
सहा वर्षांपासून फरार आरोपीला अखेर ठोकल्या बेड्या; गुन्हे शाखेच्या युनिट तीनची मोठी कारवाई
पोलिस उपायुक्त गौहर हसन यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक नानासाहेब कदम, उपनिरीक्षक संतोष भांडवलकर यांनी ही कारवाई केली आहे.
सिंहगड पोलिस ठाण्यात एकाचा खुनाचा प्रयत्न केल्या प्रकरणी विश्वकर्मासह साथीदारांविरुद्ध २०२० मध्ये गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर सहा वर्ष विश्वकर्मा हा पोलिसांना गुंगारा देत होता. गुन्हे शाखेच्या युनिट तीनमधील पोलीस कर्मचारी पांडुरंग शिंदे आणि तुषार किंद्रे हे सिंहगड रस्ता परिसरात गस्त घालत होते. विश्वकर्मा हा वडगाव बुद्रुक भागात येणार असल्याची माहिती शिंदे आणि किंद्रे यांना मिळाली. पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले.
गंभीर गुन्ह्यातील फरारी अटकेत
मार्केटयार्ड परिसरातील गंभीर गुन्ह्यात गेले एक वर्ष पसार असलेल्या आरोपीला गुन्हे शाखेच्या युनिट दोनने अटक केली आहे. कात्रज भागात ही कारवाई करण्यात आली. आकाश किशोर नवगीर (वय २७, रा. टिळेकरनगर, कात्रज-कोंढवा रस्ता) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. मार्केट यार्ड परिसरात वर्षभरापूर्वी घडलेल्या गंभीर गुन्ह्यात आकाश पसार झाला होता. तो कात्रज भागात येणार असल्याची माहिती पोलिस हवालदार कुंदन शिंदे, आकाश यादव यांना मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून त्याला पकडले. पोलिस निरीक्षक राहुलकुमार खिलारे, अविनाश माने, विजय पवार यांनी ही कारवाई केली.