Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • गुरु, 25 जून 2026 ई-पेपर
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • क्राईम
  • अन्य
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • मनोरंजन
    • व्यापार
    • टेक
    • अन्य
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Fifa World Cup |
  • Lifestyles |
  • ICC Women's T20 World Cup |
  • India vs Afghanistan |
  • political news
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

प्रेमविवाहानंतर छळाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या, चौघांविरुद्ध गुन्हा दाखल; मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथील घटना

मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे २२ वर्षीय विवाहितेने कथित मानसिक, शारीरिक आणि आर्थिक छळाला कंटाळून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या प्रकरणी पतीसह चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस तपास सुरू आहे.

  • By विवेक गायकवाड
Updated On: Jun 25, 2026 | 08:32 PM
crime (फोटो सौजन्य: social media)

crime (फोटो सौजन्य: social media)

Follow Us
Follow Us:

मोहोळ, (वा.) : प्रेमविवाह करून संसाराची स्वप्ने पाहणाऱ्या २२ वर्षीय विवाहितेचा सासरच्या छळामुळे दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना मोहोळ तालुक्यातील सय्यद वरवडे येथे घडली आहे. ऐश्वर्या अक्षय बटाने असे मृत विवाहितेचे नाव असून, सततच्या मानसिक, शारीरिक आणि आर्थिक त्रासाला कंटाळून तिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा आरोप तिच्या नातेवाईकांनी केला आहे. या प्रकरणी पती, सासू-सासरे आणि एका नातेवाईकाविरुद्ध मोहोळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मोहोळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ऐश्वर्याचा ३० नोव्हेंबर २०२४ रोजी प्रेमविवाह झाला होता. मात्र, विवाहानंतर शेतजमिनीच्या हक्कासंदर्भात सोडपत्र दिल्यानंतर तिचा छळ सुरू झाला. माहेरहून सोने, कपडे व इतर वस्तू आणल्या नाहीत, तसेच शेतजमिनीच्या कागदपत्रांवर सही का केली, या कारणांवरून तिला वारंवार मानसिक व शारीरिक त्रास दिला जात होता, असा आरोप करण्यात आला आहे.

Satara News: शेळी तडफडताना पाहून धावले नातू-आजी; विजेच्या तारेने घेतला दोघांचा जीव

फिर्यादीनुसार, ऐश्वर्याला उपाशी ठेवणे, मारहाण करणे आणि सतत अपमानास्पद वागणूक दिली जात होती. १८ जून २०२६ रोजी ऐश्वर्या आणि तिच्या अवघ्या पाच महिन्यांच्या बाळाला मारहाण करून घराबाहेर काढल्याचाही गंभीर आरोप नोंदविण्यात आला आहे. या सततच्या जाचाला आणि छळाला कंटाळून ऐश्वर्या तीव्र नैराश्यात गेली होती. त्यातूनच तिने अखेर टोकाचे पाऊल उचलल्याचे नातेवाईकांनी म्हटले आहे.

यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल

मृत विवाहितेचे नातेवाईक अशोक लक्ष्मण उखळे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती अक्षय देविदास बटाने, सासरे देविदास जालिंदर बटाने, सासू सुवर्णा देविदास बटाने आणि बिट्टू उर्फ शिवाजी ज्ञानेश्वर भंडारी यांच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या घटनेमुळे सय्यद वरवडे परिसरात मोठी हळहळ व्यक्त होत असून, पोलीस अधिकारी सचिन माळी यांच्या मार्गदर्शनाखाली मोहोळ पोलीस या प्रकरणाचा पुढील तपास करीत आहेत.

बायको गाढ झोपेत होती, नवरा पहाटे तिच्या जवळ गेला अन्…; पुण्यात कौटुंबिक वादाचा भयंकर शेवट

Web Title: Mohol married woman suicide after harassment case filed against four

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jun 25, 2026 | 08:32 PM

Topics:  

  • Mohol News

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.