Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 9 जुलै 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ENG vs IND |
  • Maharastra |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

छत्रपती संभाजीनगरच्या सिन्नरमध्ये भंगार दुकानाला भीषण आग; तब्बल सहा तासांच्या प्रयत्नानंतर…

सिन्नर नगरपरिषद हद्दीत लक्ष्मण दशरथ लोंढे यांचे भंगार दुकान आहे. प्लास्टिक डबे, बाटल्या, कागद व इतर ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवलेले असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले.

  • By कृपादान आवळे
Updated On: Feb 18, 2026 | 08:05 AM
सिन्नरला भंगार दुकानाला भीषण आग (संग्रहित फोटो)

सिन्नरला भंगार दुकानाला भीषण आग (संग्रहित फोटो)

Follow Us
Follow Us:

सिन्नर : सिन्नर नगरपरिषदेच्या कानडी मळ्याच्या पुढे असलेल्या डंपिंग ग्राउंडजवळील भंगार दुकानाला दोन दिवसांपूर्वी सकाळी भीषण आग लागली. या अचानक लागलेल्या आगीने परिसरात एकच खळबळ उडाली. सकाळी सुमारे ९.३० वाजता लागलेली आग तब्बल सहा तासांच्या प्रयत्नांनंतर दुपारी ३.३० वाजता नियंत्रणात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले.

या आगीत अंदाजे पाच ते सहा लाख रुपयांचे नुकसान झाले असून, सुदैवाने जीवितहानी टळली. सिन्नर नगरपरिषद हद्दीत लक्ष्मण दशरथ लोंढे यांचे भंगार दुकान आहे. प्लास्टिक डबे, बाटल्या, कागद व इतर ज्वलनशील साहित्य मोठ्या प्रमाणावर साठवलेले असल्याने आगीने काही क्षणांतच रौद्ररूप धारण केले. घटनेची माहिती मिळताच नगरपरिषदेचा अग्निशमन बंब घटनास्थळी दाखल झाला. लाला वाल्मिकी, नवनाथ जोंधळे, आकाश देवकर, सागर डावरे व वैभव केदार या जवानांनी जीवाची पर्वा न करता आग विझविण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

हेदेखील वाचा : Navi Mumbai Crime : रबाळे एमआयडीसीत राखीव वन जमिनीवर बेकायदेशीर उत्खनन; दोन जेसीबी जप्त, नगरसेवकावर गुन्हा

आगीची तीव्रता लक्षात घेऊन अतिरिक्त मदतीसाठी एमआयडीसी अग्निशमन दलाचा बंबही बोलावण्यात आला. दोन्ही दलांच्या वाहनांनी पाण्याच्या सुमारे सहा फेऱ्या केल्यानंतर अखेर दुपारी आग नियंत्रणात आली. प्राथमिक अंदाजानुसार, आगीत मोठ्या प्रमाणावर भंगार साहित्य जळून खाक झाले असून, नुकसानाचा आकडा लाखोंमध्ये असल्याचे सांगितले जात आहे. आगीचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसून पुढील तपास सुरू आहे.

भट्टीतून लागलेल्या आगीत साहित्य जळून खाक

दुसऱ्या एका घटनेत, कराड शहरातील आझाद चौक परिसरात रात्रीच्या सुमारास सोन्या-चांदीच्या आटणी गाळणी दुकानाला अचानक आग लागल्याने खळबळ उडाली. भट्टीतून लागलेल्या या आगीत दुकानातील साहित्य जळून खाक झाले असून, सुमारे तीन लाख रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सुदैवाने नागरिकांचे प्रसंगावधान आणि अग्निशमन दलाच्या तात्काळ कारवाईमुळे मोठी दुर्घटना टळली.

हेदेखील वाचा : Darashiv News: महिला पतसंस्थेचा मोठा आर्थिक घोटाळा उघड; ५.८५ लाखांच्या ठेव रकमेप्रकरणी १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Web Title: Massive fire breaks out at scrap shop in sinnar

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Feb 18, 2026 | 08:05 AM

Topics:  

  • crime news
  • Fire Case

संबंधित बातम्या

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल
1

दूध भेसळ प्रकरणाचे अहिल्यानगर कनेक्शन उघड; राहुरीचे तीन, तर वाळकीच्या एकावर गुन्हा दाखल

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश
2

रक्षकच बनले भक्षक, लोणावळा हायवेवर पोलिसांकडून पर्यटकांचे अपहरण; स्मार्ट वॉचमुळे झाला पर्दाफाश

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…
3

राज्यात चाललंय काय? प्रतापनगरात चौघांचा सशस्त्र दरोडा; दाम्पत्याला चाकूचा धाक दाखवला अन्…

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत
4

प्रेमाचे भयावह रूप! प्रेयसीची हत्या करून मृतदेहाचे केले तीन तुकडे, आरोपी एन्काऊंटरनंतर अटकेत

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.