Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़

  • ई-पेपर
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • वर्ल्ड
  • अन्य
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • अन्य
      • व्यापार
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • टेक
      • ऑटो
      • फोटो
      • व्हिडिओ
  • देश
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Ganesh Chaturthi 2025 |
  • Bihar Election 2025 |
  • Asia cup 2025 |
  • Today's Gold Rate |
  • bigg boss 19
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • विडियो
  • फटाफट खबरें

Mira Road Crime News: शॉपिंग सेंटर हत्या प्रकरणात मोठा खुलासा; पोलिसांच्या तपासातून समोर आले खरं कारण

मीरोरोड येथील शॉपिंग सेंटर येथे झालेल्या गोळीबारामुळे परिसरात भितीचं वातावरण निर्माण झालं आहे. याचपार्श्वभूमीवर पोलिसांच्या तापासात महत्त्वाचा धागा हाती लागला आहे.

  • By तृप्ती गायकवाड
Updated On: Jan 05, 2025 | 12:39 PM
धक्कादायक! अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत

धक्कादायक! अशोक धोडी यांचं अपहरण करून हत्या ; वाहनासह मृतदेह बंद दगड खदानीत

Follow Us
Close
Follow Us:

प्रतिनिधी विजय काते :  मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळील शॉपिंग सेंटरमध्ये एका व्यक्तीची हत्या करण्यात आली होती. रुमालाने तोंड बांधून आलेल्या अज्ञात आरोपीने मयताच्या डोक्यात गोळी झाडली होती. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केल्यानंतर वेगळेच कारण समोर आले आहे. मीरा रोड रेल्वे स्थानकाजवळील शांती शॉपिंग सेंटर येथील मीरामणी हॉटेलकडे जाणाऱ्या जिन्याजवळ शुक्रवारी रात्री शम्स तबरेज शहाबुद्दीन अन्सारी उर्फ सोनू हा इसा इब्राहिम शेख याच्यासोबत बोलत उभा होता.त्याचवेळी डोक्यावर टोपी आणि तोंडाला रुमाल बांधलेला इसम आला आणि त्याने शम्स याच्या डोक्यात जवळून गोळी झाडली. गोळी झाडून हल्लोखोर पळू लागला असता, इसा हा त्याला पकडण्यासाठी काही अंतरापर्यंत धावला. तोच हल्लेखोराने त्याच्यावर पिस्तूल रोखली.गोळी झाडण्यासाठी पिस्तुलची स्लाईड मागे घेत असतानाच त्यातील मॅगझीन खाली पडल्याने हल्लेखोर इसा याच्यावर गोळी न झडताच पळून गेला. नयानगर पोलिसांना ती मॅगेझीन सापडली आहे. तसेच हत्येचे सीसीटीव्ही फुटेज सुद्धा मिळाले आहे.

इसा याच्या फिर्यादीवरून या गोळीबार व हत्येप्रकरणी नयानगर पोलिसांनी शनिवारी युसूफ मन्सूर आलम  आणि अनोळखी इसमावर गुन्हा दाखल केला आहे.युसूफ हा स्टेशन समोरच्या शांती सागर हॉटेलजवळ फुटपाथवर बाकडा लावतो. तो फेरीवाला असून, त्याचे अन्य काही धंदे देखील तिकडे लागतात.

काय होता वाद?

पंकजा मुंडे,धनंजय मुंडेंच्या माणसांकडून धमक्या…; अंजली दमानियांचा गंभीर आरोप

शांती सागर हॉटेल जवळील फुटपाथवर कपडे विक्रीचा बाकडा लावणाऱ्या इसा शेख याला सोनू हा कपडे पुरवायचा आणि त्यांचा भागीदारीत धंदा चालायचा. 1 जानेवारी रोजी इसाच्या शेजारी बाकडा लावणाऱ्या युसूफ याने ही माझी जागा असून, इकडे धंदा लावायचा नाही असे धमकावले होते.मी ६ महिन्यापासून येथे धंदा लावत असून, महापालिकेची पावती नियमित भरतो, असे इसा याने सांगितले. त्यावर युसूफ याने ते मला माहित नाही इकडे धंदा लावायचा, तर मला भाडे द्यावे लागेल असे सांगून शिवीगाळ, दमदाटी आणि धक्काबुक्की केली होती.त्यानंतर युसूफसह सैफ मन्सूर आलम व काशीफ मन्सूर आलम व गणेश या चौघांनी इसा याला बुक्क्यांनी मारहाण केली. लोखंडी फायटरने डोक्यात मारून जखमी केले होते. या प्रकरणी नयानगर पोलिसांनी युसूफसह एकूण चौघांवर गुन्हा दाखल केला होता.

