crime (फोटो सौजन्य : social media)
नवी मुंबईतील APMC मार्केट शेजारी असलेल्या ट्रक टर्मिनलमध्ये भीषण आग लागल्याची घटना समोर आली. या भीषण आगीत 8 ते 10 ट्रक, टेम्पो जाळायची शक्यता वर्तवली जात आहे. तर कॅरेट आणि ट्रेच्या गोडाऊनमुळे ही आग पसरली असल्याचे समोर आले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस आणि अग्निशमन पथकाचे जवान घटनास्तहली दाखल झाले. अवघ्या तीन तासानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आले आहे. मात्र ही आग कश्यामुळे लागली याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नाही आहे. सध्या पोलीस या घटनेचा तपास करत आहे. यात दुर्घटनेत सुदैवाने अद्यापतरी कुठलीही जीवितहानी झाली नसल्याचे समोर आले आहे.
अश्लील व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
उरुळी कांचन : उरुळी कांचन पोलीस स्टेशन हद्दीतील पेठ (ता.हवेली) येथे धक्कादायक प्रकार घडला आहे एका २८ वर्षीय महिलेला तिचे अश्लील व्हिडिओ व फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन वारंवार लैंगिक अत्याचार केल्याचे उघड झाले आहे. याप्रकरणी दोघांविरोधात उरुळी कांचन पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पेठ गावचा माजी सरपंच सुरज भालचंद्र चौधरी आणि त्याचा सावकार मित्र राजेश लक्ष्मण चौधरी या दोघांना अटक केली आहे. याबाबत पीडित महिलेने उरुळी कांचन पोलिसात तक्रार दिली आहे. हे दोघे तिच्या पतीचे मित्र असल्याचे समोर येत आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिला २० फेब्रुवारी २०२३ रोजी एका दुकानात साडी खरेदी करत असताना राजेश चौधरीने तिला फोन करून साडीसाठी पैसे ऑनलाईन पाठवतो, असे सांगितले. पिडीतीने नकार दिला, तेव्हा राजेशने दुकानाच्या बाहेर बोलावून, तुझे अश्लील फोटो माझ्याकडे आहेत. तू जर माझ्याकडून पैसे घेतले नाहीत, तर मी ते फोटो व्हायरल करीन अशी धमकी दिली व ५००० रुपये ऑनलाइन पद्धतीने पीडितेला पाठवले..
Baba SiddiqueMurder Case : मोठी अपडेट; बाबा सिद्दिकी यांच्या हत्येनंतर मोबाइल क्रमांक वापरून…..