावरून विशाखाला मारहाण करण्यात आली होती. यांनतर तिने घरात गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्या करण्यापूर्वी विशाखाने घडलेला सगळा प्रकार आपल्या आईला सांगितला होता. आई- वडील तिला माहेरी आणण्याच्या तयारीत होते मात्र तो पर्यंत विशाखाने घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबीयांना मिळाली.

कुटुंबीयांनी तातडीने शिवाजीनगर पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार नोंदवली. पोलिसांनी विशाखाला मानसिक आणि शारीरिक त्रास देऊन आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती डॉक्टर नितीन तिळकर, सासू छाया तिळकर, दीर निनाद तिळकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तर डॉक्टर पती नितीन तिळकर याला अटक करण्यात आली असून इतर आरोपींचा शोध सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. या घटनेने पुन्हा एकदा विवाहित महिलांच्या सुरक्षेचा आणि हुंडाबळीच्या प्रश्न उपस्थित झाला आहे. या घटनेने हळहळ व्यक्त केली जात आहे.

Uttarakhand News: 12 वीची टॉपर, पण नैराश्याशी हरली; सुसाईड नोटमध्ये लिहिलं ‘आय लव्ह यू मम्मी-पप्पा’

💡

Frequently Asked Questions

  • Que: विशाखा तिळकर हिने आत्महत्या का केल्याचा आरोप आहे?

    Ans: सासरकडून होणारा मानसिक व शारीरिक छळ, तसेच माहेराहून पैसे आणि दागिने आणण्याचा दबाव यामुळे तिने आत्महत्या केल्याचा आरोप आहे.

  • Que: विशाखाच्या हालचालींवर कशी नजर ठेवली जात होती?

    Ans: पतीने घरात आणि घराबाहेर CCTV कॅमेरे लावून तिच्या हालचालींवर नजर ठेवली होती.

  • Que: या प्रकरणात पोलिसांनी कोणती कारवाई केली?

    Ans: डॉक्टर पती नितीन तिळकर याला अटक करण्यात आली असून सासू आणि दीराचा पोलीस शोध घेत आहेत.

Web Title: Married just a month and a half ago home equipped with cctv beaten for speaking to neighbors26 year old woman takes extreme step

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 18, 2026 | 10:16 AM

Topics:  

  • crime

संबंधित बातम्या

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत
1

Kalyan Crime: दुकानातून काढल्याचा बदला! मालकाचे ४० लाख लुटले; कल्याण क्राईम ब्रँचने ३६ लाख केले हस्तगत

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले
2

Nashik Crime: धक्कादायक! मध्यरात्री अंथरुणातून ८ महिन्यांची चिमुरडी बेपत्ता; अपहरणाच्या भीतीने कुटुंब हादरले

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला
3

Delhi Crime: दिल्ली हादरली! अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करून हत्या; शेतात फेकलेला मृतदेह कुत्र्यांनी खाल्ला

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी
4

Kalyan Crime News: भारतीय नागरिक नसतानाही कल्याणमध्ये वास्तव्य कसे? कागदपत्रांच्या सखोल चौकशीची महिलेची मागणी

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.