एचआयव्ही बाधित मुलीवर केला अत्याचार
शिक्रापूर : कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथील ढेरंगे वस्ती येथून 14 वर्षीय अल्पवयीन मुलीचे अपहरण करण्यात आले. नंतर तिच्यावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या पीडित मुलीला लग्नाचे आमिष दाखवत अत्याचार करण्यात आल्याचे उघड झाले आहे. यातील आरोपीला पोलिसांनी परभणीतून ताब्यात घेत अटक केली.
हेदेखील वाचा : Atul Subhash: 2038 पूर्वी उघडू नको…, अतुल सुभाषने 4 वर्षाच्या मुलासाठी दिलं गिफ्ट, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासे
दुर्गादास रेशीम मकर असे पोलिसांनी अटक केलेल्या तरुणाचे नाव आहे. कोरेगाव भीमा (ता.शिरुर) येथून 20 जुलै 2024 रोजी एका 14 वर्षीय मुलीचे अपहरण झाल्याची घटना घडली होती. यामध्ये पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला. असे असताना सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप साळुंखे व पोलीस हवालदार प्रताप कांबळे या गुन्ह्याचा तपास करत होते. त्यात अपहरण झालेली मुलगी परभणी येथे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
दरम्यान, पोलिसांनी परभणी येथे जात या मुलीसह त्याच्यासोबत असलेल्या दुर्गादास मकर याला ताब्यात घेतले. त्यानंतर मुलीकडे चौकशी केली असता दुर्गादास याने युवतीला लग्नाचे आमिष दाखवत तिला परभणी येथे नेले. नंतर मंदिरामध्ये तिच्या गळ्यात हार घालत लग्न केल्याचे भासवले.
…अन् नंतर केला लैंगिक अत्याचार
एका खोलीमध्ये ठेवून घेत तिच्यावर वारंवार अत्याचार केला असल्याचे मुलीने पोलिस चौकशीत सांगितले. त्यानुसार, पोलिसांनी सदर अपहरणबाबतच्या गुन्ह्यामध्ये बाल लैंगिक अत्याचारासह अत्याचारप्रकरणी गुन्हा दाखल करत दुर्गादास रेशीम मकर (रा. गंगाखेड ता. गंगाखेड जि. परभणी) याला ताब्यात घेत अटक केली आहे.
पतीसमोर सासरा करायचा अत्याचार
तर दुसरीकडे, पतीसमोर पतीच्या संमतीने सासरा सुनेवर लैंगिक अत्याचार करत असल्याचा धक्कादायक प्रकार पिंपरी-चिंचवड शहरातील भोसरी येथे नुकताच उघडकीस आला आहे. सुनेच्या नावाने डेटिंग साईटवर बनावट प्रोफाईल बनवून तिला वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडल्याचेही उघडकीस आले आहे. यासाठी विवाहितेने विरोध केला असता तिला मुलांसह घराबाहेर काढण्यात आले.
राज्यात अत्याचाराचे वाढले प्रमाण
राज्यात अत्याचाराचे प्रमाण मोठ्या प्रमाणात वाढले आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी फेसबुकवर झालेली ओळख एका महिलेला चांगलीच महागात पडली. ओळखीचा फायदा घेऊन या विवाहितेला लग्नाचे आमिष दाखवले. त्यानंतर तरूणाने अत्याचार केला. आरोपीने महिलेला घटस्फोट झाल्यानंतर ‘तुझ्यासोबत लग्न करेल’, असे आमिष दाखवून अत्याचार केला. याबाबत खामगाव शहर पोलिसांनी तरुणाविरुध्द गुन्हा दाखल केल्याचेही समोर आले आहे.
हेदेखील वाचा : पतिसमोरच सासरा करायचा सुनेवर लैंगिक अत्याचार; पिंपरी-चिंचवडमधील संतापजनक प्रकार