
इन्स्टाग्रामवरून ओळख झाली; तरुणाने वारंवार अत्याचार केला अन् नंतर पीडिता गर्भवती राहताच...
रौनक पाथरोल (वय २१, रा. सोनेगाव) असे अटकेतील नराधमाचे नाव आहे. पीडित मुलगी दहावीत शिकते. इन्स्टाग्रामच्या माध्यमातून ती रौनकच्या संपर्कात आली. ओळख वाढल्यानंतर दोघांमध्ये घट्ट मैत्री झाली आणि ते मोबाईलवर बोलू लागले. रौनकने तिला प्रेमाच्या जाळ्यात ओढले आणि लग्नाचे आमिष दाखवून वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन वारंवार बलात्कार केला. तसेच हा प्रकार कोणाला सांगितल्यास बदनामी करण्याची धमकीही त्याने दिली.
दरम्यान, जून महिन्यात मुलीची प्रकृती अचानक खालावली. आईने तिला उपचारासाठी डॉक्टरांकडे नेले. वैद्यकीय तपासणी आणि सोनोग्राफी केल्यानंतर ती आठवड्यांची गरोदर असल्याचे निष्पन्न झाले. या प्रकाराने पालकांच्या पायाखालची जमीन सरकली. यानंतर संबंधित तरुणाविरोधात पोलिसांत तक्रार देण्यात आली असून, गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
FAQ :
नागपुरात नेमके काय घडले? कोणत्या पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा?
– नागपुरात ऑक्टोबर 2026 मध्ये 2-3 वेगवेगळ्या घटना समोर आल्या आहेत. सर्व प्रकरणांत POCSO अंतर्गत गुन्हा दाखल झाला आहे. mIDC पोलीस स्टेशन – 5 ऑक्टोबर 2026 – 17 वर्षीय मुलीने वडिलांच्या अत्याचाराला विरोध केला.
यात कोणता कायदा लागतो? शिक्षा किती?
– POCSO Act 2012 (Protection of Children from Sexual Offences) : 18 वर्षांखालील मुलांवरील अत्याचारासाठी विशेष कायदा कलम 4 – Penetrative assault – किमान 10 वर्ष ते जन्मठेप कलम 6 – Aggravated assault – किमान 20 वर्ष ते मृत्युदंड
पालकांनी आणि मुलींनी काय काळजी घ्यावी?
– कोणीही नातेवाईक असला तरी असुरक्षित स्पर्श केल्यास ताबडतोब आई-वडील / शिक्षक / 1098 वर सांगा. सोशल मीडियावर अनोळखी व्यक्तीला घरचा पत्ता, शाळा, फोटो शेअर करू नका. लग्नाचे आमिष, गिफ्ट, पैशाचे आमिष – हा ट्रॅप असतो.