Marathi News
X
  • देश
  • महाराष्ट्र
  • निवडणूक
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • व्यापार
  • लाइफ स्टाइल
  • व्हायरल
  • नवराष्ट्र विशेष
  • करिअर
  • फोटो
  • व्हिडिओ गॅलरी
  • वेबस्टोरीज़
  • ऑटोमोबाइल
  • विज्ञान तंत्रज्ञान
  • बुध, 9 सप्टेंबर 2026 ई-पेपर
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • महाराष्ट्र
  • राजकारण
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • लाइफ स्टाइल
  • क्रीडा
  • अन्य
    • क्राईम
    • विदेश
    • नवराष्ट्र विशेष
    • अन्य
      • मनोरंजन
      • व्यापार
      • टेक
      • वेब स्टोरीज
      • व्हायरल
      • करिअर
      • धर्म
      • ऑटोमोबाइल
      • फोटो
      • व्हिडिओ
      • सिनेमा
  • गणेश चतुर्थी 2026
  • देश
  • शॉर्ट न्यूज़
  • राजकारण
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • क्रीडा
  • वर्ल्ड
  • क्राईम
  • मनोरंजन
  • लाइफ स्टाइल
  • धर्म
  • व्हायरल
  • व्हिडिओ
  • वेब स्टोरीज़
  • फोटो
In Trends:
  • Women Asia Cup |
  • Politics |
  • Ganeshotsav 2026 |
  • bigg boss 20 |
  • Crime
Follow Us
  • वेब स्टोरीज
  • फोटो
  • ई-पेपर
  • विडियो
  • फटाफट खबरें

धक्कादायक ! आई आणि मुलाने केली आत्महत्या; विष प्राशन करून संपवलं जीवन

अभया यांचे पती अनंता खानखोजे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली होती. त्यांना दोन मुले असून, एक हैदराबाद येथे आयटी कंपनीत कार्यरत आहे तर अद्वैत आईसोबत महाल येथील घरी राहत होता.

  • By कृपादान आवळे
Updated On: Jul 25, 2026 | 08:42 AM
रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

रेल्वेसमोर उडी घेऊन पोलिस उपनिरीक्षकाची आत्महत्या; पोलिस गणवेशातच उचललं टोकाचं पाऊल

Follow Us
Follow Us:

नागपूर : महाल परिसरात गंभीर आजाराने त्रस्त असलेल्या आई आणि मुलाने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील श्री गुरुमाऊली अपार्टमेंटमध्ये ही घटना घडली. मृतांमध्ये अभया अनंता खानखोजे (वय ५६) आणि मुलगा अद्वैत अनंता खानखोजे (वय ३३) यांचा समावेश आहे. अभया या स्तन व फुफ्फुसाच्या कर्करोगाने त्रस्त होत्या तर अद्वैत मेंदूतील ट्यूमरच्या आजाराशी झुंज देत होता. दोघांवरही उपचार सुरू होते.

मिळालेल्या माहितीनुसार, अभया यांचे पती अनंता खानखोजे यांचे काही वर्षांपूर्वी निधन झाले. त्यानंतर अनुकंपा तत्त्वावर त्यांना रेल्वेत नोकरी मिळाली होती. त्यांना दोन मुले असून, एक हैदराबाद येथे आयटी कंपनीत कार्यरत आहे तर अद्वैत आईसोबत महाल येथील घरी राहत होता. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास शेजारी अभिषेक कळमकर यांच्या लक्षात आले की, सकाळपासून घराचे दार बंद आहे. आतून कोणताही प्रतिसाद मिळत नव्हता. त्यांनी तत्काळ कोतवाली पोलिसांना माहिती दिली. पोलिस निरीक्षक प्रशांत जुमडे यांच्या पथकाने घटनास्थळी पोहोचून दरवाजा उघडल्यानंतर बेडरूममध्ये दोघांचे मृतदेह आढळले.

मैत्रीणीच्या घरात डल्ला मारणाऱ्या मित्राला ठोकल्या बेड्या; गुजरातमधील वडोदरातून पोलिसांनी पकडले

घटनास्थळावरून पोलिसांनी सुसाईड नोट, विषाच्या दोन बाटल्या, मोबाईल आणि उलटीचे नमुने जप्त केले. प्राथमिक तपासात गंभीर आजारामुळे निर्माण झालेल्या असह्य वेदना आणि मानसिक तणावातून दोघांनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे समोर आले आहे.

सुसाईड नोटमध्ये दिले आत्महत्येचे कारण

सुसाईड नोटमध्येही आजारपणामुळे आत्महत्या करत असल्याचा उल्लेख आहे. दोन्ही मृतदेह शवविच्छेदनासाठी मेयो रुग्णालयात पाठविण्यात आले. रासायनिक विश्लेषणासाठी नमुने न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत. याप्रकरणी कोतवाली पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून पुढील तपास सुरू केला आहे.

नाशिकमध्येही महिलेची मुलींसह आत्महत्या

दुसऱ्या एका घटनेत, देवळा तालुक्यातील वाखारी येथे बुधवारी (दि. २२) सायंकाळी एका तरुण विवाहित महिलेने दोन लहान मुलींसह विहिरीत उडी घेत आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. याबाबत विवाहितेच्या पतीसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, चार जणांना देवळा पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

Web Title: Mother and son commit suicide

Get Latest  Marathi News ,  Maharashtra News and  Marathi News from Politics,  Election News ,  Sports News ,  Entertainment News,  Business News and   Religion News  only on Navarashtra.com

Published On: Jul 25, 2026 | 08:42 AM

Topics:  

  • Nagpur Crime
  • Suicide case

संबंधित बातम्या

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!
1

Nagpur Crime : ५०० कॅमेऱ्यांनी उलगडला गोळीबाराचा थरार; नगरसेवकावरील हल्ल्यात ७ जेरबंद!

Nagpur Crime : शेतकऱ्याच्या नावावर ७४ कोटींचा कर्जघोटाळा; आंतरराज्यीय टोळीचा आरोपी अटकेत
2

Nagpur Crime : शेतकऱ्याच्या नावावर ७४ कोटींचा कर्जघोटाळा; आंतरराज्यीय टोळीचा आरोपी अटकेत

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…
3

कौटुंबिक वादातून पत्नीची हत्या; गळ्यावर व पोटावर बेदम मारहाण, मणक्याचे हाड तुटले…

Popular Sections

  • देश
  • विदेश
  • लाईफस्टाईल
  • मनोरंजन
  • क्रीडा
  • व्यापार
  • वेब स्टोरीज

Maharashtra Cities

  • मुंबई
  • पुणे
  • नागपूर
  • ठाणे
  • नाशिक
  • रत्नागिरी
  • पालघर
  • रायगड

More

  • धर्म
  • ऑटो
  • करिअर
  • व्हायरल
  • फोटो
  • नवराष्ट्र विशेष
  • टेक
  • व्हिडिओ

Follow Us On

Contact Us About Us Privacy Policy
Hindi News Epaper Marathi Epaper Hindi RSS Sitemap Author

© Copyright Navarashtra 2026 All rights reserved.