चिपळूणच्या पोफळी येथील छ. शिवाजीराजे शासकीय निमशासकीय कर्मचारी सहकारी पतसंस्थेत आयुष्यभराची जमा पुंजी ठेवली. पण गेले आठ महिने ठेवी परत घेण्यासाठी पतसंस्थेत हेलपाटे घालत आहे. पण पतसंस्थेकडून स्वतःची ठेव देण्यास दिरंगाई केली जात असल्याचा आरोप निवृत्त कार्यकारी अभियंते प्रमोद माने यांनी केला आहे. विशेष म्हणजे प्रमोद माने स्वतः दिव्यांग आहेत. ही पतसंस्था सध्या आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांमुळे चर्चेत आली आहे. या पतसंस्थेकडे ६२ सभासदांच्या सुमारे २ कोटी २५ लाख रुपयांच्या ठेवी असल्याची प्राथमिक माहिती असून ही रक्कम परत न मिळाल्याने सभासदांमध्ये अस्वस्थता पसरली आहे.