Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • विदेश
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Maharashtra Local Body Election |
  • Delhi Blast |
  • Political news |
  • Ind vs SA Test |
  • Today's Gold Rate
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Santosh Deshmukh Case: खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका, 100 बँक खाती…; सुरेश धसांचा पुन्हा गौप्यस्फोट

सुरेश धस यांनी वाल्मिक कराडची 100 बँक खाती असल्याचाही दावा केला. तसेच त्याची चौकशी का केली जात नाही. असा सवालही उपस्थित केला. इतर कोणाची 50 बँक खाती असतील तर ईडी लगेच मागे लागले.

  • By अनुराधा धावड़े
Updated On: Jan 06, 2025 | 02:47 PM
Santosh Deshmukh Case: खंडणीसाठी धनंजय मुंडेंच्या बंगल्यावर बैठका, 100 बँक खाती…; सुरेश धसांचा पुन्हा गौप्यस्फोट
Follow Us
Close
Follow Us:

मुंबई:  बीडचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस पहिल्या दिवसापासून मंत्री धनंजय मुंडेंवर गंभीर आरोप करत आहेत. या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड, सुदर्शन घुले, सुधीर सांगळेला अटक कऱण्यात आली. यानंतर या प्रकरणाचा सीआयडी तपास अद्यापही सुरूच आहे. पण अटकेनंतही वाल्मिक कराडचे नवनवे प्रताप कारनामे समोर येतच आहेत. बीड आणि परभणीनंतर काल पुण्यात जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात आमदार सुरेश धस यांनी पुन्हा एकदा वाल्मिक कराडची पोलखोल केली आहे.

गेल्या वर्षी 14 जूनला अवादा कंपनीचे अधिकारी आणि वाल्मिक कराड, नितीन बिक्कड यांची बैठक झाली होती. ही बैठक थेट धनंजय मुंडे यांच्या परळीतील बंगल्यावर बैठक झाली. या बैठकीनंतर अवादा कंपनीच्या शुक्ला नावाचा अधिकारी धनंजय मुंडे यांची भेट घेण्यासाठी मुंडे यांचे स्वीय सहाय्यक प्रशांत जोशी यांच्याकडे प्रयत्न करत होते. पण धनंजय मुंडेची भेट घेण्यासाठी वाल्मिक कराडचा इगो दुखावला गेला. त्यामुळे त्याने प्रशांत जोशी यांना खडसावल्याचे सुरेश धस यांनी सांगितलं.

मोक्कातील 801 गुन्हेगारांचा जामीन, भाईगिरीचाही दावा; आरोपींवर पुणे पोलिसांची नजर

सुरेश धस म्हणाले, “त्यानंतर 19 जून रोजी पुन्हा धनंजय मुंडे यांच्या मुंबईतील बंगल्यावर अवादा कंपनी आणि आय एनर्जी कंपनीच्या अधिकाऱ्यांची बैठक झाली. या बैठकीत कराडने कंपनीच्या अधिकाऱ्यांकडे तीन कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली.पण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी वरिष्ठांशी चर्चा केली. त्यावर वरिष्ठांनी तीन कोटींऐवजी दोन कोटी रुपये देण्याचे मान्य केले. त्यावर निवडणुकीसाठी कंपनीकडे लगेच 50 लाखांची मागणी करण्यात आली. कंपनीने त्यांना 50 लाख रूपये दिले. हे पैसे तेव्हा धनंजय मुंडेकडे देण्यात आले होते. पण वाल्मिक कराडने मात्र आपल्याला हे माहिती नसल्याचे सांगितले.

100 बँक खाती

याचवेळी सुरेश धस यांनी वाल्मिक कराडची 100 बँक खाती असल्याचाही दावा केला. तसेच त्याची चौकशी का केली जात नाही. असा सवालही उपस्थित केला. इतर कोणाची 50 बँक खाती असतील तर ईडी लगेच मागे लागले. असा चिमटाही त्यांनी काढला. तसेच, वाल्मिक कराड आणि त्याचा सहकारी नितीन कुलकर्णी यांच्या दोघांकडे मिळून तब्बल 17 मोबाईल नंबर असल्याचा गौप्यस्फोटही केला. वाल्मिक कराड शरण आला पण त्यानंतर नितीन कुलकर्णीही फरार आहे. आता नितीन कुलकर्णींनाही लवकरात लवकर ताब्यात घ्यावे, असे आवाहन धस यांनी केलं आहे. कुलकर्णीला अटक केल्यानंतर 17 मोबाईल नंबर तपासल्यानंतर कुणी कुणाकडून किती पैसे घेतले हे समोर येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

Crime News: मंचर पोलिसांच्या प्रयत्नांना यश; अपहरण झालेल्या दोन अल्पवयीन मुली 12 तासांत सापडल्या

 

Web Title: Meetings at dhananjay mundes bungalow for extortion 100 bank accounts nras

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 06, 2025 | 02:47 PM

Topics:  

  • Beed Crime

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.