कोयत्याचा धाक दाखवून लूट, दुकानाचीही केली तोडफोड; शिक्रापुरात नेमकं काय घडलं?

युसूफ आणि सोनू यांच्यात देखील सदर ठिकाणी धंदा लावण्यावरून काही महिन्यांपासून वाद सुरु होता. याशिवाय शांती शॉपिंग सेंटरमध्ये युसूफ याने ए ३९ हा गाळा भाड्याने घेतला होता. शेजारचा ए ४० या गाळेधारकासोबत दुकानाच्या बाहेर सामान लावण्यावरून दोघांमध्ये वाद व्हायचा.नोव्हेंबरमध्ये या वादातून युसूफवर गुन्हा दाखल केला गेला होता. त्यात सोनू हा युसुफच्या विरोधातील साक्षीदार होता. सोनूने सुद्धा बी ८२ हा गाळा भाड्याने घेतला होता. सोनू हा इसा यालासुद्धा मदत करायचा व इसाच्या फुटपाथवरील धंद्यात तो भागीदार सुद्धा होता. मीरा रोड रेल्वे स्थानकाबाहेरील १५० मीटर परिसर फेरीवाल्यांसाठी प्रतिबंधित असताना महापालिका आणि राजकारणी यांच्या आशीर्वादाने येथे सर्रास अतिक्रमण करून फेरीवाले बाकडे वाल्यांनी अतिक्रमण केले आहे. त्यात सार्वजनिक जागा असताना तेथे धंदा करण्यासाठी फेरीवाला युसूफ हा भाडे वसुली करत होता हे समोर आले आहे.

पोलिसांचे देखील दुर्लक्ष

आरोपी, फिर्यादी आणि मयत आदींमध्ये बाकडा व धंद्यावरून अनेकदा वाद होऊन गुन्हे दाखल झाले होते. तर युसूफ विरोधातील दाखल गुन्ह्यात सोनू हा साक्षीदार होता. सोनू याला धमक्या दिल्या जात होत्या. त्याबाबत सुद्धा तक्रारी व पत्र दिली गेली होती. परंतु पोलिसांनी देखील वेळीच ठोस पावले न उचलल्याने सोनू याची हत्या झाल्याचे आरोप होत आहेत. युसुफ याने सुपारी देऊन हत्या केली का? हल्लेखोर बाहेरून मागवण्यात आल्याची शक्यता आदी बाजूने पोलीस तपास करत आहेत.

Web Title: Mira road crime news shopping center murder case real reason revealed by police investigation

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jan 05, 2025 | 12:29 PM

Topics:  

  • crime news
  • Miraroad Crime case
  • thane

संबंधित बातम्या

पोटच्या मुलानेच आईवर केले चाकूने सपासप वार; रात्री दारू पिऊन घरी आला अन्…
1

पोटच्या मुलानेच आईवर केले चाकूने सपासप वार; रात्री दारू पिऊन घरी आला अन्…

Pune News: मोठी बातमी! ‘PMP’ चालकांनो सावधान; ‘हे’ कृत्य केल्यास होणार थेट निलंबनाची कारवाई
2

Pune News: मोठी बातमी! ‘PMP’ चालकांनो सावधान; ‘हे’ कृत्य केल्यास होणार थेट निलंबनाची कारवाई

नवी मुंबई पोलीस अ‍ॅक्शनमोडवर; ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल
3

नवी मुंबई पोलीस अ‍ॅक्शनमोडवर; ध्वनी प्रदूषण कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या मंडळांवर गुन्हे दाखल

Crime News : तरुण मोबाइलवर गेम खेळत होता; दुचाकीवरुन 4 जण आले अन्…; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या
4

Crime News : तरुण मोबाइलवर गेम खेळत होता; दुचाकीवरुन 4 जण आले अन्…; पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap

© Copyright Navarashtra 2025 All rights reserved.