crime( फोटो सौजन्य-social media)
अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात जोरदार राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. माजी नगरसेविकेच्या मुलीचा किरकोळ वाद तरुणांशी झाला. त्यामुळे माजी नगरसेविकेच्या सामर्थकांनी या तरुणावर तलवारीने हल्ला केला. तरुणावर वार करणाऱ्या नगरसेविकेच्या समर्थकांना देखील जमावाने चोप दिला. त्यानंतर माजी नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली. या घटनेत जखमी झालेल्या तरुणाला रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुना दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरु होती.
नेमकं काय घडलं?
मिळालेल्या माहितीनुसार, अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात ही घटना घडली आहे. या घटनेनंतर परिसरात परिस्थिती तणावपूर्ण झाली होती. अंबरनाथच्या बारकूपाडा परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेविकेची मुलगी काल(शुक्रवारी,ता13) सायंकाळी घरी येत असताना एक तरुण रस्त्यावर आडवा चालत जात होता. त्यामुळे नगरसेविकेच्या मुलीने या तरुणाला बाजूला होण्यासाठी तीन वेळा गाडीचा हॉर्न वाजवला. परंतु तो तरुण बाजूला न झाल्यामुळे तिने त्या तरुणाला हटकावले. यावेळी त्यांच्यामध्ये शाब्दिक वाद होऊन या तरुणाने शिवीगाळ केली असा आरोप मुलीने केला. ही बाब समजताच नगरसेविकेच्या समर्थ असलेल्या दोन तरुणांनी त्या मुलावर धारधार शाश्त्राने वार केले. मात्र हे तरुण वार करून तिथून पळून जात असतानाच परिसरातील लोकांनी त्यांचा घेराव करत चोप दिला. तसेच यांचा पाठलाग करत थेट नगरसेविकेच्या घरावर दगडफेक केली. या सगळ्या प्रकरणानंतर जखमी तरुणाला उल्लासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुगणालयात दाखल करण्यात आले असून त्याच्यावर उपचार आहे. तर शिवाजीनगर पोलिसांनी बारकू पाडा परिसरात धाव घेत मोठा पोलीस बंदोबस्त तैनात केला असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशीरापर्यंत सुरू होती.
तांब्याच्या तारा चोरणाऱ्या तिघांना ठोकल्या बेड्या
ऊर परिसरात पार्क केलेल्या एका टेम्पोतून तब्बल ४९५ किलो तांब्याच्या तारा चोरणार्या तिघांना लोणी काळभोर पोलिसांनी सापळा रचून बेड्या ठोकल्या आहेत. या तारांची बाजारात ३ लाख एवढी किंमत आहे. व्यापाऱ्याने पोलिसांचे आभार मानले असून, या भागातील वाढत्या चोऱ्यांसाठी बंदोबस्त वाढविण्याबाबत नागरिकांनी पोलिसांना विनंती केली आहे.सुरज शाम जाधव (वय १९), यश अजित सावंत (वय २१), महेश बसवराज पुजारी (वय २२, रा. सर्व. चव्हाणवस्ती, थेऊर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याबाबत समाधान हिराजी डोंगरे (रा. थेऊर, ता. हवेली) यांनी लोणी काळभोर पोलिसांत तक्रार दिली आहे. ६ जून रोजी रात्री ११ वाजता थेऊर भागात ही घटना घडली होती.