Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 24 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • asian games 2026 |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • IND vs AFG
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

संतापजनक घटना! बँकेतून पैसे काढले अन् बाजारात भामट्यांनी डाव साधला! ८५ हजारांची रोख रक्कम लंपास

म्हसवडच्या आठवडी बाजारात शेतकर्‍याचे कर्जाचे ८५ हजार रुपये कटरने पिशवी कापून लंपास! भरबाजारात शेतकरी ढसाढसा रडला; म्हसवड पोलिसांत तक्रार दाखल.

  • By नितिन कुऱ्हे
Updated On: Aug 12, 2026 | 09:06 PM
बँकेतून पैसे काढले अन् बाजारात भामट्यांनी डाव साधला! (Photo Credit - AI)

बँकेतून पैसे काढले अन् बाजारात भामट्यांनी डाव साधला! (Photo Credit - AI)

Follow Us
Follow Us:
  • म्हसवडच्या आठवडी बाजारात शेतकर्‍याचा खिसा कापला!
  • शेतीसाठी काढलेले ८५ हजार रुपये लंपास
  • भरबाजारात शेतकरी ढसाढसा रडला
म्हसवड : शेतीसाठी काढलेल्या कर्जाची रक्कम घेवुन जाणार्या शेतकर्याच्या पिशवीतुन अज्ञाताने ८५ हजार रुपयांची रोकड लाबंवल्याने भर बाजारात शेतकरी लागला रडु याबाबत शेतकरी अंकुश अन्याबा लुबाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार ते पालिका हद्दीतील मासाळवाडी येथील लुबाळवस्ती येथे राहतात, त्यांनी आपल्या शेतीकामासाठी येथील एका पतसंस्थेतुन कर्ज काढले होते त्या कर्जाच्या रकमेपोटी संबंधित संस्थेने त्यांना सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेचा धनादेश (चेक) दिला होता, तो धनादेश घेवुन अंकुश लुबाळ हे आज दि.१२ रोजी म्हसवडच्या जिल्हा बँकेत आले होते, त्याठिकाणी त्यांनी संबंधित पतसंस्थेने दिलेला धनादेश बँकेत जमा करुन बँकेकडुन रोख ८५ हजार रुपये घेतले, ते पैसे त्यांनी ताब्यात घेत स्वत:जवळ असलेल्या पिशवीत ठेवले व बाजारात आले मात्र बाजारात ते काही वस्तु ची खरेदी करीत असतानाच अज्ञात चोरट्याने डाव साधत त्यांच्या पिशवीतील रोकड लंपास केली.

लुबाळ यांनी खरेदी केलेली वस्तु पिशवीत ठेवण्यासाठी पिशवी उघडली असता पिशवीला कटर मारल्याने ती फाटल्याचे त्यांच्या लक्षात आले, त्यांनी त्वरित पिशवीतील इतर वस्तुंच्या खाली ठेवलेली रोकड तपासुन पाहिली असता नेमकी रोकडच पिशवीतुन गायब झाल्याचे त्यांच्या लक्षात आल्यावर त्यांना अक्षरशा रडु कोसळले, त्यांची पैसे गेल्याने होत असलेली घालमेल नेमकी बाजारात उभे असलेल्या सामाजिक कार्यकर्ते धनाजी शिंदे यांनी पाहिली त्यांना सदर इसम ओळखीचा वाटल्याने त्यांनी त्याला जवळ बोलावुन त्यांची आस्थेवाईक चौकशी केली असता लुबाळ यांनी फाटलेली पिशवी दाखवत घडला प्रकार कथित केला.

Satara News: अर्जांच्या पाठपुराव्याला पालकमंत्री कार्यालयाचा वेग; वर्षभरात १,२३६ प्रकरणे मार्गी

लुबाळ यांनी शेतीकामासाठी कर्ज काढले होते, मात्र कर्जाची रक्कम त्यांच्या कामी येण्यापुर्वीच चोरट्यांनी लांबवल्याने बुडत्याचा पाय अधिक खोलात अशी अवस्था त्यांची झाली आहे. लुबाळ यांच्यावर बेतलेला प्रसंग ऐकुन शिंदे यांनी त्यांना पोलीस स्टेशन ला जाण्याचा सल्ला देत पोलीस स्टेशनला फोन करुन त्यांची फिर्याद नोंद करुन घेण्याची विनंती अधिकार्यांना करीत बाजारात पोलीस तैनात करण्याच्या सुचना ही दिल्या शिंदे यांच्या फोनमुळे पोलीस स्टेशन चे कर्मचारी बाजारात आले खरे मात्र तोवर चोरट्यांनी डाव साधला होता.

म्हसवड शहराचा अठवडी बाजार हा माण तालुक्यात सर्वात मोठा बाजार असल्याने या बाजारात वरचेवर अशा चोरीच्या घटना घडत असल्याने पोलीसांनी यादिवशी येथे पोलीस गस्त सुरु ठेवावी अशी जोरदार मागणी म्हसवडकर जनतेतुन होत आहे.
दरम्यान लुबाळ यांनी पोलीस स्टेशन ला तक्रार दाखल केली असुन पोलीस तपास सुरु आहे.

चोरांचा लुबाळ यांचा बँकेपासुन पाठलाग

अंकुश लुबाळ हे सामान्य शेतकरी असल्याने त्यांचा पेहराव पाहुनच चोरट्यांनी त्यांना टार्गेट केले असण्याची शक्यता असुन त्यांच्यावर पाळत ठेवुन त्यांचा बँकेपासुनच चोरट्यांनी पाठलाग करुन संधी मिळताच डाव साधला असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Umbraj News: उंब्रज जिल्हा परिषद शाळेत निकृष्ट कामामुळे ग्रॅनाईट कोसळले; ३ विद्यार्थी जखमी; शिक्षण सभापती तेजस्विनी कदम आक्रमक!

Web Title: Mhaswad farmer 85 thousand rupees stolen in weekly market satara marathi news

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Aug 12, 2026 | 09:05 PM

Topics:  

  • crime news
  • Farmer Issue
  • Mhaswad
  • Satara News

संबंधित बातम्या

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ
1

मोबाइलच्या वादातून तरुणाची दगडाने ठेचून हत्या, दारूच्या नशेत हल्ला; यवतमाळमधील घटनेनं खळबळ

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?
2

गणेश विसर्जन मिरवणुकीत पोलिसांना अरेरावी, भाजप तालुकाध्यक्षासह 14 जणांवर गुन्हा; नेमकं काय घडलं?

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…
3

Crime News: मुलीला इजा करण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार; अश्लील व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी अन्…

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त
4

पिंपरीत ‘मेड इन पाकिस्तान’ गोरी ब्यूटी क्रीमची विक्री, दहशतवाद विरोधी शाखेची कारवाई; तब्बल 23 क्रीम जप्त

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.