डॉक्टरचा तरुणीवर बलात्कार (Photo : Molestation)
शिरपूर जैन : शिरपूर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या करंजी येथे एका 24 वर्षीय विवाहित महिलेचा विनयभंग करण्यात आला. ही घटना बुधवारी (दि. 5) उघडकीस आली. शिरपूर पोलिसांनी याप्रकरणी ज्ञानेश्वर यशवंता लहाने याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
हेदेखील वाचा : बापरे! दुचाकीवरून दोघेजण आले अन् पुढे जे घडलं…; पुण्यातील धक्कादायक प्रकाराचा पोलिसांनी लावला छडा
करंजी येथील रहिवासी विवाहित महिला शौचाला जात असताना करंजी गावातच राहणारा आरोपी ज्ञानेश्वर लहाने याने पीडित महिलेचा पाठलाग गेला. त्यानंतर त्याने त्या महिलेचा विनयभंग केला. हा प्रकार महिलेने पतीला सांगितला. तोपर्यंत आरोपी घटनास्थळावरून पसार झाला होता. पीडितेने 5 फेब्रुवारी रोजी शिरपूर पोलीस स्टेशनला फिर्याद दिली.
दरम्यान, या फिर्यादीवरून शिरपूर पोलिसांनी याप्रकरणी ज्ञानेश्वर यशवंता लहाने (रा.करंजी) याच्याविरुद्ध विविध कलमानुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास ठाणेदार रामेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनात पोलिस उपनिरीक्षक इमरान पठाण करत आहेत.
अल्पवयीन मुलीवर अत्याचार
संग्रामपूर तालुक्यातील शेत शिवारात एका साडेचार वर्षीय अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आल्याची घटना गुरुवारी (दि. 6) उघडकीस आली आहे. या प्रकरणी आरोपीला अटक करण्यात आली असून, पॉक्सोनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुनील कालुसिंग निगवाले (21 रा. डोईफोडिया, मध्य प्रदेश) असे आरोपीचे नाव आहे. तालुक्यातील एका आदिवासी गावातील रहिवासी असलेल्या अंदाजे साडेचार वर्षीय मुलीला 21 वर्षीय नराधामाने शेत शिवारात घेऊन गेला आणि अत्याचार केला.
या घटनेची माहिती पीडित मुलीने आपल्या आई-वडिलांना सांगितल्यानंतर वडिलांनी फिर्याद नोंदविली. तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी सुनील निगवाले याच्याविरुध्द पॉक्सोअंतर्गत गुन्हा दाखल केला. आरोपीला पोलिसांनी अटक केले आहे. सोनाळा पोलिस स्टेशनचे ठाणेदार चंद्रकांत पाटील यांच्या मार्गदर्शनात पुढील तपास पो. उपनिरीक्षक महादेव खोने, सह पोलिस कॉन्स्टेबल परमेश्वर तितरे, राहुल पवार करत आहे.